Points about Kailash and Ganapati

#60057

Naina Tushar
Participant

Hari Om Dada,

Really ambadnya because of this forum we can revise ourselves with the great history that dad is exploring in front of us. And through this we can upgrade our knowledge on the same.

Below are some points from Tulsipatra 997 which i have noted down and some thoughts mentioned which has come during the reading of the same.

TULSIPATRA – 997

यात बघतो कि श्री गणपतीच्या(Ganapati) वाहनाची दिव्य मुषकाची श्री चंडिका कुळाचे वाहन म्हणून सिद्धता मोठी आई करते आणि सर्वजण त्याला घेऊन केलासावर जातात .
यात बापूनी सांगितलेले महत्वाचे मुद्दे :
१. आदिमाता श्री चंडिका (Chandika)कुलाच्या प्रत्येक सदस्यासाठी त्याची क्षेमकल्याण योजना सुंदरपणे तयार करून घडवून आणते .
२. आईकडे अगदी क्षुद्र जीवासाठी सुद्धा अत्यंत प्रेम व सहजसंगोपण भावना आहे.
३. आईच्या योजनेनुसार्क त्रिपुरासुर युद्धासाठी दिव्य मुषकाची श्री गणपतीचे वाहन म्हणून सिद्धता करून घेतली (तीही आईनेच)
४. परम शिवाने पुढील आदेशासाठी विनंती केली असता आईने तिच्या अठरा हातानी दिव्य नकाशा काढला.
५. कैलास(Kailash)शिखराची एक बाजू पूर्णपणे स्फटिकाची , दुसरी बाजू सुवर्णाची, तिसरी बाजू रौप्याची , आणि चौथी बाजू मानकाची अहे.
६. आईने स्फटिक भिंतीवर शत्रुपक्षाच्या स्थानांचे व त्यांच्या एकंदर योजनांचे आणि हालचालींचे अतिशय सोप्या प्रकारे चित्रण करून परमशिव, श्री गणपती आणि कार्तिकेय यांना वस्तुस्थिती समजावून सांगितली.
७. आईने याचवेळेस कैलासाच्या रौप्य भिंतीवर परम शिवाच्या सैन्याच्या हालचालींची व आक्रमणाची आणि युद्धारचनेची संहिता स्वताच्या हातातील बाणाने (शराने ) चित्रबद्ध केलि.व शिवसैन्याची योजना यांना सम जावून सांगितली.
आणि सर्वात शेवटी श्री गणपती परमशिवला विनंती करतात कि यावेळी सर्व सत्य पार्वती मातेच्या तोंडून सर्वाना कळू देत.
मी मातेला प्रश्न विचारेन आणि प्रश्नांची उत्तरे द्यात . त्यावर परमशिव तथास्तु असे म्हणतात .

यात मला काय शिकायला मिळाले?
आई खूप प्रेमळ आहे आणि माझ्यावर खूप करते माझ्या छोट्यातल्या छोट्या गोष्टीची तिला काळजी असते .
आई शत्रूच्या युद्धाची योजनेची, दलाची रचना स्फटिक पृष्ठभागावर करते म्हणजे खाचा खळगे हे श्रद्धा हिनांसाठीच असतात .
तर शिवसैन्याची योजना, रचना रौप्य पृष्ठभागावर करते म्हणजेच श्रद्धावान लोकांसाठी तिची आखणी योजना वेगळी आहे , इकडे खाच खळगे नाहीयेत .
शत्रूंच्या दलाची रचना करताना आई तिचे अठरा हात वापरते जणू काही ती तिच्या अठरा हातानी त्या असुरांच्या राजवटीला सुरुंग लावत आहे आणि शिवसैन्यांनी जाऊन फक्त तो फोडायचे .
आणि शिव सैन्याची रचना योजना आखताना आई शर बाण वापरते .
यावरून आई किती प्रेमळ (तिच्या बाळांसाठी ) आणि उग्र आणि परखड (आसुरी वृत्तीसाठी ) हे आपल्या लक्षात येते.

अम्बज्ञ .

Nainaveera Shelar