Nectar Nevus and Divine Pillar

#495927

Suneeta Karande
Participant

हरि ॐ.
दिनांक १०-११-२०१५ चा अग्रलेख – तुलसीपत्र ११७३ वाचताना उल्लेख आला की पार्नासस पर्वतरांगामध्ये अनेक गुंफा लेटोनेच तयार करवून घेतल्या आहेत व त्या गुंफांमध्ये माता अल्केमिनीचे भारतवर्षातून आलेले सैन्य त्यांच्या कुटूंबीयांसह राहत आहे व राजा इथर त्याचा प्रमुख आहे. त्यामुळे
वसुंधरेची अमृतनाभी (Nectar Nevus) असणार्‍या त्या दिव्य स्तंभाच्या (The Divine Pillar) भोवती त्या तळ्यामध्येच लेटोने जे छोटेसे बेट तयार करवून घेतले होते त्यावर राहून सुरथ (सॉरेथस) व आर्यमा (एरिस) ह्या दोघांना त्यांनी भारतवर्षात राहून शिकून आलेल्या स्वस्तिकविद्येनुसार ऑरगॉनचा संचय करायचा होता एका सुयोजित वेळेपर्यंत. आणि त्यासाठी ती जागा पूर्णपणे सुरक्षित असणे अत्यंत जरूरीचे होते. राजा इथरच्या आज्ञेनुसार एकही सैनिक किंवा इतर मनुष्य त्या तळ्याच्या आसपास येणार नाही ह्याची ही दक्षता बाळगली गेली होती. राजा इथर तेथील एका सर्वोच्च सुळक्यावर दुर्बिणीतून त्या दोघांवर सतत लक्ष ठेवून होता.

ह्या आधी दिनांक ४ जानेवारी २०१५ च्या तुलसीपत्र १०६१ मध्ये बापूंनी लिहिले होते की अमृततनाभी शोधण्याबरोबरच त्या दोघींना ( माता अल्केमिनी व लेटो ) तेथील गुहांमध्ये अनेक माणसांना गुप्तपणे राहता येईल अशी रचनाही करायची होती. त्याचे कारण फक्त अल्केमिनीलाच माहित होते व लेटोने कधी तिला विचारले नव्हते. त्या गुप्त योजनेमागचे कारण आज १० नोव्हेंबरच्या अग्रलेखातून कळले. परंतु येथे मला लेटोचे खरेच कौतुक वाटते की किती दृढ विश्वास होता तिचा अल्केमिनीवर की तिला कधी आपण जे काही करतो आहोत त्यामागचे कारण जाणून घेण्याचीही इच्छा झाली नाही.
तसेच सुरथ आणि आर्यमाच्या बाबतीत आढळते माता अल्केमिनी त्यांना त्यांचे ऑरगॉनचा संचय करण्याचे कार्य़ पूर्ण होण्याची खूण सांगते की येथून माझ्या खांद्यावरूनच उडालेला तो पवित्र गरूड येथे येऊन ह्या स्तंभावर बसेल ही खूण समजावी आणि त्या गरूडापाठोपाठच पुढील सर्व व्यवस्था तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येईल. त्याची माहिती सध्या देणे शक्य नाही. ह्या सर्वांच्याच कार्यात काही गुप्तता पाळल्या जात होत्या ज्या कार्याच्या पूर्णतेच्या व सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक होत्या पण कधीच कोणीही का, कसे , कशासाठी हे प्रश्न कधीच विचारत नाही. ह्यालाच म्हणतात ” एक विश्वास असावा पुरता कर्ता हर्ता गुरु ऐसा ” माता अल्केमिनीचे स्थान ह्या सर्वांनाच अत्यंत आदराचे , मानाचे होते, हे निर्विवाद सत्य आहेच ह्या मागे दडलेले.
येथे बापूराया तुम्हीच आठवून दिले ते मातृवात्सल्यविन्दानम् ग्रंथात तुम्ही लिहिलेले प्रभु परशुरामाचे आचरित !
सरतेशेवटी प्रभु श्रीरामचंद्राच्या अवताराचे माधुर्य हृदयात घेऊन ते जगत्वंद्य , पुरुषोत्तम परशुराम श्रीरामांस आशीर्वाद देऊन परत तपश्र्चर्येसाठी निघाले.
आता परशुरामाच्या मनात एक प्रश्न उठू लागला ,” परमेश्वराने त्याच्या कार्याच्या ज्या प्रथम खंडासाठी मला पाठविले होते, तो खंड तर समाप्त झालेला आहे व त्या कार्याचा द्वितीय खंड हा क्षत्रियश्रेष्ठ रूपातील श्रीरामचंद्र पूर्ण करणार आहे. मग ’चिरंजीव अवतार’ म्हणून पाठविलेल्या ह्या परशुरामाचे पुढील कार्य काय?”
प्रभु श्रीपरशुरामांना पूर्ण स्मरण होते की परमेश्र्वराने अर्थात आपल्या परमपित्याने आपणास पाठवितानाच ’श्रीरामभेटीनंतरच्या तुझ्या जीवनाच्या उत्तरार्धातील तुझ्या कार्याची जाणीव तुला तेव्हाच होईल ’ असे सांगितले होते.
ती आठवण मनात घेऊन व चिंतन करीत प्रभु श्रीपरशुरामांनी तपश्र्चर्येस आरंभ केला.
ह्या सर्वांचेच “का” संपले होते कारण मला वाटते त्यांनी त्यांच्या गुरुंच्या चरणी अतूट विश्वास ठेवला होता .

बापू ३०.०१.२०१४ च्या प्रवचनात म्हणाले होते की आमचा विश्वास कमी पडतो का? कारण आमचा स्वत:वर विश्वास नसतो. ह्यालाच आपण थर्व – गोंधळ (confusion) म्हणतो. हे करायचं की ते करायचं हीच गोंधळाची परिस्थिती असते. अथर्वशीर्ष मस्तकातला गोंधळ (confusion) दूर करतं. अथर्वचा दुसरा अर्थ आहे पूर्ण माहिती, ज्ञान. (complete / detailed knowledge)
आमचा परमात्म्यावरचा विश्वास डळमळीत का होतो? राम आला तेव्हा फक्त वानरांनीच त्याला पुजलं, कृष्णाला पाच पांडव आणि गोपांशिवाय कोणीही देव मानलं नाही, साईबाबा जिवंत होते तेव्हा आता जेवढी गर्दी होते त्याच्या एक शतांश लोकही त्या काळात नव्हते. कारण त्यांच्याकडे बघताना तो देव आहे हे कोणाला कळलंच नाही. आम्ही त्याच्यात देव बघत असतो. आम्हाला त्याला आधी बेस्ट मानव मानलं पाहिजे. त्याच मानवत्व पटलं पाहिजे, तरच त्याला देव मानता येईल. ज्यांना हे कळलं ते खूपच भाग्यवान होते. कैकयी, मंथरा, कौरव, यादव – यादव तर प्रत्यक्ष कृष्णाच्या राज्यात राहत होते. पण काय झालं? Physical presence does not matter. आम्ही त्याच्या जवळ physically आहोत ह्यामुळे तो खूश होणार नाही. आमचे प्रेम किती आहे, विश्वास किती आहे हे महत्वाचे आहे. चण्डिकाकुलाचं नातं प्रेम आणि विश्वास ह्यावरच असतं. प्रेम आणि विश्वास आहे का? हे महत्वाचं आहे. आमचं प्रेम, विश्वास कमी पडत असेल no problem पण माझं aim १०८% प्रेम आणि विश्वास वाढवणं हेच हवं. त्याच्यावर पूर्ण प्रेम आणि विश्वास करता आलाच पाहिजे. आपल्याला आपल्यातल्या चांगल्या गोष्टींचा शोध घ्यायचा आहेच, त्याच्याबरोबर मला त्याची प्रत्येक चांगली गोष्ट घ्यायची आहे, अनुभवायची आहे. आमच्यातले कमी points आपल्याला down करतात, तसंच आम्ही देवामध्ये कमीपणा शोधतो तेसुद्धा तेच करतं.
बापू तुम्ही म्हणाला होता की आदिमातेने पहिली सीट घेतली की तुम्ही -१८ असाल आणि तुमची श्रद्धा असेल तरी उत्तर १०८ च असते. तिच्या कारुण्यामुळे तिचा जेष्ठ पुत्र महाप्राण तुमचं जीवन चालवत असतो. तिचा तृतीय पुत्र परमात्मा, तुम्ही खरंखुरं प्रेम करता, तेव्हा तुमचा नंबर तो स्वत: ठरवतो कारण तो तुमच्यातच राहत असतो. आम्हाला जीवनात कळलं पाहिजे, गरज + मी = दुर्बलता, दुर्बळ + मी = फालतू, फालतू + मी = अपयशी, अपयशी + मी = नैराश्य, नैराश्य + मी = पूर्ण वाया, व्यर्थ गेलेला.

त्याच्यावरचा विश्वास असणारा, चण्डिकाकुलावरचा विश्वास असणारा मी म्हणजे विश्वासू मी + माझी गरज = सामर्थ्य. गरज माणसाला असतेच. माझा त्याच्यावर विश्वास असला, चण्डिकाकुलावर विश्वास असला की मग आयुष्यातली प्रत्येक गोष्ट ह्या अल्गोरिदममधून पुढे जात राहते. विश्वासू मी + माझी गरज = सामर्थ्य, सामर्थ्य + विश्वासू मी = गरजपूर्ती. विश्वासू मनुष्याची गरज त्याला समर्थ बनवते. विश्वास नसणार्या मनुष्याची गरज त्याला दुर्बळ बनवते. हा अल्गोरिदम तुम्हाला समर्थ करणारा आहे. म्हणून ह्याचं नाव काय आहे? विश्वासू मी + गरज = सामर्थ्य आणि सामर्थ्य कसं तर सतत वाढत जाणारं. म्हणून ह्याला ‘अनिरुद्ध गती’ अल्गोरिदम म्हणतात. हा अनिरुद्ध अग्लोरिदम आहे. हा आयुष्यात आल्याशिवाय काहीही होऊ शकत नाही. मी + गरज = दुर्बलता हा अल्गोरिदम वृत्रासुराचा आहे. वृत्रासुराला परमात्मा बनण्याची इच्छा आहे. तिच्या पुत्राला काही बनण्याची इच्छा नाही. तुम्हाला वृत्रासुराचा अल्गोरिदम हवा की अनिरुद्धाचा अल्गोरिदम हवा ह्याचा तुम्हाला choice आहे.
बापू आज ह्या तुलसीपत्रांच्या अग्रलेखातून तुमचे बोल अजून स्प्ष्टपणे उलगडू लागले आहेत तुमच्याच कृपेने. मला माझ्यातला “का” संपवायचा असेल तर मला आधी ‘अनिरुद्ध गती’ अल्गोरिदम स्विकारायलाच हवा आणि बापू तुमच्या कृपेने तो जीवनात येणारच आहे. ह्याच विश्वासाची अत्यंत गरज होती जो कदाचित नव्हताच आणि Physical presence does not matter हीच गोष्ट तुला शिकवायची होती. निदान ” आता तरी ” हा ‘अनिरुद्ध गती’ अल्गोरिदमच तू दिलेल्या जीवनात कार्यरत व्हावा आणि “एक विश्वास असावा कर्ता हर्ता बापू ऐसा” ह्याचीच परिपूर्तता तुझ्या चरणी होवो हीच प्रार्थना ! मला आता माझा choiceच नको, फक्त “तू आणि एकमेव तूच” माझा choice होवो !

जय जगदंब जय दुर्गे

हरि ॐ. श्रीराम.अंबज्ञ.
सुनीतावीरा करंडे