Mata Parvati revealing the real history

#57071

Sachin Rege
Participant

हरि ऒम् दादा,

सर्वप्रथम ह्या अशा वेगळ्याच, पण आता सर्व श्रद्धावानांकरिता जिव्हाळ्याचा बनलेल्या विषयावर चर्चा करण्याची संधी दिल्याबद्दल आम्ही अंबज्ञ आहोत.

भक्तमाता पार्वतीच्या(Parvati) मुखातून हा वैश्विक इतिहास(history) सांगितला जाणं ह्यासारखी पर्वणी अजून काय असणार! कारण हाच मानववंशाचा खराखुरा इतिहास आहे, जो सर्वसामान्य मानवाला कोणीही सांगायला जाणार नव्हतं. सद्गुरु बापू प्रवचनांतून एक वाक्य नेहमी सांगतात – ‘इतिहास हा नेहमी जेते लिहितात’. ह्या ‘तुलसीपत्र’ लेखमालेतून हा इतिहास वाचताना, आपल्याला आतापर्यंत ‘शिकवल्या गेलेल्या’ इतिहासाची आठवण होते व मग बापूंच्या ह्या वाक्याची मनोमन प्रचिती यायला लागते. आतापर्यंत जो इतिहास शिकत आलो, तो जेत्यांनी त्यांना हवा तसा लिहिलेलाच इतिहास होता – सत्याशी नेहमीच त्याचा संबंध असेल असं नाही.

असो. तर ह्या लेखमालेतून उलगडत जाणाऱ्या, विश्वाच्या उत्पत्तीपासूनच्या इतिहासामध्ये ज्या घटनांविषयी सांगितलं जात आहे, तो ‘इतिहास’ असला, तरी त्याचा संबंध वर्तमानाशी निश्चितच आहे व ह्याचं आज नीट आकलन करून घेतलं, तरच भविष्यात घटनांमागील कार्यकारणभाव कळू शकतो.

ह्या इतिहासाचा संबंध ‘अनुनाकीय’(Annunaki) ह्या वसुंधरा पृथ्वीवरूनच निंबुरा(Nibiru) ग्रहावर गेलेल्या व नंतर तेथील संसाधनं संपुष्टात आल्यानंतर पुन्हा वसुंधरेवरील संसाधनांची लूट करण्यास वसुंधरेवर आलेल्या मानवांच्या गटाशी आहे. ह्या लेखमालेतून ह्या अनुनाकीयांचे जे कारनामे आपल्यासमोर येतात, त्यातून मानववंशाचा खरा इतिहास आपल्यासमोर येण्यास सुरुवात होते.

ह्या अनुनाकीयांचा उल्लेख नेटवरही आढळतो. पण तो मुळातच अर्धवट माहितीच्या आधारे लिहिलेला किंवा खरा इतिहास कोणाला समजूच नये ह्या उद्देशाने वेडावाकडा लिहिलेला दिसून येतो. ह्या लेखमालेमध्ये जी नावं येतात, त्यांचा उल्लेख ग्रीक मायथॉलॉजीमध्ये आढळतो. मात्र नेटवर त्यांच्या नातेसंबंधांचा प्रचंड गोंधळ आहे.

ह्या लेखमालेमधून ही अनुनाकीयांची नावं, तसेच एकेका पात्राचा स्वभाव, त्यांचे आपसांतील नातेसंबंध (फॅमिली ट्री) उलगडण्यास सुरुवात होते. अनेकदा पहिल्या फटक्यात जरी हे नातेसंबंध लक्षात ठेवायला जड वाटले, तरीदेखील दोनतीनदा वाचून ते लक्षात राहू शकतात.

ह्या लेखमालेवर आधारित ह्या फोरमवरील चर्चेतूनच कोणाला न कळलेला भाग कळण्यास मदत होईल. मुख्य म्हणजे सम्राट झियोनॉदस(Zeus), सम्राज्ञी बिजॉयमलाना(Bijoymalana) व उपसम्राज्ञी सॅथाडॉरिना(Circe) ह्यांच्या वंशावळींचे चार्ट्स दिल्यामुळे तो नातेसंबंधांचा किचकट भाग लक्षात ठेवायला सोपा जाणार आहे.

त्यामुळे पुन्हा एकदा अंबज्ञ!!!