Pindar and Pandora

#509827

ketaki. Kulkarni
Participant

(Pindar and Pandora)

आजच्या अग्रलेखातून अतिशय महत्वाच्या गोष्टी आपल्याला बापूंनि सांगितल्या आहेत.
स्वतः पिंडार आणि पँडोरा ह्यांच्याकडूनच त्रिविक्रम व महादुर्गेच्या मार्गाचा स्वीकार न केल्यास काय होते हे, हे समजून येत आहे..
आपला त्रिविक्रम बाप्पा, मोठी आई ह्यांचे अकारण कारुण्य अगदी सहजपणे कळून येते.
ज्यावेळी मेड्यूसाच्या मनात पिंडारच्या योजेनेबाबत (हॉरेमाखतचा वध घडवून आणणे) शंका उतपन्न होते, त्याच क्षणाला तिला असहय्य वेदना होउ लागतात. तिचे हाताची व पायाची नख उलटी होऊन तिच्या बोटात घुसु लागतात. व तेव्हा पिंडार तिला सांगतो की “मी त्या त्रिविक्रम व महादुर्गेचा आप्त नाही, त्यांचा शत्रूच आहे आणि त्यामुळे ते जशी त्यांच्या अभक्तांना वारंवार संधी देत राहतात, ती प्रथा मला मान्य नाही.. माझ्या शब्दाविषयी कुठलाही प्रश्न उभा राहिला की त्या शंकाग्रस्त व्यक्तीचे मी हालहालच करतो
पिंडार म्हणजे शरीराला रुक्ष आणि शुष्क करणारा..
शारीरिक वेदना हे शस्त्र आणि मानसिक वेदना हे अस्त्र.
आणि त्या वेदनेतून जीवाला मुक्त करणारी ती ‘ अरुला जीवनीय शक्ती’ अर्थात अफ्रोडाइट आणि म्हणूनच मी तिचा अतिशय तिरस्कार करतो. कोणी कितीही धुत्कारले, तिचा शब्द वारंवार मोडला तरीदेखील त्या महादुर्गेचे व त्रिविक्रमाचे शब्द पाळून ती श्रद्धेचा कणभर अंश असणाऱ्याससुद्धा सहाय्य करते”..
ह्यातूनच दिसून येते ते ह्या कुकर्मी लोकांची निष्ठुरता आणि आदिमातेचे प्रेम आणि अकारण कारुण्य.

अगार्था (Agartha) नगरीतिल एक एक प्रदेश वाचतांना पायाखालची जमीन सरकते.. ह्या नागरीचे सर्व वर्णन मेड्यूसाला पँडोरा म्हणजेच दितिने सांगितले आहे..
– खोल खड्डा..जिथे जीव वळवळत असतात, गुदमरत असतात कारण तिथे अगार्था नगरीतिल प्रत्येक जण मल विसर्जन करीत होता..
ह्या ठिकाणी, पिंडारच्या राज्यातील पिंडार आणि पँडोरा ह्यांचे आज्ञेचे उल्लंघन करतो तो आपोआप ह्या खाईत येऊन पडतो..
– तपकिरि रंगाचा प्रदेश… जिथे सर्वांगाला असह्य उग्र चटके देत होता..
जे मानव त्रिविक्रम व महादुर्गेपासून दूर दूर जातात ते मृत्युपश्चात ह्या प्रदेशात (पिंडारप्रदेश) येतात.
– विषारी आणि उन्मत्त सर्पांचा प्रदेश.. हे सर्प म्हणजे मेड्यूसाचे केस.. आणि हे सर्प म्हणजेच महादुर्गा व त्रिविक्रम ह्यांच्याविषयी उत्पन्न होणारा प्रत्येक संशय..आणि त्यांचे विष हे त्या व्यक्तीच्या मेंदूतील प्रत्येक पेशीचा ताबा घेऊ लागते.. पण अरुला मात्र मेंदूतील भागांना संतुलित ठेवते..
मेड्यूसा म्हणजेच मदोन्मत्त करणारी.. अहंकार वाढवणारी..
तिथल्या त्या अरण्यातले हिंस्त्र प्राणी म्हणजेच एक एक प्रज्ञापराध…
दिति हे ही सांगते की “अपवित्र नागविद्येला पूर्णपणे हतबल करणारी पवित्र गरुडविद्या आपल्याला मिळणे कधीच शक्य नाही कारण त्यावर तिचेच मूर्तिमंत स्वरुप असणाऱ्या आदिगरुडावर तो चण्डिकापुत्र महाविष्णु आरूढ झालेला आहे.. व देवीसिंहाचा नाश करताच हा गरुड हतबल ठरणार आहे”..
हे सारे वाचून हसावे का ह्या श्रद्धाहीन लोकांची कीव करावी हेच कळत नाही.. त्रिविक्रमाचे.. मोठ्या आईचे सामर्थ्य पूर्णपणे जाणून ही हे लोक स्वतःचा विजय होईल ही मुर्ख आशा ठेऊन असतात..
पण ह्यातून नक्कीच कळून येते की मला माझा विश्वास किती पक्का करायला पाहिजे.. कारण एकदा का विश्वास डगमगला की मग त्यानंतरच आदिमातेवर संशय उतपन्न होऊ शकतो आणि तो एकदा उतपन्न झाला की मग आपोआपच चुकीचे विचार सुरु होऊन चुकीचा मार्ग अवलंबला जातो.. व मग माझ्यातून ‘तिचा’ वास निघून अहंकार येऊ लागतो..
की मग आपण प्रज्ञापराध करू लागतो.. आणि मग हे न संपणारं दुष्टचक्र आपल्या मागे लागते..
आणि म्हणूनच उपनिषदामधे ही बाप्पाने आपल्याला वारंवार सांगितले आहे की कधीही तिच्या काहीही करण्याच्या सामर्थयावर शंका घेऊ नका..त्या मोठ्या आईच्या आणि तिच्या पुत्राच्या प्रेमाचा कधीही अव्हेर करू नका.
खरच ही मोठी आई काहीही करू शकते.. कितीही मोठे संकट आले तरीही डगमगुन न जाता तिची भक्ति वाढवत न्यायला हवी..
ह्या मोठ्या आईचे कारुण्य अफाट आहे.. श्रद्धाहिनांनाना ही हा त्रिविक्रम अनेक संधी देत राहतो.. आणि ह्याचे उदा. आपल्याला सुंदरकांड मातृवात्सल्य विंदानम मधून दिसतेच..
शुंभाला ही आदिमाता तिच्या मधे तिच्या सर्व शक्ति विलीन करुन तिचे दर्शन त्याला घडवते पण शुंभाला मात्र आपण तिला एकटी केले असे वाटू लागते व त्याचा मृत्यु होतोच..
रावण ज्यावेळी हनुमंताची शेपटी जाळण्यास सांगतो तेव्हा हनुमंत ती वाढवत नेतो.. नगरीतिल सर्व कापड तेल तूप संपूण जाते पण हनुमंताची शेपुट मात्र वाढतच जाते..ह्यातून ही त्या श्रद्धाहिन लोकांना काहीच बोध होत नाही .. ना त्यांना हनुमंताचे सामर्थ्य समजत ना श्री रामांचे सामर्थ्य कळत.. आणि ह्यातून मग संपूर्ण नगर उध्वस्त होते ..पण तरीही रावणाची अक्कल ठिकाणावर येत नाही आणि रावणाचा वध हा होतोच..

आजच्या अग्रलेखतून… श्रद्धाहीन लोकांचा मार्ग व श्रद्धावान लोकांचा मार्ग ह्यामधे फरक सहज दिसून यतो… कुमार्गावर असणाऱ्याकडून एखादी चूक जरी झाली तरी त्याला माफी नसते पण देवयानपंथावर एखादा नास्तिक असलेला जरी मनापासून आला तरीही त्याला ही मोठी आई त्याला तिच्या कुलाचे सदस्य बनवून घेते..

एक गोष्ट आजच्या अगरलेखातून लक्षात येते की… पिंडारला हे अचूक ठाऊक असते की त्याचेच स्वरुप असणाऱ्या शुक्राचार्यला ‘अफ्रोडाइट आपली गुलाम आहे’ हा भ्रम झाला आहे व ही अफ्रोडाइट त्याचा तो भ्रम जपते आहे..पण ह्या पिंडारला मेड्यूसाला नागविद्या शिकवणारा वासुकि म्हणजे कोण हे ही कळत नाही के सेरापिस अनुबीसच्या रुपात वावरणारे महर्षि सुमेधसांचे रूप ही कळू शकत नाही..
ह्यातूनच कळते की ह्यांची ताकद आदिमातेसमोर कित्ती क्षुल्लक आहे..
खुप अंबज्ञ बापुराया … आम्हाला ह्या अग्रलेखातून तुम्ही प्रत्येक स्थितिचि जाणीव करून देत आहात… त्रिविक्रम बाप्पा आणि आदिमातेला विमुख होऊन कशा प्रकारे सर्व जीवनच अर्थहीन होते व ह्या दुराचार्यांची ताकद किती मर्यादित आहे आणि ह्या मोठ्या आईची ताकद आणि प्रेम अमर्यादित आहे ह्याची जाणीव ही ह्यातून तुम्ही आम्हाला करून देत आहात ..खरच बापुराया खुप खुप अंबज्ञ..

अंबज्ञ
केतकीवीरा कुलकर्णी