Pulika blessed by Mothi Aai

#377308

ketaki. Kulkarni
Participant

Pulika blessed by Mothi Aai

आजच्या अग्रलेख खरच सूंदर… पुलिका(Pulika) वर मोठ्या आईची(Mothi Aai) कृपा किती सहज झाली होती हे ह्यातून दिसून येते.. ज्या शेवाळयामुळे शुक्राचार्यही वाचू शकत नसतात तिथे ही पुलिका मात्र सहजपणे वाचते.. जेव्हा पुलिका सेमिरामिसच्या मननियंत्रणाखाली होती व सेमिरामिस(Semiramis) आणि केरिडाविन (Caridwen) मधे वाद होतात त्यावेळी ह्या शेवाळ्याची स्फटिकनलिका पुलिका तिच्याकडे लपून ठेवून घेते आणि त्याच्यावर अनेक चाचण्या करून त्यावर लस शोधून काढते.. ज्यामुळे तिच्यावर कधीच त्या शेवाळ्याचा परिणाम होऊ शकणार नसतो..

मननियंत्रणाखाली असतांना ही हे सर्व करू शकणे म्हणजे ह्यासाठी नक्कीच त्या मोठ्या आईची कृपा लागते. इथे उपनिशदामधले वाक्य आठवते.. की मोठ्या आईच्या सामर्थयावर कधीही शंका घेऊ नका. मोठ्या आईचे सामर्थ्य प्रचंड आहे आणि ती उचित वेळी सर्व काही पुरवीतच असते..
त्यावेळी पुलिकाला त्या शेवाळयासाठी लस शोधून काढण्यासाठी मदत करते आणि आज त्यामुळेच ती निक्सच्या कारस्थानांचा व्यवस्थित मागोवा घेऊ शकत आहे..
माझ्या आईचे सामर्थ्य खरोखर अफाट आहे.. हे सर्व वाचून आपला विश्वास अधिक दृढ़ होत जातो.. काही झाले तरी ही मोठी आई 18 हातात शस्त्र घेऊन तिच्या बाळासाठी उभी असतेच असते..
आणि आपल्या आईने आपल्याला वचनच दिलेले आहे – “मी तुमच्यासाठी ही अशीच धावत येईल”
पुलिका पूर्णपणे मन नियंत्रित असतांनाही ती आज पूर्णपणे ह्यातून बाहेर पडलेली आहे व त्याचबरोबर तिला आधीच्याही सर्व गोष्टी म्हणजे जेव्हा ती सेमिरामिस बरोबर होती तेव्हाच्या ही गोष्टी आठवत असतात.. किती ती किमया ह्या आईची!!
खरच आपली आई…ती आहेच आणि ती असतेच.. मला फक्त पूर्ण विश्वास ठेवायची गरज आहे.. बाकी अशक्याचे ही शक्य ती तिच्या बाळासाठी करतच असते..
तिथे हॉरेपियन आणि गटाने मेड्यूसाचे घर जाळले.. आता तिथे मेड्यूसाला असे वाटत आहे की तिच्याकडची ती नाळ असणारी स्फटिका पूर्णपणे ह्या आगीत नष्ट झालेली आहे..
आता उत्सुकता वाढत चालली आहे की पुढे काय!!!
अंबज्ञ बाप्पा…
– केतकीवीरा कुलकर्णी