Medusa a disciple of Semiramis

#438005

Medusa a disciple of Semiramis

हरि ॐ.
दिनांक ०१-१०-२०१५ चा अग्रलेख तुलसीपत्र ११५६ वाचताना एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात आली की श्रध्दाहीन किंवा हे वामाचारी पंथीय एकमेकांना स्वत:च्या बंधनात , स्वत:च्या नियंत्रणाखाली ठेवण्याचा मनोनियंत्रणाद्वारे आटोकाट प्रयत्न करीत असतात सततच, तरी देखिल एक जण दुसर्‍यावर कधी मात करून, कुरघोडी करून पुढे निघून जाईल व त्याची स्वत:ची विद्या किंवा कौशल्य वापरण्यास असमर्थ ठरेल ह्याबाबत सारे काहीच संशयास्पद अवस्थेत राहते. सेमिरामिसला(Semiramis) मेड्युसा(Medusa) ही तिची लाडकी एकमेव शिष्या असल्याचा समजही होता आणि अभिमानही होता. पण ह्या लेखात आपण पाहतो की मेड्युसाने तिच्या बरोबर असणार्‍या वृध्द टेरीला सेमिरामिसचेच कवच घातले असल्याने खुद्द सेमिरामिसला सुध्दा ते कवच तिच्या निकेजा(Nikeja) कुविद्येच्या सामर्थ्यानेही प्रभावरहीत करता येत नव्हते आणि ते छेदणे तर अशक्यच झाले होते. मेड्युसाचा मारडूकवर विश्वास होता पण मारडूक हा तिच्यापासून कधीच वेगळा झाला होता आणि उलट त्याने तिचा वापरही केला होता आणि तिची घोर फसवणूक करून उलट तिलाच बाबेला, हेडिस आणि टायफॉनच्या विरोधात उभे करून दिशाहीनही केले होते. सेमिरामिस आणि मेड्युसा ह्या दोघीही एकट्या पडल्या होत्या. आधी शुक्राचार्यांच्या अधिपत्याखाली वागणारी निक्स एका क्षणाला कशी भारी पडते आणि त्यांच्या सत्तेऐवजी तेच स्वत: निकसच्या ताब्यात जाऊन तिच्या हातचे एक कळसूत्री बाहुले बनलेले सध्या तरी दिसत आहे हे आपण मागच्या काही भागांमध्ये वाचले होते.
याउलट मेड्युसाच्या ’क्रतक्षक’ कुविद्येच्या प्रभवातून निर्माण झालेल्या नागकवचापासूनही टेरी उर्फ हर्मिसला काही बाधा होत नव्हती कारण त्याच्या गळ्यात महामाता सोटेरियाने स्वत:च्या गळ्यात तीन दिवस धारण केलेली व वेगवेगळ्या खोट्या मण्यांच्या रूपात दडवलेली रूद्राक्षमाळा घातली होती . त्यामुळे हर्मिस हा अत्यंत शांत चित्ताने, स्वत:विषयी जराही काळजी न घेता निर्धास्तपणे कार्य करू शकत होता. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे गळ्यातील त्या रूद्राक्षमाळीतील केवळ “मेरूमण्याला” स्पर्श करून केवळ मनानेच त्याने महामाता सोटेरिया व हायपेरोऑनला टायफॉन, सेमिरामिस आणि मेड्युसा ह्यांच्या परिस्थितीचा अंदाजही दिला होता.
यावरून अशुभाची ताकद पावित्र्याला जराही क्षीण करूच शकत नाही आणि मनोनियंत्रणाखाली वा बंधनात तर ठेवूच शकत नाही हे सिध्द झाले.
हे वाचतानाच नामाची , पावित्र्याची प्रचंड ताकद , सामर्थ्य तर जाणवलेच आणि आठवली पुण्याच्या प्रवीणसिंह वाघांची बिकट अवस्था. अत्यंत कराल अशा पिशाचाच्या तावडीत सापडले असतानाही केवळ गळ्यातील आपले सदगुरु बापू ह्यांच्या त्रिपुरारी त्रिविक्रम लॉकेट मुळेच ते पिशाच्च प्रवीणसिंहाच्या केसालाही धक्का लावू शकत नव्हते. तसाच अनुभव ठाणे येथील पार्श्वनाथ इंजिनअरींग कॉलेजच्या एका बापूभक्त मुलानेही घेतला होता की त्याच्या सोबत असलेल्या त्याच्या तीन मित्रांच्या गळ्यात आपल्या बापूंचे त्रिविक्रम लॉकेट नसल्याने त्या मांत्रिकाला त्यांना वशीकरण करून आपल्या मायाजालात अडकवून संभ्रमित करून फसवून जंगलात नेता आले आणि शेवटी बिचारे ते तीन्ही मित्र त्यांच्या जीवाला मुकले देखिल. पण तेच बापूभक्त असलेला हा मुलगा गळ्यातील त्रिविक्रमाच्या लॉकेटने वाचला होता.
अत्यंत शूर, धाडसी आणि स्वत:च्या प्राणांची पर्वाही न करता संकटांना निधड्या छातीने टक्कर देणार्‍या हर्क्युलिसचा लढा वाचताना मात्र काळजाचा ठोका चुकला खरा. त्याच्या जिवलग ऍफराने स्वत:च्या गळ्यातला कंठहार त्याला आवर्जून घालायला सांगितला का ह्याची झलक पहायला मिळाली. तिच्याही पापण्याच्या कडा का पाणावल्या होत्या हे जाणवले आणि हा लढा नक्कीच भीषण आणि जीवघेणा असेल ह्याची जाणीव झाली खरी. पण ऍफरॉडाईटचे कवच , महामाता सोटेरियाचे अपार प्रेम आणि मॅग्ना थेमिस म्हणजेच महादुर्गेचा आणि त्रिविक्रमाचा अभयहस्त हा कधीच हर्क्युलिसचे अचाट साहस वाया जाऊ देणार नाही ह्याचाही मनोमन १०८ % विश्वास जागविता झाला. आम्हांला बापूंनी ह्या आधीच्या दाखवून दिले होते ते महामाता सोटेरियाचे अगाध सामर्थ्य !!!
तुलसीपत्र १०९९ मध्ये महामाता सोटेरिया डेव्हिडॉहाना , हॉरस ह्या कंपूला पिशाच्च गुंफेमध्ये जाहबुलॉनला जन्माला घालण्याचे त्यांचे प्रयत्न फसल्यावर शेवटच्या क्षणी ठामपणे निक्षून बजावताना पाहिले होते की ,” हे नीचांनो , तुमचे सर्व प्रयत्न विफल ठरले आहेत. तुम्हाला हर्क्युलिसला बळी देत असतानाचा आवाज ऐकायचा होता व ’ ते कदापि शक्य नाही’ हे मी तुम्हाला निक्षून सांगते. माझ्या वंशाचे रक्षण करण्यास मी स्वत: समर्थ आहे व आमची रक्षणकर्ती महादुर्गाही. ”
अर्थात त्याच वेळेस पुढे सैतानी विवरामध्ये शिरूनही हर्क्युलिसने “स्थेवो अनुबीस” (सेरापिस अनुबीसची पत्नी जी त्याच्या पासून विभक्त झाली होती) ह्या निमरॉड उर्फ हिराम अबीफच्या गुरुला अत्यंत शौर्याने आणि स्वत:च्या प्राणांची बाजी लावून ठार मारले होते. (तुलसीपत्र १०९९)
मागच्या एका लेखातही त्रिविक्रमाने असेच शेवटच्या क्षणी प्रकटून हर्क्युलिसचे प्राण वाचविले होते ह्याचे स्मरण झाले, तेही अशाच अजस्त्र सापांच्या विळख्यातून !
हर्क्युलिसची ही खेळी कशी यशस्वी झाली हे वाचण्याची उत्कंठा अधिकच वाढली आहे आणि हुरुहुरही … पुढचा भाग आपल्या गर्भात काय दडवून बसला आहे हे बापूच जाणे?

हरि ॐ. श्रीराम. अंबज्ञ.

सुनीतावीरा करंडे.