Mahadurga helps Atlas and Asia against Semiramis

Forums वैश्विक वास्तव (The Universal Truth) प्रारंभ Mahadurga helps Atlas and Asia against Semiramis

#102457

ketaki. Kulkarni
Participant

आजचा ही अग्रलेख जबरदस्त!
आपल्याला बापू नेहमी सांगतात की… अगदी तुमच्या डोक्यावर bomb ठेवलेला असेल तरीसुद्गा तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही!
हे आजच्या अग्रलेखातून स्पष्ट कळून येते..
आशिया(Asia) व अटलास (Atlas)हे जेव्हा दरीतून बाहेर येतात तेव्हा त्यांच्यासमोर सेमिरामिस येऊन उभी ठाकते.
आता सर्व काही संपले आहे असे आशियाला वाटू लागते व ती मनापासून मेग्ना थेमिसची(Magna Themis) क्षमा मागते व अटलास तिथेच दुर्गाकाव्यं मोठ्याने म्हणायला सुरु करतो.
आणि ह्यामुळे त्यांच्या अगदी डोक्यावर येऊन ठेपलेले संकट काही कळायच्या आतच दूर होते.
इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी म्हणजे अटलासला त्याच्या आईचे नाव घेताना कसलीहि लाज वाटत नाही. तो अशा बिकट परिस्थितीत मनातल्या मनात नाही तर मोठ्याने नाव घेण्यास सुरु करतो..
अजुन एक गोष्ट म्हणजे… श्रद्धावानांचा हा एक मोठा फायदा असतो की त्यांना त्यांच्या देवाचे नित्य स्मरण असल्यामुळे अडचणीच्या काळामधे विनासायास त्यांच्या तोंडून भगवंताचे नाम सुरु होते.. वेगळी आठवण होण्याची गरजच भासत नाही.. खरी वेळ येते तेव्हा मग ती आईच तिच्या नामाचे स्मरण करून देत असते.
सेमिरामिस(Semiramis) त्यांना जागच्या जागी ठार मारणार असते.. म्हणजे खरे तर ह्या दोघांचे प्राण जवळजवळ गेलेलेच होते.. पण जिथे हातात साक्षात मोठी आई आणि मुखात तिचेच काव्य असताना घात होणे शक्यच नाही. ती मोठी आई असा काही फासा फेकते ना की समोरच्या दुष्ट व्यक्तीला काही कळतही नाही आणि तिची बाळ सुखुरूप त्यातून निसटलेले असतात.. इतकेच नाही तर इतके वर्ष सेमिरामिसची मानसिक गुलाम असलेली पुलिकासुद्धा अफ्रोडाइटचे काव्य कानावर पडताच पूर्ण जागृतावस्थेत येते.. आणि मग हिच्याच मदतीने तिची कन्या व तिच्या नातवाला ती पळून जाण्यास सहाय्य करते.
मनोभावे केली गेलेली आईची फक्त एक प्रार्थना काय चमत्कार नाही घडवून आणू शकत!!!
दुष्टांना धडा व तिच्या बाळाला पूर्ण सहाय्य.. ह्या दोन्ही गोष्टी ही मोठी आई एकत्र करते.
“देव तारी त्याला कोण मारी” – हे 108% पटवून देणारा आजचा अग्रलेख…
अंबज्ञ
केतकीवीरा कुलकर्णी