Mahadurga will save Bijoymalana, Leto and Artemis

Forums वैश्विक वास्तव (The Universal Truth) प्रारंभ Mahadurga will save Bijoymalana, Leto and Artemis

#115738

Ajitsinh Padhye
Participant

हरि ॐ दादा. आजचा अग्रलेख वाचून “सुन्न होणं” म्हणजे काय हे प्रत्यक्ष अनुभवलं. सॅथाडोरिनाने घडवलेला भीषण हल्ला आणि त्यानंतर हर्मिस, अपोलो आणि सॉरेथसने पाहिलेले भीषण वास्तव अग्रलेखात वाचून अक्षरश: हादरून गेलो. पण लगेच विचार आला, अरे ! महादुर्गेचे(Mahadurga)उपासक असणा-या, पावित्र्य जपणा-या मंडळींसोबत हे एवढं सगळं “वाईट” घडू शकेल का ? बिजॉमलाना(Bijoymalana), लेटो(Leto) आणि आर्टेमिसच्या(Artemis) जागी कोणा दुस-यांनी त्यांचे वेष धारण करून बलिदान दिले असेल तर ? किंवा साक्षात सम्राज्ञी असणा-या बिजॉमलानाने आणि गुप्तहेर प्रमुख असणा-या लेटोसारख्या शूर स्त्रियांनी त्यांचीच आभूषणे चढवून वाईट मंडळींपैकी कोणाला स्वत:च्या जागी बळी चढवले असेल तर ? गाढवावरून धिंड काढलेली अनुभवजन्य आणि करारी स्त्री असणारी माता -हिया(Rhea) (जी साक्षात युरॅनस-सुमधस(Uranus-Sumedhas) ऋषीची बहीण आहे) ही सुद्धा कोणी दुसरीच असेल तर ?…ही सर्व पावित्र्याला, सत्याला, आनंदाला, प्रेमाने जोपासणारी लोकं जिवंत आणि सुरक्षित असलीच पाहिजेत असं मनापासून वाटतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे साक्षात महादुर्गेचा आशिर्वाद आणि अफ्रोडाईटचा आधार असताना, हे असं सगळं कसं घडू शकेल ? नाहीतर हर्मिस(Hermis), सॉरेथस(Saurethus) आणि अपोलोसाठी ते रिमोट कंट्रोलचे छोटे यान का, कोणी व कसे पाठविले गेले ? माझ्या मते ही सर्व चांगली मंडळी (बिजॉयमलाना, लेटो, आर्टेमिस, -हिया, आदि) गुप्त मार्गाने पळून जाऊन सुरक्षित असतील असं वाटतं. डेमेटरच्या प्रासादावर हल्ला झाला आहेच, प्रश्नच नाही, पण त्यातील मंडळी सुरक्षित असावीत असे वाटते. अग्रलेख वाचताना हे असे विचारांचे काहूर मनात उठत होते.
…आणि शिवाय अग्रलेखाच्या शेवटी डेमेटर(Demeter) थाडाच्या रूपात जिवंत असून ती बरोब्बर हर्मिस आदि मंडळींना सुरक्षित स्थळी नेते हे वाचून तर अजूनच हुरूप वाढला. शेवटी काहीही झाले तरी आजपर्यंतच्या इतिहासाच्या अनुभवावरून चांगल्या लोकांचाच विजय होतो हे विसरून चालणार नाही.
पण पुढचा अग्रलेख आल्याशिवाय काहीही सांगता येत नाही…कारण बापूंचे हे अग्रलेख म्हणजे काही कल्पित गोष्ट किंवा नॉवेल नाही…ही एक सत्य घटना आहे…हा एक इतिहास आहे…तो जसा घडला तसा बापू आपल्यासमोर मांडत आहेत…पण तरीही कुठेतरी मनापासून वाटतं…चांगल्या लोकांच्या बाबतीत “एवढं” वाईट घडू शकत नाही. हरि ॐ. श्रीराम. अंबज्ञ.