Mahadurga is always with us

#123165

Sangita Vartak
Participant

हरि ॐ,
गेले अनेक दिवस अग्रलेख वाचल्यावर खूप इच्छा होत होती की या फोरम वर लिहूया पण काही कारणाने जमतच नव्हते… पण आज मात्र अट्टहासाने लिहायला बसलेच…

बापू आपल्याला या अग्रलेखातून कीती शिकवित असतात ना… प्रत्येक अग्रलेख वाचल्यावर पुढचा अग्रलेख येईपर्यंत धीर ठेवणे खूपच जड जाते… एवढे त्या अग्रलेखाची आम्हा सर्वांवर पकड बसली आहे…. ह्यात ज्या कथा येतात त्या नुसत्या कथा नसून आधी घडलेला इतिहास आहे हे ठाम पणे लक्षात येते…. प्रत्येक घटनेवर किंवा घडामोडींवर बारकाईने अभ्यास करण्याची गरज आहे…. अर्थात प्रत्येक घडामोडींवर असा अभ्यास करायला मला नाही वाटत आपल्या सगळ्यांना जमेलच… मात्र त्या अग्रलेखावर आपापसातात केलेल्या चर्चेने ह्याबाबत अभ्यास केल्यासारखेच होणार नाही का?… या फोरमवर एकमेकांनी टाकलेल्या comments वाचल्यामुळे आणि लिहिल्यामुळे एकमेकांचे विचार कळून अग्रलेखाबाबत खरी चर्चा घडेल…

९ फेब्रुवारी आलेल्या तुलसीपत्र १०७५ च्या अग्रलेखामुळे खरोखर मन सुन्नच झाले होते… खूप दु:ख झाले… वाटले काय हे झाले पण त्याचक्षणी एका बाजूने खात्री होती… महादुर्गा (Mahadurga)प्रत्येक श्रद्धावानांना (व्रती आणि सावर्णिंना) मदत करतेच आहे आणि येथेही करत असणारच. पण आपल्याला अजून पहायचे होते की ती कसे आणि कुठल्या रुपात मदत करते…. या अग्रलेखामुळे त्या चेटू वेटूंचे वागणे, आनंद सादरा करण्याचे मार्ग पाहीले ते सर्व भयावह आणि किळसवाणीच होते… परंतु तरीसुद्धा हर्मिसने राखलेला संयम आणि हुशारी वाखाणण्यासारखी आहे…. झियस, बिजॉयमलाना, डेमेटर आणि अ‍ॅफ्रोडाईटची तर कमालच वाटते काय प्लानींग केले आहे… चेटू-वेटूंसारखेच अन्नही… वा क्या बात है…

१० तारखेचा १०७६ चा अग्रलेख वाचला आणि मग कळून आले सर्व श्रद्धावान (व्रती आणि सावर्णिंना) सुखरूप आहेत… आणि राहाणारच ती महादुर्गा आहेच की त्यांची काळजी घ्यायला…. सध्या त्या श्रद्धाहीनांना तात्‌पुरते जरी वाटले की त्यांचा विजय झाला पण तसे नाही…. अंतीम विजय हा श्रद्धावानांचाच होतो… लेटोचे काय धाडस ना! त्या सॅथाडॉरिनावर झेप घेऊन तिला बंदी बनविले… बिजॉयमलानाने तर तिची जिभच छाटली…. व तिलाच ‘र्‍हिया’(Rhea) बनवून कुत्रीसारखी घेऊन प्रसादाबाहेर आली… धन्य ती महादुर्गा आणि तिची बाळे इतके धाडस आणि धैर्य हे श्रद्धावानांना त्यांच्या विश्वास आणि भक्तीमुळेच येऊ शकते… हर्मिस हूवद्रू भाषेत प्रविण आहे, लेटो गरूड पंथाची प्रमुख आचार्यासुद्धा आहे… काय ना हे एकेकांचे अनेकाविध गुण नेमक्या वेळेस कसे उपयोगी उपयोगी पडतात… हीच त्या महादुर्गेची किमया… संकट येण्याआधीच त्यातून बाहेर पडण्यासाठी आवश्यक गोष्टी करून घेणे…

प्रत्येक श्रद्धावानाला ती मोठी आई आणि बापू नेहमीच मदत करीतच असतो गरज असते ती त्यासाठी विश्वास आणि संयमाने पुढे वाटचाल करीत राहणे… जसे माता सोटेरिया (Soteria), झियस(Zeus), बिजॉयमलाना(Bijoymalana), डेमेटर(Demeter), अ‍ॅफ्रोडाईट(Aphrodite), हर्मिस(Hermis), प्रॉमेथस(Prometheus), झिरॉन(Ziron) हे सर्व चिकाटीने उचित दिशेने प्रयत्न करीत आहेत….
आता पुढचा अग्रलेख कधी वाचायला मिळतो असे वाटते….
अंबज्ञ बापू…. हरि ॐ.