mystery of Bermuda Triangle

#220239

Sangita Vartak
Participant

mystery of Bermuda Triangle

हरि ॐ,

एवढ्या वर्षांचा अनुभव आहे की आपल्याला अनेक प्रश्न असतात. काही प्रश्न तर आपण विसरूनही जातो की हे प्रश्न आपल्याला पडलेले होते. पण अनेक वेळा आपले लाडके परमपूज्य सद्‍गुरू श्री अनिरुद्ध बापूच आपल्याला प्रश्नांची उत्तरे देतात, मग ते प्रवचनातून, कृपासिंधुतून, अग्रलेखातून किंवा अशा अनेक मार्गातून असो. मग अनिरुद्ध बापूंकडून उत्तर ऐकल्यावर आठवते हा प्रश्न मला पडला होता त्याचे उत्तर मिळाले. मनात प्रश्न पडला आणि बापूंनी प्रवचनात उत्तर दिले असे बहुतेक सर्वच श्रद्धावानांचा अनुभव आहे.

लहानपणीपासून मला बर्म्युडा ट्रँगल (mystery of Bermuda Triangle) विषयी खूप कुतूहल वाटायचे. जस जशी समज वाढली तस तसे कुतूहलही वाढत राहिले आणि त्याबरोबर भितीही. मला वाटते हे माझेच असेल असे नाही. बहुतेकांना या बर्म्युडा ट्रँगल (Bermuda Triangle) विषयी भितीयुक्त कुतुहल नक्कीच असणार. परंतु त्यावर मनाजोगे उत्तर मिळालेच नव्हते. बापू त्यांच्या अग्रलेखातून अनेकाविध माहीती देत असतात. प्राचिन असा खरा इतिहास शिकविताना आनिरुद्ध बापूंनी (Aniruddha Bapu) त्यांच्या अग्रलेखातून शनि ग्रह, साडेसाती, नाईल नदी आदिंबाबत माहीती दिली आहे. आता बर्म्युडा ट्रँगल (Bermuda Triangle) विषयी पण माहिती दिली. त्याची भिषणताही लक्षात आली. हे श्रद्धाहीन कसे ना किती planing करतात आणि तेही किती विध्वंसिक प्रेरणेने. पण एक मात्र खरे की कोणी आणि कितीही प्रयत्न केले आणि षडयंत्र रचले तरी ती महदुर्गा (Mahadurga) त्यांची इच्छा पूर्ण होऊच देणार नाही आणि त्या श्रद्धाहिनांना अपयशच येणार हे मात्र ठरलेलेच आहे.

अंबज्ञ…