Nephilim attacking Demeter’s Abode

#115909

Sachin Rege
Participant

हरि ओम् दादा!

हरि ओम् अजितसिंह, तुमचं म्हणणं बरोबर वाटतंय. आतापर्यंत ह्या अग्रलेखमालिकेत येऊन गेलेलं युद्धाचं वर्णन बघितलं, तर ह्या ‘धर्म विरुद्ध अधर्म’ युद्धात धर्माच्या बाजूने लढणाऱ्या श्रद्धावानांचं परमेश्वरी यंत्रणेकडून व्यवस्थित संरक्षण केलं जात असल्याचं दिसून येतंय – मग ते अफ्रोडाईट-हर्क्युलिसच्या रूपाने असेल, सम्राज्ञी अल्केमिनीच्या (Alkemini)रूपाने असेल किंवा ड्रुईडपंथीयांचं (Druid)सर्वोच्च ‘दैवत’ जाहबुलॉनचे (Jahbulon)तो निर्माण होताच हातपाय तोडणाऱ्या स्वत: त्रिविक्रमाच्या रूपाने असेल; पावलोपावली श्रद्धावानांचं संरक्षणच होताना दिसतंय. तेव्हा ह्याही प्रसंगात तुम्ही वर व्यक्त केलेल्या मतासारखंच झालेलं असावं असं मानायला खूप जागा आहे.

आधीच्या अग्रलेखातील (हजारो सैनिक नेफिलिमांचा डेमेटरच्या(Demeter) गृहावर हल्ला झाल्यावर) ‘सम्राट झियस (Zeus)जराही न डगमगता अतिशय शांतपणे परंतु अतिजलद वेगाने सर्व व्यवस्था करू लागला’ – हे शेवटचं वाक्य खूप काही सांगून जातं असं मला वाटतं. मुख्य म्हणजे सर्व व्रती सदस्यांचा मानवी आधारच मानली जाऊ शकेल, अशी जी करारी डेमेटर थाडाच्या रूपात निर्भयपणे वावरत असलेली दिसतेय. ‘जिच्या चेहऱ्यावरील करारी तेज त्या सहाही जणांना एका क्षणात बळ देऊन गेलं’ असं जिचं वर्णन केलेलं आहे, ती डेमेटर सुखरूप असल्याचं पाहून इतर सर्व जणही सुरक्षित असती असं मानायला नक्कीच जागा आहे.

असो. पण बापूंनी सांगितल्याप्रमाणे हा खराखुरा घडून गेलेला इतिहास आहे, कपोलकल्पित कथा नव्हे. त्यामुळे त्या वेळेस काहीही घडून गेलेलं असू शकतं – ह्या आपल्या ‘जर-तर’ शंकांचं निरसन होण्यासाठी पुढील अग्रलेखापर्यंत वाट पहावी लागणार!