Nimrod, Semiramis, Horemakhet, Solomon, Nuit, Shukracharya, Nyx, Minos, Typhoon

Anant Chaturdashi 2018 – AADM Seva Details Forums वैश्विक वास्तव (The Universal Truth) प्रारंभ Nimrod, Semiramis, Horemakhet, Solomon, Nuit, Shukracharya, Nyx, Minos, Typhoon

#205833

Nandan Bhalwankar
Participant

कालच शुक्रवार दिनांक १७ एप्रिल २०१५ च्या दैनिक प्रत्यक्ष मधील अग्रलेख वाचला. वाईट दुर्जनांनी अशुभ उत्पन्न करण्याचा कितीही जरी प्रयत्न केला, तरी त्या अशुभनाशिनी आदिमाता आणि तिच्या पुत्रापुढे कुणाचेही काहीही चालू शकत नाही हे या लेखात अगदी प्रकर्षाने जाणवते. निमरॉड-सेमिरामिस, हॉरेमाखेत-सॉलोमन- नुईट, शुक्राचार्य-निक्स-मिनॉस आणि टायफॉन (Nimrod, Semiramis, Horemakhet, Solomon, Nuit, Shukracharya, Nyx, Minos, Typhoon) अशा चारही चांडाळचौकडीने जाहबुलॉनच्या (Jahbulon) निर्मितीचा लपूनछपून कितीही जरी प्रत्यत्न केला, तरीही अॅफ्रोडाईट-हर्क्युलिस आणि म्हणूनच श्री त्रिविक्रम(Trivikram) आणि आदिमातेच्या नजरेतून काहीही कधीही सुटूच शकत नाही. त्यांना काही माहित नाही असे काही असूच शकत नाही. काही अग्रलेखांपूर्वीच आपण सार्‍यांनीच वाचले की श्री त्रिविक्रमाने जाहबुलॉनची कशी दाणादाण उडवली आणि वाट लावली. युगानुयुगे आणि कल्पानुकल्पे या परमात्म्याने असुरी प्रवृत्तीचा समूळ नाश घडवून शुभाची निर्मिती केली आहे. जाहबुलॉन, बिलझेबब(Beezlebub), सैतान, मेम्मॉन कोणीही असो, त्या आदिमाता महालक्षीपुढे हे सर्व शुल्लकच आहेत. मातृवात्सल्यविंदानम्‌ मधे आपण हे वाचतोच.

या अग्रलेखमालेतून आपल्याला अजून एक गोष्ट लक्षात येते की असूरी प्रवृत्तीच्या लोकांचे काही सांगता येत नाही. कोण कोणाच्या संघात आणि कोण कुणाच्या विरूद्ध हे कुणालाच समजू शकत नाही. ह्या वाईट लोकांचा एकमेकांवरचा अविश्वास, निष्ठेचा अभाव आणि अप्रामाणिकपणा या अग्रलेखांतून ठासून जाणवतो. हे लोक कधीच कुणाशी एकनिष्ठ राहू शकत नाहीत. एकमेकांविरूद्धच कारस्थाने करण्यात यांचा वेळ वाया जातो. काय होणार अशा लोकांचे?

याशिवाय अॅफ्रोडाईट-हर्क्युलिस (Aphrodite, Hercules) यांचे पवित्र प्रेम वाचून तो प्रसंग अगदी डोळ्यासमोर येतो. त्या दोघांचे एकमेकांवरचे एवढे प्रेम पाहून ते एकमेकांना याबद्दल कधी सांगणार याची मनात कुठेतरी उत्सुकता निर्माण होते.