Nimrod and Habesha province

#210691

Sailee Paralkar
Keymaster

Nimrod and Habesha province

॥ हरि ॐ ॥

सद्गुरु श्री अनिरुद्ध बापू लिहित असलेल्या अनुनाकीयांवरील (Annunaki) अग्रलेखांमधून अनेक महत्त्वाच्या गोष्टी समोर येत आहेत. तुलसीपत्र क्रमांक ११०३ मध्ये हाबेशा (Habesha) प्रांतातील टेकडीचे वर्णन दिले आहे. निमरॉड(Nimrod) स्वत:च्या मनात विचार करीत असताना ती टेकडी कशी बनविली गेली हे आपल्या समोर येते. या नीच लोकांची कोणतीच गोष्ट खरी नसते. दिसतं तसं नसतं, याचा वारंवार प्रत्यय आपल्याला या लोकांच्या खोट्या गोष्टींवरून येतो.

टेकडीवरील चित्रांचा अभ्यास करताना ती प्रथम लाल रंगात कोरून नंतर त्यावरून जांभळ्या रंगाचा लेप लावल्याचे राफेल स्पष्ट करतो. यावेळी गरुड (Eagle) पंथीयांची वैशिष्ट्ये आणि गरुड प्रमुखाचे विशेष गुण दिसून येतात. कारण त्या टेकडीवरील ती चित्रे आणि त्यावर कोरलेले शब्द फक्त गरुडप्रमुखच वाचू शकतो. यावरूनच या गरुड समाजाचे महत्त्वाचे स्थान असल्याचे लक्षात येते. तसेच या लेखात ‘मेनहिर’ (Menhir) पाषाणांचाही उल्लेख येतो व त्या पाषाणांना फोडून आत गुहा बनविता येत नाही, ही नवीन गोष्टही कळली.