prayer to Mahadurga

#85244

Sailee Paralkar
Participant

आजच्या म्हणजे दिनांक ८ जानेवारीच्या अग्रलेखात निक्स(Nyx) शुक्राचार्यांची मुलगी कद्रूला(Kadru-Longmu) १ अत्यंत महत्वाची गोष्ट सांगते की, सामान्य प्रकृतीची बिजॉयमलाना(Bijoymalana) तुझ्यावर हल्ला करू शकली कारण ती त्यांच्या उपासना नित्यनियमितपणे करते, तिच्यासारखे थिया, अनंतव्रत, हर्क्युलिस, अल्केमिनी, ऱ्हीया (Thea, Anantvrat, Hercules, Alcmene, Rhea, )असे अनेक श्रद्धावान त्यांच्या सर्व उपासना नियमित करत असतात त्यातच त्यांची महादुर्गा( Mahadurga) क्षमाशील आहे. ह्यातूनच आपल्याला महादुर्गेच्या नित्य उपासनेचे सामर्थ्य कळते बिजॉयमलाना सारखी सामान्य स्त्री त्या बलवान, मकरमानव असलेल्या कद्रूलादेखील अपंग करू शकते. म्हणजे एवढे सामर्थ्य सामान्य माणसाला मिळत असते ह्या नित्य उपासनेतून, आपण ही गोष्ट नीट लक्षात घेऊन नित्य उपासना नियमित केली पाहिजे असे मला वाटते.