Maharashtra has Gondhli Samaj

#130723

Anilsinh Jagtap
Participant

आईचा जोगवा जोगवा…. जोगवा मागीन

हरी ॐ दादा,

बापूंच्या सध्या चालू असलेल्या अग्रलेखांच्या मलिकेमध्ये गरुड समाजाचा उल्लेख वारंवार येत राहतो. आणि हा समाज पुन्हा पुन्हा आठवत राहतो तो त्यांच्याकडे जगदंबेच्या (महादुर्गेच्या) (Mahadurga) चरणी असलेल्या निष्ठेमुळे.

बापूंच्या अग्रलेखात उल्लेखलेल्या कितीतरी वास्तुंचे किंवा ठिकानांचे अवशेष जवळजवळ अडीच लाख वर्षांनंतर अजुनही अस्तित्वात आहेत; मग ते पिरामिड असोत किंवा अंगकोर वियतनाम मधील महादुर्गेच्या पुरातन मंदिराप्रमाने सर्व जगभर पसरलेल्या इतर पवित्र वास्तुंचे अवशेष असोत.

अग्रलेखांनुसार हा गरुड़ (Eagle) समाज त्यावेळी जवळ जवळ आख्ख्या वसुंधरेवर अस्तित्वात होता. या समाजाच्या गळ्यात कवड्यांच्या माळा घालन्याच्या प्रथेवरुन लगेच आठवणीत येतो तो महाराष्ट्रात अजूनही अस्तित्वात असलेला महादुर्गेचे गुणसंकीर्तन करणारा गोंधळी समाज. या समाजात आनी बापूंनि अग्रलेखात वर्णन केलेले गरुड़पंथिय यांमध्ये बऱ्यापैकी साम्य आहे.

महाराष्ट्रातील(Maharashtra) गोंधळि(Gondhli samaj) (देवीच्या नावाने गोंधळ घालनारे) समाजातही ही गरुडपंथियांप्रमाणे स्वतःच्या गळ्यात कवड्यांची माळ घालण्याची प्रथा अतिशय पवित्र समजले जाते.

हा समाज जवळ जवळ अख्ख्या महाराष्ट्रभर आजही अस्तित्वात आहे आणि हे गोंधळी स्वतःला मोठ्या अभिमानाने महादुर्गेचे भक्त म्हनवून घेतात. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी मानल्या जाणाऱ्या तुळजापुरची अंबामाता, कोल्हापुरची महालक्ष्मी माता, वणीची सप्तशृंगीमाता आणि माहुरगडची रेणुका माता या सर्वच देवस्थानांशी आजही गोंधळि समाज आणि त्यांची गळ्यात कवड्यांच्या माळा आणि हातात दिवटा घेवून देवीचा जोगवा (प्रेमाने आईला साद घालणे) मागण्याची प्रथा आजही अस्तित्वात आहे.

देवीचा गुणगान गाणारा (गुणसंकीर्तन करणारा) तो गोंधळी.

गोंधळ आणि गोंधळी प्राचिन काळापासून लोककला प्रकारात मोडली गेली आहे. विशेषत: तुळजाभवनी आणि रेणुकामाता या देवींच्या संदर्भात गोंधळ घालण्याची पिढीजात परंपरा आहे. अंगात तेलकट झबला, कपाळावर कुंकू, गळ्यात देवींची प्रतिमा, गळ्यात कवड्यांची माळ अशा वेशभूषेत असलेली व्यक्ति म्हणजे गोंधळी.

महाराष्ट्रातील बहुतांश समाजांचा कुळधर्म-कुळाचार असणारी एक प्रबोधक आणि महत्त्वपूर्ण परंपरा म्हणजे गोंधळ. लग्न, मुंज किंवा इतर शुभकार्यावेळी घरी ‘गोंधळ’ घातला की आयुष्याचा गोंधळ होत नाही अशी धारणा आहे. आजही महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात गोंधळ परंपरा पाहावयास मिळते.

पूर्वी कधीतरी एकदा वाचनात आले होते की कोल्हापुरच्या महालक्ष्मी मंदिरात भक्तसमपिर्त अक्षरश: हजारो अलंकार देवीला घातले जातात. ते स्वाभविकही आहे. परंतु कवड्याची माळ घातल्याखेरीज अलंकारपूजा पूर्ण होत नाही, देवीच्या अलंकारांमध्ये ‘कवड्यांची माळ’ हा आद्य-आदि अलंकार आहे.
महालक्ष्मीला सोने, हिरे, पाचूंचे कितीही दागिने घातले तरी कवड्यांची माळ हाच मूळ दागिना मानला जातो. कवड्यांची माळ वैशिष्ट्यपूर्ण आहे. लहान-लहान कवड्यांची फुले करून त्यांची गुंफण करून माळ बनविलेली आहे. मुख्य मूर्ती व उत्सवमूर्ती यांना कवड्यांची माळ घातली जाते. कितीही सोन्याचे दागिने घातले असले तरी कवड्यांच्या माळेमुळे देवीस लाभणारे सौंदर्य हे आगळेच आहे. सर्वसामान्यांसोबत महालक्ष्मीचे असणारे नाते ही कवड्यांची माळ अधोरेखित करते.

मातृदेवतेच्या उपासनाव्रतात जोगवा मागणे हा एक प्रकार असतो. एकनाथ महाराजांचे ‘आईचा जोगवा मागेन’ हे पद सर्वज्ञात आहे. ‘जोगवा’ म्हणजे देवीच्या नावाने कोरडी भिक्षा (पीठ धान्य) मागून तेवढेच अन्न शिजवून निर्वाह करणे.

अनादी निर्गुण प्रगटली भवानी
मोह महिषासूर मर्दना लागुनी
विविध तापाची करावया झाडणी
भक्ता लागी तू पावसी निर्वाणी
आईचा जोगवा जोगवा…. जोगवा मागीन

बापूंच्या अग्रलेखात संबोधित केलेला गरुड़ समाज आणि अत्ता अस्तित्वात असलेला गोंधळी समाज यांमध्ये काही संबंध आहे का ? या प्रश्नाचे उत्तर बापूंनाच माहीत परंतु……..

जेव्हा आईच्या गोंधळात बापू म्हणतात “असा जरी मी गोंधळी तरी माय मात्र माझी नाही वेंधळी” किंवा आईच्या प्रसन्नोत्सवापूर्वीच्या प्रथम कंठकूपपाषाण पूजनादरम्यान जयंती मंगला काली… या गजरावर दोन हातात बाट (दिवटा) घेवून नाचनारया बापूंमध्ये असणारा गोंधळी काही लपून रहात नाही;

मी अंबज्ञ आहे
अनिलसिंह जगताप