Orgone knowledge

#478565

Suneeta Karande
Participant

हरि ॐ.
दिनांक २७-२०-२०२५ चा तुलसीपत्र – ११६७ चा अग्रलेख व २९-१०-२०१५ चा तुलसीपत्र -११६८ चा अग्रलेख वाचताना आपले भारतवर्ष ऑरगॉन विद्या (Orgone) अर्थात ” श्रीविद्यारस ” योग , “महाप्राणविद्या” किंवा” हनुमान विद्या ” किंवा ” मरूतविद्या” ह्या सारख्या किती श्रेष्ठ विद्यांनी समृध्द व संपन्न होते ते जाणवले. आपण किती भाग्यवान आहोत की ज्या दिवसांमध्ये आपण ” श्रीविद्यारस ” योग ह्या श्रेष्ठ , पवित्र विद्येविषयी जाणले त्याच काळात साक्षात त्रिविक्रम ,परमात्मा असलेला आपला सदगुरु आम्हा सर्व श्रध्दावानांना “श्रीशब्द ध्यान योग” ही अत्यंत सुंदर विद्या शिकवीत आहे. बापू म्हणतात तसे हा काही निव्वळ योगायोग नक्कीच असू शकत नाही तर ह्या मागे काही तरी रहस्य नक्कीच दडलेले असणार जे उचित वेळी आपल्याला आपले बापू शिकविणारच आहेत. परंतु तो पर्यंत आपण त्या “व्रतधारकां”चा संयम , सबूरी हा श्रेष्ठ गुण आचरणात आणायला हवा असे वाटते. तुलसीपत्र ११६७ च्या अग्रलेखात आपण वाचतो की हामाता सोटेरिया महादुर्गेचे स्तोत्र म्हणत असते आणि संस्कृत भाषेतील त्या स्तोत्राचा अर्थ बहुतेकांना कळत नसला तरीही महामाता सोटेरियाचा पवित्र आवाज , दुर्गा’ , ’महादुर्गा’, ’परमेश्वरी’ , ’आदिमाता’ इत्यादि शब्दांमुळे हे महादुर्गेचे स्तवन आहे हे मात्र नीट जाणवत असल्यामुळे प्रत्येकजण एकाग्रचित्ताने व पवित्र भावाने हात जोडून शांतपणे ऐकत बसला होता. तसेच आपणही आपल्या बापूंच्या प्रत्येक शब्दाचे आज्ञापालन असेच एकाग्रचित्ताने करायला हवे असे प्रामाणिकपणे वाटते.
लेटोचे अफाट साहस, अचाट शौर्य ह्याबद्दल आधीच्या अग्रलेखांतून आपण वाचले होतेच, आजच्या तुलसीपत्र ११६८ मधून तिच्या असीम त्यागाची प्रचिती येते. प्रसूतिच्या आधीही , प्रसूतिपर्यंत लेटोची माता अनांकी व र्‍हिया लेटोचे हे तिळेपण लपवून ठेवतात व सात वर्षांपर्यंत लेटोने “समाधि” ह्या आपल्या तिसर्‍या पुत्राला गुप्तपणेच वाढवले व पुढेही तो सात वर्षाचा होताच माता अल्केमिनी निंबुरावरून थेट भारतवर्षात घेऊन जाऊन टॉलोपस व विलोपसच्या पित्याकडे सोपविते. त्यानंतरचा कितीतरी मोठा काळ लेटोला फक्त हर्क्युलिसच्या बातम्यांवरूनच आपल्या ह्या पुत्राचे क्षेमकुशल समजत होते. एवढेच काय राजा मिनॉसच्या कैदेतून हर्मिसने लेटोची सुटका करवून आणताना “गोरिलॉन” बनून
मदतीस आलेला हा तिचाच पुत्र समाधि आहे हे ही लेटोला किती काळ माहित देखील नव्हते. बिजॉयमलाना व आयरिस ह्यांची त्यांच्या पुत्रांशी सुरथ व आर्यमा भेट अशीच हेलावून टाकणारी आहे.
ध्येयप्राप्तीसाठी किती व्रतस्थ जीवन हे सावर्णि घराणे जगत होते नाही. त्यांच्या अफाट शौर्याला, असीम त्यागाला सीमाच नाही .
लेटो-हर्मिसचा पुत्र “समाधि वैश्य ” आहे हे वाचताच आठवले आपल्याला बापूंनी “मातृवात्सल्य वेदात ” उपसंहार लिहीताना सांगितले शब्द की ऋषि सुमेधसाने ह्यातील काही भाग सम्राट सुरथ व समाधि वैश्य ह्या दोघांस कथान केला व त्यातून ’सप्तशती आख्यान’ तयार झाले.
म्हणजेच सम्राट झियसचा पुत्र सुरथ आणि लेटो-हर्मिसचा पुत्र समाधि वैश्य हे भारतवर्षात केवळ “ऑरगॉन” विद्या शिकण्यापुरतेच तरूण वयात राहिले नव्हते तर पुढे समाधि वैश्य हा हायपेरिऑनच्या प्रभावामुळे अध्यात्मातही वरच्या श्रेणीचा पवित्र साधक बनला होता. त्या नंतरही पुढील काळात त्याने ऋषी सुमेधसांकडून ” मातृवात्सल्यविन्दानम् ” शिकून घेऊन अध्यात्माच्या प्रसार -प्रचार कार्याला मोठा हातभारच लावला होता “सप्तशती आख्यान” ह्या आदिमातेच्या आख्यानातून म्हणजेच हे सावर्णि घराणे आदिमातेच्या चरणांशी सातत्याने, नित्यत्वाने अंबज्ञ राहिले होते ही अत्यंत महत्त्वाची बाब ध्यानात येते.

समाधि वैश्य हा चिलोपस बनून वावरताना त्याला शेवटच्या तीन घटिकांमध्ये इशिपट्टच्या राजदालनात काय कारस्थान चालू असावे ह्याचा अंदाज येताच तो अत्यंत सावध झाला. एवढेच नव्हे तर सॅथाडॉरिना आणि नेफिलीमच्या डोळ्यांच्या इशार्‍यांवरून केलेल्या अंदाजानुसार त्याने अत्यंत चाणाक्षपणे हायपेरिऑनशी संपर्क साधून पुढील योजना आखली व स्वत:च्या जीवावर बेतलेल्या प्राणघातक हल्ल्यातूनही सहीसलामत सुटका करून घेतली. सॅथाडॉरिनाने त्याच्या गळ्याभोवती तार आवळण्यास सुरुवात करताच त्याने योगसिध्दीने स्वत:चे पंचप्राण त्याच्या अनाहतचक्रात परमात्म्याच्या स्वाधीन करून ठेवले होते व त्यामुळे त्याचा देह सर्वांना निष्प्राणच वाटला होता. ह्यावरून समाधिची परमात्म्यावरील अविचल श्रध्दा आणि वेदयोगविद्येतील नैपुण्यही दिसून येते. अर्थातच पुढे ऍफरॉडाईटच्या उजव्या हाताच्या करंगळी चिलोपसच्या रूपातील समाधिच्या उजव्या नाकपुडीत जाताच त्याच्या देहातील पंचप्राणाचा संचार पूर्ववत झाला. ह्यावरून आदिमाता, तिचा पुत्र त्रिविक्रम , त्याची बहीण ऍफरॉडाईट पाठीशी उभे असताना श्रध्दावानांच्या केसालाही कोणी धक्का लावू शकत नाही हे निर्विवाद सत्य सामोरी आले.
कालच दिनांक २९-१०-२०१५ रोजी बापू “श्रीशब्द ध्यान योग” शिकविताना म्हणाले होते अनाहतचक्र हे परमशिवाचे अनोखे मूल रूप आहे. कापूरासारखे पूर्ण शुध्द, पूर्ण पवित्र. ह्या चक्रावर ध्यान करण्याचा फायदा म्हणजे “क्षमा” क्षमेमध्ये “त्या”चे प्रेम आहे आणि ते एक “पित्याचे ” प्रेम आहे.
किती सुस्पष्ट बापूंनी अग्रलेखातून आधीच उदाहरण पण दिले आहे ना?
“श्री शब्द ” म्हणजे ” आईचे शब्द” आमचे बापू त्यांच्या “लाभेवीण प्रीती” मुळे , त्यांच्या अकारण कारूण्याने , कृपेने आम्हा सर्वांनाच हा आदिमातेच्या शब्दाचा कृपाप्रसाद देत आहे, जो आम्हाला असाच येणार्‍या बिकट संकटाच्या वेळी संरक्षणकर्ता ठरणार आहे.
बापूंनी ह्या तुलसीपत्र ११६८ च्या अग्रलेखात “वानरयोगसिध्दी” जी भारतवर्षात “हनुमानविद्या” किंवा “महाप्रणविद्या” किंवा “मरूतविद्या” ह्या तिन्ही नावांनी प्रचलित आहे आणि फक्त ब्रम्हर्षि वसिष्ठ आणि अगस्त्य ह्यांच्या नेतृत्वाखाली राहणार्‍या ’वानर’ समाजालाच ही शरीर लहानमोठे करणारी सिध्दी मिळू शकते असा उल्लेख केला आहे.
आपल्या बापूंनी आपल्याला आधीच “श्रीराम रसायन ” ही त्यांनी श्रीदत्तगुरुंच्या चरणांवर वाहिलेली रामगुणसंकीर्तनाची पुष्पांजली दिली होती.
त्यात बापूंनी स्पष्टपणे लिहीले होते की वानरसमाजाकडे योगमार्ग हा पूर्ण शुध्द स्वरूपात होता व त्यामुळे निर्गुण व निराकार परमपदाची व मोक्षमार्गाची श्रेयसप्राप्ती ह्याचीच त्यांना ओढ असे. परंतु परमेश्वराच्या चिदविलासाच्या भक्तिमार्गाची मात्र त्यांना विशेष ओढ नव्हती.
केसरीपत्नी अंजनी हिच्यावर बालपणीच अगस्त्य ऋषींचे संस्कार झाल्यामुळे अंजनीदेवी वेदवेदान्त ह्यांची जाणकार होती व अगस्त्यांच्याच गुरुपदेशामुळे महाविष्णूची भक्ती करत होती.
वानरसमाजाच्या योगमार्गास भक्तिमार्गाची जोड दिल्यास निशाचर राक्षसांचा वानरसमाजास होणारा उपद्रव नाहीसा करणे शक्य होईल , हा मंत्र अंजनीस अवगत झालेला होता व त्यानुसार तिची साधना व कार्य चालू होते.
पुढे बापूंनी हे ही सांगितले होते की ’ वानर ’ ह्या शब्दाचा मूळ अर्थच श्रेष्ठ नर असा आहे.
योगसिध्दींमुळे ह्या वानरांकडे लहान किंवा मोठे होणे , उड्डाण करून अवकाशसंचार करणे , इत्यादि अष्टसिध्दींच्या ताकदी होत्या.
अर्थातच अंजनीमातेच्या सांगण्यानुसार ज्या वानरांनी ब्रम्हर्षि वसिष्ठ आणि अगस्त्य ह्यांच्या नेतृत्वाखाली राहण्याचे मान्य केले असेल अशाच वानरांना ही सिध्दी मिळू शकली असणार.
म्हणजेच परमात्म्याला शरण जाणार्‍या मानवालाच सिध्दी खर्‍या अर्थाने सहाय्यकारी ठरू शकते.

समाधि वैश्य ह्याने सुध्दा हायपेरिऑनच्या सहाय्याने आधी अध्यात्मातील वरच्या श्रेणीच्या साधकाच्या स्थानाची प्राप्ती केली होती म्हणजेच प्रथम
परमात्म्याच्या चरणी शरणागती म्हणजेच भक्तीमार्ग स्विकारल्यानंतरच “वानरयोगसिध्दी” ही विद्या त्याला मिळविता आली असावी. बापूंनी सुध्दा आधी आपल्याला भगवंतावरील भक्ती, चण्डिकाकुलाची भक्ती, आदिमातेच्या चरणी अंबज्ञता शिकविली आणि नंतरच ते आपल्याला “श्रीशब्दध्यान योग” शिकवीत आहेत.
ह्यावरून आदिमातेच्या आणि तिच्या पुत्राच्या त्रिविक्रमाच्या चरणी अंबज्ञता आम्हाला सर्वकाही मिळवून देऊ शकते ह्याची १०८ % प्रचिती येते.
बापूराया ही तुझ्या चरणीची आणि आदिमातेच्या चरणीची शरणागती, अंबज्ञता सदैव आमच्या जीवनी राहो हीच तुझ्या चरणी प्रार्थना !!!
येथे त्रिविक्रमाचा शब्द सर्व युगुलांना खूप मोठे आश्वासन देतो की ताटातूट झाली काही काळापुरती तरी नंतर सुखाने एकत्र नांदाल. अर्थातच त्रिविक्रमाचा शब्द , माझ्या बापूरायांचा शब्द हाच त्रिकालाबाधित एकमेव सत्य आहे !
जय जगदंब जय दुर्गे
हरि ॐ . श्रीराम. अंबज्ञ.