Plans of Zeus, Bijoymalana and Aphrodite to demolish Circe and Utnapishtim

Forums वैश्विक वास्तव (The Universal Truth) प्रारंभ Plans of Zeus, Bijoymalana and Aphrodite to demolish Circe and Utnapishtim

#120647

Sailee Paralkar
Keymaster

हरि ॐ

९ फेब्रुवारीचा अग्रलेख अक्षरश: सुन्न करणारा होता. फोरमवरील चर्चेमधील काही अंदाज बरोबर होते तर काही गोष्टी विचार करण्या पलिकडच्या होत्या. र्‍हियाच्या रुपातील सर्कीची स्थिती पाहून खरंच बरं वाटलं. त्याचवेळेस झियस(Zeus), बिजॉयमलाना(Bijoymalana), डेमेटर(Demeter) आणि अ‍ॅफ्रोडाईटची (Aphrodite)अफलातून योजना समोर येते. युद्ध फक्त रणांगणावरच खेळलं जात नाही, हे बापूंचे शब्द अग्रलेख वाचताना सतत आठवत होते. सत्याचा विजय होण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची सर्व व्रती आणि सावर्णि पंथीयांची तयारी बघून स्तब्ध व्हायला झालं.

अग्रलेख १०७५ मध्ये हर्मिस खूप महत्त्वाची व्यक्ती ठरते. (खोट्या) सर्की(Circe) आणि उतनापिष्टीमच्या(Utnapishtim) बाजूला असलेल्या प्रॉमेथस व झिरॉनला पाहून सॉरेथस आणि अ‍ॅपोलोचा झालेला संताप साहजिक आहे. पण त्याचवेळेस हर्मिसने दाखवलेला संयम आणि सारासार विचार करण्याची वृत्ती अत्यंत महत्त्वाची ठरते.

समोर काय घडतंय हे डोळ्यांना स्पष्ट दिसत असूनही हर्मिसने नीट विचार केला. प्रॉमेथस आणि झिरॉनची सम्राट झियसशी असलेली एकनिष्ठता हर्मिसला माहित होती. पण या सगळ्यामागे हर्मिसकडे असलेली महादुर्गेची निश्‍चल भक्ती कारणीभूत आहे. म्हणूनच समोरचं धक्कादायक आणि संतापजनक दृश्य बघूनसुद्धा हर्मिसचा तोल जात नाही.

प्रॉमेथस(Prometheus), झिरॉन (Ziron)आणि डेमेटरची (थाडा(Thada), लॅमॅसु व पझुझु) (Lamazu, Pazuzu) योजनादेखील खूप कठीण होती. सगळ्यात वरचढ म्हणजे माता सोटेरिया या वयातही करीत असलेले धाडस तर बोलण्याच्याही पलिकडे आहे. खरंच महादुर्गेचा प्रत्येक भक्त कणखर असतोच. आता पुढच्या अग्रलेखात काय असेल याची उत्सुकता लागली आहे.