Mahadurga – goddess of Savarni

#377544

Mahadurga – goddess of Savarni

हरि ॐ.

आजचा दिनांक १३ ऑगस्ट २०१५ चा “तुलसीपत्र ११३६” खूप मोठ्या कालावधीनंतर बापूंचा

अग्रलेख आज परत वाचायला मिळाला ह्याचा अत्यंत आनंद झाला. “प्रत्यक्ष” मधून तरी बापूंचे (Dr. Aniruddha Joshi) दर्शन झाले ह्याचा आनंद खरेच शब्दातीत आहे.
आजच्या अग्रलेखातून बापूंनी खूपच स्पष्ट्पणे आपल्याला आदिमाता चण्डिका(Adimata Chandika) किंवा सावर्णि(Savarni) घराण्याची “महादुर्गा” (Mahadurga) काय काय करू शकते ह्याची ग्वाही दिली आहे. आदिमातेची कृपा आणि त्रिविक्रमाचे आशिर्वाद ज्याच्या पाठीशी आहे त्याच्या केसालाच काय नखालाही कोणी धक्का लावू शकत नाही ह्याची प्रचिती क्षणोक्षणी येते.
ज्या विषारी शेवाळाच्या दहा पट्ट अंतराच्या आत कुणी गेल्यास त्याचा तत्काळ मृत्यु होतो आणि ज्याला शुक्राचार्यही अपवाद नव्ह्ते तेथे सेमिरामिसच्या (Semiramis) गुलामीत बंधनात अडकलेल्या पुलिकावर(Pulika) मात्र त्याच विषाचा जराही परिणाम होत नसतो आणि त्यामागे परमेश्वराने केलेल्या अगाध योजनेने पुलिका भारावून जाते…
खरेच परमेश्वराचा, त्या जगनृयंत्या आदिमातेचा सारा खेळच न्यारा, अजब असतो.
म्हणून श्रध्दावानाने हेच मागणे हितकर आहे –
जे जे मजसाठी उचित ते तू देशील खचित हे मात्र मी नक्की जाणीत नाही तकरार राघवा
मजला आवडो अथवा नावडो तू जे इच्छिसी तेची घडो हेचि मागता न अवघडो जीभ माझी..
आध्यात्मिक अधिष्ठान असेल , भक्तीमार्गाची , प्रार्थनेची जोड असेल तर परमेश्वरी कृपा माणसाच्या जीवनात प्रवाहीत व्हायला खूप सोपे जाते. म्हणूनच बापू वारंवार आपल्याला परमेश्वराचे , सदगुरुंचे नामस्मरण , नामजप, उपासना, प्रार्थना सातत्याने करीत राहण्यास बजावतात.
हायपेरिऑनने (Hyperion) केलेल्या आध्यात्मिक सहाय्यामुळे पुलिकाचा मेंदू सेमिरामिसच्या बंधनातून पूर्णपणे मुक्त झालेला होता. एवढेच नव्हे तर तिला विचार करताना किंवा कुठलीही गोष्ट आठवताना अजिबात कष्ट पडत नव्हते. आणि त्यामुळे विचारांचा व भावनांचा मोकळेपणा कित्येक वर्षानंतर अनुभवताना पुलिकाचा आत्मविश्वास क्षणाक्षणाला वाढत चालला होता. सेमिरामिसची गुलाम म्हणून वावरताना तिने पाहिलेल्या अनेकविध गोष्टी तिला चक्क आठवतही होत्या. त्यामुळेच
तिला सेमिरामिस, शुक्राचार्य, निक्स, केरिडवेन ह्या सर्व दुष्टांच्या निरनिराळ्या गटांच्या कार्याविषयी आणि कारस्थांनाविषयी असणारी सखोल माहिती होती ज्याच्या आधारे ती सम्राट झियसच्या गटाला अनेक प्रकारे सहाय्य खर्‍या अर्थाने करू शकत होती. आणि तिने तसे सहाय्य करायला सुरुवात केल्याचेही पुढे वाचनात आले. मेडयुसाच्या मागे वेडा झालेल्या शर्मण्य देशाचा राजा ओरिऑन ह्याचा सोरेलिया प्रांताक्डे जाण्यासाठी ज्या चलाखीने पुलिका वापर करून घेते त्यावरून तिच्या वाढत्या आत्मविश्वासाची आणि बुध्दीचातुर्याची झलक पहायला मिळते.
पुलिकाची निरीक्षणशतीचीही जबरदस्त दाद द्यावीशी वाटते की लॅबिरिन्थच्या(Labyrinth) वायव्य दिशेला असलेला संपूर्ण रूक्ष आणि कोरडा डोंगर तिच्या पटकन ध्यानात येतो. कुमांत्रिक लोक आपल्या सोयीसाठी असा डोंगर बनवतात ह्या तिच्या अनुभवजन्य ज्ञानाचा ती यथोचित वापर करते. अर्थातच आदिमातेच्या कृपेनेच पुढे डोंगराचे बारकाईने निरीक्षण करताना तिला एका प्रचंड आकाराच्या पाषाणावर विषारी शेवाळे भरपूर प्रमाणात तयार केले असल्याचे लक्षात आले , ज्यात एकमेव निक्सचा हातखंडा होता हे ही तिला आठवते. थोड्याच वेळात तेथे आलेल्या निक्सच्या चेहर्‍यावरील आत्मविश्वास पाहून पुलिका कयास बांधते की निक्सची कारस्थाने आता यशस्वी ठरू लागली आहेत.
एका आध्यात्मिक सहाय्याने पुलिका किती झपाटयाने आणि काय जबरद्स्त वेगाने सदमार्गावर प्रवास करती झाली आहे आणि येथे तर स्वत: आदिमाता आणि तिचा लाडका पुत्र त्रिविक्रम , परमात्मा आपल्या सोबत सदैव आहे , मग आपण सुध्दा असाच “त्या” च्या देवयान पंथावर “त्या”च्या कार्यासाठी कटीबध्द होऊन अथक परिश्रम घेऊन प्रवास करायला हवा.
त्या गर्भनाली जळत्या वाडयात हरवल्यापेक्षा वासुकी मेल्याचे पाहून मेडयुसा द;ख्ही होते आणि कधी नव्हे ते तिला पहिल्यांदाच आपण असहाय्य आहोत ही भावना छळत होती.
सर्की असो मेडयुसा असो की शुक्राचार्य असो ह्या प्रत्येक स्वत:ला बलवान , सामर्थ्यवान समजणार्‍यावर स्वत: अगतिक झाल्याची , असहाय्य असल्याची भावना कधी ना कधी सामोरी आलीच आहे कारण कितीही नाकारले तरी प्रखर सत्य तेच आहे की ते सर्व जण एकाकी आणि निराधार आहेत.
श्रध्दावान मात्र असा असहाय्य आणि लाचार कधी होऊच शकत नाही कारण त्याच्या पाठीशी सतत आणि सदैव त्याचा सदगुरु परमात्मा, त्रिविक्रम , जातवेद आणि स्वत: आदिमाता उभीच असते अकारण कारूण्य, क्षमा आणि अपार सामर्थ्य घेऊन – मग भले त्या भक्ताला मंत्र, जप येवो वा ना येवो, त्याच्याकडे कोणतेही अस्त्र असो वा नसो…हे मातृवात्सल्य उपनिषद सतत सांगत राहते.
येथे आठवले ते बापूंनीच रामरसायन मध्ये सांगितलेले रहस्य की आपल्या पुत्राचे सामर्थ्य जाणणारी अंजनी माता दत्तगुरुंच्या योजनेनुसार श्रीराम-हनुमंत भेट होईपर्यंत हनुमंताची शक्ती इतर कशासाठीही वापरली जाऊ नये , म्हणून अगस्त्य ऋषींच्या करवी हनुमंताला त्याच्या ताकदीच्या विस्मरणाचे बंधन घालते. पुढे ही कहाणी व त्यावरील उपाय पूर्णपणे माहीत असणारा ज्ञानराशि, तपस्वी अस्वलराज जांबुवंत श्रीहनुमंतास त्याच्या सामर्थ्याची आठवण करून देतो आणि जांबुवंताचे सत्यवचन ऐकताक्षणीच हनुमंताच्या सर्व शक्ती जागृत होतात व महाप्राण श्रीहनुमंत आपले सामर्थ्यशाली महाबलीस्वरूप प्रकट करतो आणि प्रभु रामचंद्राच्या माता सीतेच्या शोधकार्यासाठी लंकेच्या दिशेने समुद्रावरून उड्डाण करतो.
आध्यात्माची ही किती प्रचंड शक्ती आहे ना की मनोनियंत्रणाचे बंधन कितीही मोठ्या काळाकरीता घातले असेल तरी दूर करता येऊ शकते अर्थात “पावित्र्य हेच प्रमाण” हाच मूलभूत पाया असेल तरच.
याउलट दुराचारी पंथात दुराचारी हे सतत एकमेकांनी आपल्यावर बंधन केले असावे ह्या दडपणाखाली वावरताना दिसतात पण ते मात्र स्वत: होऊन कुणा दुसर्‍याच्या सहाय्याने ते झुगारून देऊ शकत नाही असे वाटते.
मारडूक सतत शुक्राचार्यांनी त्याला बंधन घातले असावे ह्या भीतीखाली वावरतो आहे आणि तो तसे मेडयुसाला सांगतोही तसेच खुद्द मेडयुसाभोवती काळे वर्तुळ निर्माण करून तिला बंधित वा मूर्च्छित करण्याचे सामर्थ्य टायफॉनकडे असल्याचे त्याचे मत मेडयुअसाला पटवून देतो.
तर दुसरीकडे शुक्राचार्य हर्क्युलिअसने त्यांच्यावर बंधन केले असल्यामुले त्यांना भारतवर्षातील वाराणसी शहरातील घटना ते पाहू वा जाणू शकत नाही किंवा बाबेला व हेडिसला मेडयुसाच्या वाडयात शिरताना कोणी भ्रमित केले हे ते वा निक्स जाणू शकत नाही असे मत व्यक्त करताना आढळते.- (तुलसीपत्र क्रमांक ११३४)
पण ज्याप्रमाणे हनुमंताचे बंधन जांबुवंत आणि पुलिकाचे बंधन हायपेरिऑन आध्यात्मिक साहाय्याने दूर करू शकले तसे ह्या कोणाही दुराचार्‍यांना करता येत नसावे असे वाटते. मग तेथे अगदी शुक्राचार्य असो वा निक्स असो.
सध्या बहुचर्चित असलेल्या Illuminati मध्ये सुध्दा Project Joshua blue ;- आपल्या विचारामुळे मेंदूतून सतत अतिसूक्ष्म विद्यूत चुंबकिय लहरी प्रक्षेपीत होत असतात. या लहरी उपग्रहामार्फत पकडायच्या आणि एखाद्या व्यक्तिचे विचार जाणून घ्यायचे असं हे तंत्रज्ञान, काही दुराचारी अत्यंत विघातक कार्यासाठी वापरत आहेत असे वाचनात आले.
Frank Zappa हा rock band artist सांगतो की illuminati ही म्युझिक, फिल्म, न्युज, आणि पॉलिटिक्स च्याद्वारा mind control करत आहे हे सांगत होता. शेवटी त्याला त्याच्या शरिरात cancer घूसवून मारण्यात आलं असे ऐकिवात आहे.
आत्मघातकी बॉम्ब ( suicide bomb) म्हणून ज्या निष्पाप नागरिकांचा बळी घेतला जातो तेही अशाच मनोनियंत्रणामुळे प्रशिक्षीत केले जातात असे वाचनात आले.
म्हणजेच मनोनियंत्रण झुगारण्यासाठी फक्त परमेश्वरी कृपाच सहाय्य करू शकते असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही असे वाटते.

येथे अजून एका कोड्याची उकल होत नाही की र्‍हियाच्या जळत्या सभागृहाखालील गुप्त सभागृहात कायम सम्राट झियस, डेमेटर, इनाका, लेटो, माता सोटेरिया अशी सन्माननीय सावर्णी मंडळी वारंवार गुप्त सल्ला-मसलतींसाठी जमत असतात. खरेतर हा माता र्‍हियाचा वाडा जळल्याची गोष्ट किती तरी काळ आधी घडली आहे आणि त्यानंतर किती मोठा प्रदीर्घ काळ मध्ये लोटला असावा असे अग्रलेखांवरून ध्यानात येते , तरीही अजून तो वाडा जळतच कसा राहतो हे एक अगम्य कोडेच आहे, काय माहिती कधी बापू ह्याचे रहस्य उलगडून दावतील.
सध्या आग लागून जळालेल्या मेडयुसाच्या वाडयाची राख व्हायला पण जास्त वेळ लागला नाही, जी आग वास्तविक गरूडराजांच्या अद्भुत युध्द्विज्ञानाने बनविलेल्या स्फोटकामुळे हायपेरिऑनने लावली होती.
ही आग टायफॉनने लावली असावी असा संभ्रम मेडयुसा आणि मारडूकच्या मनात निरंआण करण्याची पुरेपूर खबरदारी हायपेरिऑन बाळगतो – काय जबरदस्त खेळी आणि प्लान्स असतात ह्या सावर्णी घराण्याचे …हे सर्व केवळ “त्या” महादुर्गेच्या आणि त्रिविक्रमाच्या कृपेनेच घडू शकते.
Centralia, Pennsylvania येथील coal mines मध्ये १९६२ साली लागलेली आग तब्बल ५० वर्षांहून अधिक काळ जळत आहे. ह्या कोळशाच्या खाणी ह्या जमीनीखाली होत्या. आणि कोळसा हा निखारा बनून धुमसत राहतो , विझत नाही लवकर.
मग र्‍हियाचा वाडा हा नक्की कशापासून बांधला गेला असावा? हा प्रश्न साहजिकच पडतो की जो वरून जळत राहिला आहे आणि खालील गुप्त सभागृहाला त्याची झळही पोहचत नाही. अनाकलीय गोष्टी आहेत सार्‍याच…
ह्या अग्रलेखातून बापूंनी खरेच खूप अगम्य कोड्यांना वाचा फोडली आहे असे दिसते.
मागच्या तुलसीपत्र ११३४ मध्ये आपण वाचले होते की शुक्राचार्यांचे कुविद्यासामर्थ्य कमी होत असल्याचे जाणवल्याने निक्स आपला स्वत:चा वेगळा मार्ग चोखाळण्याचे ठरवते आणि तिने थेट अंकाराचीच साधना करण्यास सुरुवात केली. तर आता ह्या तुलसीपत्र ११३६ मध्ये बापू लिहीतात की शुक्राचार्यांनी “निक्स”च्या रुपाने “अंकारा”लाच स्त्रीजन्माला घातलेले आहे आणि म्हणूनच तिचे मूळ नाव निशाचरी आहे.
खरेच खूपच उत्कंठा चाळवणारी आणि कुतूहल दाटवणारी ही लेखमाला सतत पुढच्या भागाची आतुरतेने प्रतिक्षा करायला भाग पाडते.
बापू आम्ही सारी तुझी लेकरे खरेच खूप खूप अंबज्ञ आहोत की केवळ तुमच्यामुळेच आज हे वैश्विक इतिहासाचे सत्य ज्ञान आम्हांला मिळू शकले.
हरि ॐ. श्रीराम . अंबज्ञ.
सुनीतावीरा करंडे