mystery behind Bermuda Triangle, Saturn Planet and Nile River

Forums वैश्विक वास्तव (The Universal Truth) प्रारंभ mystery behind Bermuda Triangle, Saturn Planet and Nile River

#214420

Sailee Paralkar
Keymaster

mystery behind Bermuda Triangle, Saturn Planet and Nile River

॥ हरि ॐ ॥

तुलसीपत्र – ११०५ मध्ये आज अनिरुद्ध बापूंनी (Aniruddha Bapu) अजून एक महत्त्वाचा खुलासा केला आहे….बर्म्युडा ट्रँगल…..(Bermuda Triangle) काही दिवसांपूर्वीच बापूंनी अनुनाकीयांवरील या लेखांमधून शनि ग्रह (Saturn Planet) कसा तयार केला गेला, नाईल नदी (Nile River) म्हणजे वास्तवात काय आहे, याचे रहस्य उलगडले होते. आजच्या अग्रलेखात बापूंनी बर्म्युडा ट्रँगल बद्दलची खरी माहिती आपल्या समोर आणली आहे. अतिशय व्यवस्थितरित्या सगळ्यांना कळेल अशा पद्धतीने बापूंनी बर्म्युडा त्रिकोण म्हणजे नक्की काय हे सांगितले आहे. आत्तापर्यंत याबद्दल अनेक कथा तसेच शास्त्रीयदृष्ट्या कारणे मांडणारी पुस्तके वाचली होती. पण यापैकी कोणीही समाधानकारक माहिती या जागेबद्दल दिली नव्हती. बहुधा कोणालाही आत्तापर्यंत या जागेचे कोडे उलगडलेले नसावे असे वाटते. पण बापूंनी मात्र याबाबत माहिती देताना सर्व बाजूंची परिस्थिती सांगून त्यामागील कारणे स्पष्ट केली आहेत. आणि अतिशय सहजपणे या गोष्टीची उकल करून दिली आहे. त्या स्थानावर ग्रे लोकांची वस्ती असून त्या त्रिकोणाच्या बाजूला अजून दोन बेटे आहेत. याबरोबरीने अग्रलेखात आलेल्या आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी :

* माता सोटेरियाने (Matriarch Soteria) बावरची केलेली दयनीय स्थिती. सम्राट युरॅनसने आधीच म्हटल्याप्रमाणे हॉरेमाखेतचे आता काही खरे वाटत नाही.
* हर्क्युलिस (Hercules) व इपेटसने (Epetus) लेव्हियाथानची (Leviathan) दिलेली माहिती.
* पर्णमान (पनामा – Panama) येथील समुद्र किनार्‍यावरील लेव्हियाथानमुळे खचलेली जमीन
* हर्क्युलिसला बर्म्युडा त्रिकोणाच्या विरुद्ध दिशेला सापडलेली मोठी वास्तू व त्यावरील चिन्ह
* ही वास्तू म्हणजे सॉलोमनला बांधावयाच्या असलेल्या जाहबुलानच्या (Jahbulon) मंदिराची प्रतिकृती आहे.
* सम्राट युरॅनसच्या (Uranus) म्हणण्याप्रमाणे हॉरेमाखेत, सॉलोमन, टायफॉन व केरीडवेन ही युती

परमेश्‍वराच्या विरोधात असलेली ही सगळी वाईट मंडळी कशाप्रकारे त्यांच्या योजनांची आखणी करीत असतात आणि त्याला बळ देत असतात, हे देखील या घटनांमधून दिसून येते.