Reply To: Megha a sincere devotee and his journey on the path of Bhakti-devotion

Forums Reply To: Megha a sincere devotee and his journey on the path of Bhakti-devotion

#806

smita ghule
Member

Megha a sincere devotee and his journey on the path of Bhakti-devotion

हरी ॐ!!
मेघाबद्दल मला भावलेल्या २ गोष्टी :
१) माझ्या साईशंकराला बेल आवडतो म्हणून तो रोज दीड कोस पायी चालत जात असे व बाबांसाठी बेल आणत असे . माझ्या देवाला जे आवडते ते करण्यासाठी वाट्टेल ते कष्ट घ्यायची त्याची तयारी होती . बाबांच्या प्रेमाने तो अक्षरशः झपाटलेला होता . मेघाचे हे बाबांसाठी झपाटलेपण मला खूप भावते .
सद्गुरू हि नेहमी सांगतात : भक्ती हि बेभानपणे व्हायला हवी व सेवा सभानपणे .
२) मेघा निवर्तला तेंव्हा खरे तर तो या साई परमात्म्याकडेच गेला होता . मेघा निवर्तल्यानंतर बाबांच्या कानावर कुणाचे तरी शब्द पडतात ” याचे कुणी नाही .”
त्यानंतर बाबा मेघाच्या अंत्ययात्रेत शोक करत स्वतः सामील होतात व मेघाला अग्नी देताना स्वतः मंत्र म्हणतात . यावरून बाबांचे मेघासाठी असलेले प्रेम , बाबांचे कारुण्य दिसून येते . भले मेघाचे कोणी रक्ताचे नातेवाईक नसतील , पण मेघा माझा आहे आणि मेघाचा मी सख्खा आप्त आहे – कोणत्याही सख्या नातेवाईका पेक्षा सख्खा व तो गेल्याने मला फरक पडणार आहे , हेच बाबांना दाखवून द्यायचे होते . एवढे , आकाशापेक्षाही जास्त प्रेम आपल्या प्रत्येकावर करणारा हा एकमेव साईच !!