Mahadurga gives strength to do all good deeds

#73508

Ajitsinh Padhye
Participant

वैभवसिंह आणि डॉ.योगीन्द्रसिंह तुमचे विचार अतिशय सुंदर आणि मनाला पटणारे आहेत. बिजॉयमलानाच्या(Bijoymalana) प्रभावी व्यक्तिमत्वाबद्दल खरोखरच आधी एवढी कल्पना आली नव्हती. पण जसजसे अग्रलेख पुढे सरकत आहेत, तसतसे बिजॉयमलानाचे अतिशय उदार, सूज्ञ, शूर आणि चाणाक्य बुद्धीमत्वाचे व्यक्तिमत्व आपल्यासमोर फुलत जात आहे. वैभवसिंह आणि डॉ.योगीन्द्रसिंह तुम्ही जे बिजॉमलानाच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू मांडले आहेत, त्याबरोबर मला असेही वाटते की ही व्रती(Vrati) मंडळी कुठल्याही सत्कर्मासाठी, दुराचारी व्यक्तींविरुद्ध लढा देण्यासाठी, अतिशय टोकाला जाऊन “खोटे नाटक” रचण्यातसुद्धा किती मुरलेली आहेत ! इथे आठवते ते खूप सुरुवातीला बिजॉयमलानाने सॅथेडॉरिनाला भुलवण्यासाठी रचलेले “वेड लागल्याचे” नाटक ! सॅथेडॉरिना(Circe), क्रॉनस(Cronos) आदि धूर्त, चाणाक्ष मंडळींसमोर असे खोटे नाटक करून, ते सत्य असल्याची त्यांना जाणीव करून देणे ही काही सोपी गोष्ट नक्कीच नव्हती. त्याचप्रमाणे एका दुस-या टोकाला बघितलं तर झियसवर आत्यंतिक प्रेम करणारी, त्याच्यावरच्या नितांत प्रेमाने हळवी झालेली, “पतिव्रता” ह्या शब्दाला जागणारी एक प्रेमळ पत्नी म्हणून बिजॉयमलानाचे व्यक्तिमत्व ह्या गुरुवारच्या अग्रलेखामध्ये आपल्यासमोर झळकले ! ज्यावेळी झियस बिजॉयमलानाला म्हणतो की “माझा जर ह्या वैश्विक युद्धाता मृत्यु झाला तर….” त्यावेळी बिजॉमलाना अतिशय भावुक होऊन म्हणते, “हे प्रिय झियस(Zeus)! “मृत्यु हा शब्दही उच्चारू नकोस ! तुझ्या पाठीमागे मी जिवंत राहणेच शक्य नाही…”
म्हणजेच इथे जाणवते की सत्याच्या विजयासाठी लढणारी ही व्रती मंडळी फक्त शूर आणि पराक्रमी नाहीत, तर अतिशय भावनाप्रधान, प्रेमळ आणि एकमेकांवर जीव लावणारी मंडळी आहेत. अर्थात डॉ.योगीन्द्रसिंहने त्यांच्या पोस्टमध्ये म्हटल्याप्रमाणे बिजॉयमलाना आपल्या कर्तृत्वाचे सर्व श्रेय महादुर्गा(Mahadurga) अर्थात ‘मॅग्ना थेमिस’लाच बहाल करते आणि आपल्या कर्तृत्वामध्ये महामाता सोटेरिया व थियाच्या सहाय्याची, आधाराचीही तिला जाणीव आहे व ती जाणीव ती स्पष्ट शब्दांत व्यक्त करते. म्हणजेच बिजॉयमलाना एक पूर्णपणे श्रद्धावान स्त्री आहे आणि तिच्या भक्तीच्या व कृतज्ञतेच्या (अर्थात “अंबज्ञतेच्या”) ताकदीमुळेच, तिचे विविध आदर्श पैलूंनी विकसित झालेले प्रभावी व्यक्तिमत्व आपल्यासमोर उभे राहते असे मला वाटते.