Matriach Soteria’s faith on Mahadurga

#269938

Aniketsinh Gupte
Participant

Matriach Soteria’s faith on Mahadurga

महादुर्गेचा (Mahadurga) आशीर्वाद

गुरुवार दि. २८.०५.१५ रोजी दैनिक प्रत्यक्ष(Pratyaksha)  मधील अग्रलेख मधे एक खुप महत्वाचे वाक्य आपल्या दृष्टिस पडते. बावरला(Bavar) उद्देशून महामाता सोटेरिया (Matriach Soteria) म्हणते, “तुझी ही अवस्था पाहून मला खरेच तू व तुझ्या सर्व मंडळींची खुप दया येत आहे. कारण तुमच्याकडे कितीही शस्त्रास्त्रे असली, कितीही अतिप्रगत विज्ञान असले पण तुमच्याकडे आदिमाता महादुर्गेचा(Mahadurga) आशीर्वाद व त्रिविक्रमाचे (Trivikram) सहाय्यही नाही. त्यामुळे तुम्हां सर्वांची ह्याच्याहूनही अधिक वाईट स्थिती होणारच आहे.”

इतिहास आणी वर्तमान ह्यांना जोडणारे हे वाक्य ! जी परिस्थिति त्यावेळची तीच ह्यावेळीही…जगावर, ह्या वसुंधरेवर राज्य करण्याचे स्वप्न पाहणारे, शैतानाचे उपासक, माय चण्डिकेचे(Chandika) अस्तित्व नाकारणारे….ह्यांची स्वप्न पुन्हा एकदा धुळीस मिळणार हे मात्र नक्की आणि हे नेमके का होणार ह्याचे कारण स्पष्टपणे वरील वाक्यात आहेच !
ह्या वाक्यात असलेलं सत्य कुणीच नाकारू शकत नाही. अजुन एक गोष्ट शिकण्यासारखी आहे ह्यातून आणि तो म्हणजे महामाता सोटेरियाचा महादुर्गेवर असलेला विश्वास ! तिच्या कृपाशिर्वाद असल्याशिवाय कुठलेच कार्य पूर्णत्वास जात नाही आणि तसेच तिची इच्छा असल्याशिवाय हा त्रिविक्रमही सहाय्य करत नाही. पण महादुर्गेचा, माय चण्डिकेचा हा नियम फ़क्त श्रद्धाहीन व्यक्तिसाठीच असतो. एखादा श्रद्धावान जर अडचणीत असेल तर त्या व्यक्तीने तिचे नुसते स्मरण जरी केले तरी त्यांना सहाय्य प्राप्त होते. कधी कधी तर नाव जरी घेतले नाही, स्मरण ही केले नाही तरी सुद्धा त्याव्यक्तिस सुखरूपणे बाहेर काढले गेले आहे. हवा तो फ़क्त विश्वास ! असे अनेक अनुभवही आपण ऐकले आहेत.

हा असाच विश्वास नुसते महामाता सोटेरिया हिच्यात दिसून येत नाही तर सर्वांच्या(सर्व श्रद्धावान) मनातून, त्यांच्या बोलण्यात, कार्यात दिसून येते. आणि हाच विश्वास त्यांना ह्या युद्धात तारून नेण्यास समर्थ आहे.

आज आपण सर्व श्रद्धावान खरच भाग्यवान आहोत की ह्या आदिमातेने आपल्याला जवळ केले, डैड सारखा अतिशय प्रेमळ असा सखा बाप दिला जो वेळोवेळी आपल्याला उचित मार्ग दाखवत आहे आणि जरी भटकलो तरी कान ओढून, धपाटे घालून आपल्याकडून योग्य तेच करून घेत आहे. ह्या वेळेस येउन ठेपलेल्या ह्या युद्धात ही विजय फ़क्त सत्याचाच होणार, माझ्या आदिमातेचाच होणार ह्यात तिळमात्रही शंका नाही, मग समोरचे कितीही बलवान असोत, त्यांच्याकड़े कितीही प्रगत विज्ञान आणि शस्त्र असोत. त्यांच्याकड़े जे नाही हेच त्यांचा घात करणार हे नक्की. आपल्याला फ़क्त तिचे बोट धरून डैड सोबत चालायचे आहे. आणि त्यासाठी हवा फ़क्त विश्वास !

अंबज्ञ
अनिकेतसिंह गुप्ते