mention of weapons like Lazer Ray Gun and Missile Launcher

#76775

Ajitsinh Padhye
Participant

विशाखावीरा, तुम्ही अल्केमिनी(Alcmene) विषयी जे मत मांडलय ते मलाही पटलं. आजच्या अग्रलेखात आलेल्या वर्णनानुसार, फॉसिस नामक दरीकडे जाण्यास निघालेली लेटो(Leto) ही शस्त्रास्त्रांनी युक्त (तिच्याकडे लेझर रे(Lazer Ray) गन व मिसाइल लॉन्चर (Missile Launcher)असल्याचे उल्लेख मागील अग्रलेखात आले होते) असली, तरी पुढे जाऊन तिच्यासमोर उभे ठाकणा-या सेटू लोकांच्या आक्रमणाच्या भीषणतेची कदाचित तिला कल्पना नसावी. हे ओळखून अल्केमिनी तिच्या मदतीला धावून येते आणि दोघी मिळून सेटू लोकांचे आक्रमण परतवून लावतात. आजच्या अग्रलेखात उल्लेख आल्याप्रमाणे लेटोने तिच्याकडील “सर्वश्रेष्ठ किरणतमंचाने (लेझर गन)” सेटूप्रमुखावर नेम धरूनही, तिच्या हातातील शस्त्र खाली करून अक्लेमिनीने स्वत:कडील एका नलिकाशस्त्राचा चाप ओढून त्या सेटूप्रमुखाला फक्त ग्लानीत ठेवण्यापुरते त्याच्यावर प्रहार केला. “त्या सेटूप्रमुखाकडून आपल्याला सर्व माहिती मिळवता येईल” ह्या उद्देशाने मी हे केले आहे असे स्पष्टीकरणही ती लेटोला देते. ह्यावरून अल्केमिनीची दूरदृष्टी आणि चाणाक्य बुद्धीमत्ताही समोर येते.

पण शेवटी त्या सेटू लोकांच्या प्रमुखाबद्दल जे वर्णन आलंय, तो नेफिलीम असल्याचे कळते. तो त्याचा मुखवटा नाही हे ही लेटो सिद्ध करते. त्याचप्रमाणे तो नेफिलीम आहे हे पाहिल्यावर “दोघींनाही आश्चर्याचा मोठाच धक्का बसला” असाही उल्लेख येतो. ह्या गोष्टीमुळे मूळ कथानकाला पुन्हा एकदा एक जबरदस्त कलाटणी मिळाली आहे. नाही का ?