Nile river, Saturn planet and Bermuda Triangle

#218437

Sailee Paralkar
Keymaster

Nile river, Saturn planet and Bermuda Triangle

हरी ओम,

सध्याची जी बापूंची अग्रलेखमाला जी चालू आहे त्यामध्ये बापूंनी शनि ग्रह(Saturn planet), साडेसाती, नाईल नदी(Nile river) यासारख्या अनेक रहस्यांचा उलगडा केला. तसाच २४ एप्रिलच्या अग्रलेखात अजून एक अत्यंत महत्वाचा उलगडा केला तो म्हणजे ‘बर्म्युडा ट्रॅंगल’. (Bermuda Triangle) आपण अनेक वेळा ऐकले आहे, वाचले आहे विमाने, जहाजे अचानक कुठूनतरी बेपत्ता झाली, ती परत अजून पर्यंत कधी सापडलीच नाहीत. अजूनही बर्म्युडा ट्रॅंगल (Bermuda Triangle) अस्तित्वात आहे म्हणजे हे युद्ध अजून चालूच असेल कदाचित. याबाबत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बापूंनी सांगितली आहे हा त्रिकोण नष्ट करणे खूपच कठीण आहे. कारण ह्याचा विध्वंस करू पाहताच संपूर्ण वसुंधराच जागोजागी ज्वालामुखीनी ग्रस्त होऊन जाईल. म्हणजे सगळ्यात मोठे विध्वंसकारक शस्त्र त्यांनी बनविले आहे.
बर्म्युडा ट्रॅंगल या विषयावर इंटरनेटवर सर्च केल्यावर ह्याचा उल्लेख Devil’s Triangle असाच आला. विकीपेडिया ह्या वेबसाईटवर देखील ह्याचा असाच उल्लेख आहे. याचाच अर्थ ह्याला उघडपणे याला Devil’s Triangle असे म्हंटले जाते. हा ट्रॅंगल कितीही विध्वंसकारक असला तरी आपली ‘महादुर्गाच’ याचा नाश करू शकते ह्यात शंकाच नाही.

दुसऱ्या घटनेमध्ये सभागृहातील संगणकावर माता सोटेरियाला बघतात तेव्हा तिच्या चेहऱ्यावरून छद्मि हास्य असून तिने तिच्या डाव्या हातात बावारचे डोक्यावरील केस पकडलेले असतात हे बघून सभागृहातील प्रत्येक जण निश्चिंत मनाने महादुर्गेचा जयजयकार करतात ही गोष्ट मला खूप महत्वाची वाटते माता सोटेरियाला बघून सर्व व्रती तिचा उदो उदो नाही करत तर महादुर्गेचा जयजयकार करतात म्हणजेच प्रत्येक गोष्ट ही महादुर्गाच त्यांच्याकडून करून घेते ह्यावर त्यांचा किती विश्वास आहे हे दिसून येते.

अम्बज्ञ
साईलीवीरा परळकर