Mahadurga and Trivikram are always with us

Forums वैश्विक वास्तव (The Universal Truth) प्रारंभ Mahadurga and Trivikram are always with us

#426912

Mahadurga and Trivikram are always with us

हरि ॐ. आजचा दिनांक २४-०९-२०१५ चा अग्रलेख तुलसीपत्र ११५३ हा एकामागून एक आश्चर्याचे मोठे मोठे धक्केच देत होता असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही असे वाटते.
कोणतेही संकट असो वा आनंदाचा परमोच्च क्षण असो महादुर्गेचा(Mahadurga) आणि त्रिविक्रमाचा(Trivikram) जयजयकार करायला , त्यांचे स्मरण करायला हे सावर्णि(Savarni) घराणे कधी चुकत नाही ही गोष्ट आपण प्रत्येक श्रध्दावानाने ध्यानात घेऊन स्वत:च्या आचरणात १०८ % उतरविण्याची नितांत गरज आहे असे वाटते.
सावर्णि घराण्यातील प्रत्येकाच्याच मग ती बिजॉमलाना (Bijoymalana) असो , डेमेटर (Demeter) असो , महामाता सोटेरिया (Soteria) असो की सम्राट झियस(Zeus) असो असीम त्यागाने , त्यांच्या महादुर्गेच्या आणी त्रिविक्रमाच्यावरील अपार , अतूट निष्ठेने मन भारावून जात होते. आज हायपेरिऑन, इपेटस आणि एरॉसची माता असलेली माता मीनाक्षी हिचा स्वत:च्या जीवाची पर्वा न करता स्फटिकमस्तिष्कावरील ताबा कोणा दुष्टांच्या हाती लागू नये म्हणून केलेला त्याग , तिचे अचाट शौर्य पाहून असेच दिङ्मूढ व्ह्यायला झाले. आणि तिचे चित्र संगणकीय पडदयावर दिसत असतानाच एकाएकी तिचे असे सर्वांसमोर उपस्थित होणे ही खरोखरीच अद्भुत गोष्टच म्हणावी लागेल. Live Telecast चालू असताना तेथील तुमची प्रिय
व्यक्ती तुमच्या समोर साक्षात येऊन उभी राहिली तर काय आनंदाला पारावार उरेल, नक्कीच नाही ना? अशीच अवस्था तेथील प्रत्येकाची नक्कीच झाली असणार , विशेषत: अनंतव्रताची आपल्या सख्ख्या बहिणीला माता मीनाक्षीला आपल्या समोर पाहून !
काय अफाट , अचाट तंत्रज्ञान होते नाही ह्या सावर्णि घराण्याकडे !!!
आता तेच स्फटिकमस्तिष्क माचु-पिचुच्या सूर्यमंदिराच्या गुप्त गाभार्‍यामध्ये स्थापन झाले आणि ऍस्लापियसने नवीन कार्यप्रणालीनुसार कार्यान्वितही केले ही खरोखरच अत्यंत महत्त्वपूर्ण घटना घडविण्यात सावर्णि घराण्याला यश मिळाले आहे हे वाचताना खूप आनंद झाला.
आपल्या जीवावर उदार होऊन, स्वत:च्या जीवाची पर्वा न बाळगता आपल्या कर्त्यव्यात तसूभरही न चुकणारे हे सावर्णि घराणे आपल्या नातेसंबंधाना किती प्रेमाने घट्ट बांधून ठेवतात हे अनंतव्रताच्या अस्वस्थ होण्यातून दिसले. त्याची सख्खी बहीण माता मीनाक्षीच्या चिंतेने तो असाच भावाकुल झालेला दिसतो. किती घट्ट आहे ह्यांच्या नात्यांची , प्रेमाची , विश्वासाची वीण ….
दादा. आपण ८ सप्टेंबर २०१५ ला शुक्राचार्य वंशावळ दिली होती त्यामुळे आजचा दिनांक २४-०९-२०१५ अग्रलेख तुलसीपत्र ११५३ समजावून घेण्यास फारच मोलाची मदत झाली. शुक्राचार्य आणि केरीडवेन ह्या पती-पत्नीचा टायफॉन हा मुलगा आणि सेमिरामीस ही मुलगी. त्याच शुक्राचार्यांची कद्रू ही मुलगी आहे. तुलसीपत्र ११३८ मध्ये बापूंनी सांगितले होते की बुंगीच्या रुपातील महामाता सोटेरिया आपल्याकडील शुक्राचार्य- बहुवाक – निकस – ऍपोरोजाटस् – एपिमेथियस – थाडा ह्या युतीचे सर्व पुरावे, छायाचित्रे व छायाचित्रणासह संवाद दाखवून लिलीथला कसे आपल्या मायाजालात ओढते. त्यावेळी लिलीथच्या ते सर्व पाहून जे सत्य कळले होते ते म्हणजे की अंकारा हा फक्त हॉरेमाखेतच्याच शरीराला उर्जा पुरवू शकत होता आणि त्यामुळे अंकाराने स्वत: हॉरेमाखेतच्या शरीरात घुसून कद्रूच्या पोटी सॉलोमन झेलहुआचा जन्म झाला होता. लिलीथ पुडःए हे ही जाणते तिच्या चिंतनातून की शुक्राचार्य व केरीडवेनचा पुत्र असणारा टायफॉन हा मारला गेला आहे व टायफॉनच्या शरीराचा वापर करून कुणीतरी दुसराच वावरत आहे.
अर्थात लिलीथला कळलेले सत्य हे फक्त महामाता सोटेरियाला जेवढे गरजेचे होते तेवढेच दाखवले गेले होते.
आता आजच्या म्हणजे तुलसीपत्र ११५३ मध्ये आपण वाचतो की सेमिरामिस घुबडासुरस्थानावर लपून बसली असता तिला कळले की टायफॉन हा कुणाकडून तरी पूर्णपणे मनोनियंत्रित केला गेलेला आहे . तो कुणाचा तरी यांत्रिक गुलाम आहे . पण टायफॉनला गुलामीत कोण ठेवू शकणार? आणि माता केरीडवेन असताना तर हे घडणे केवळ अशक्यच असे तिला प्रथम वाटले. पण पुढे टायफॉनच्या यांत्रिक हालचाली पाहून तिच्या मनात संशय उत्पन्न झाला होता आणि जेव्हा ती ढोलीत लपून बसली असताना पुढचे दृष्य पाहून तिची अवस्था भूकंप झाल्यासारखी झाली होती कारण तिचा बंधू टायफॉन हा मूर्तीत खेचला गेला होता आणि तात्काळ दुसरा टायफॉन मूर्तीतून बाहेर पदून ती लपलेल्या ढोलीच्या विरूध्द दिशेने निघून गेल होता आणि अर्थात त्या वेळी तिच्या गळ्यातील दंतमाळेने तिचा खरा बंधू टायफॉनची स्पंदने न दिल्याने सेमिरामिसला सत्य कळले होते.पुढे परत तिने टायफॉनचा पाठलाग केला आणि तिने स्वत: सिध्द केलेली निकेजा कुचिद्या वापरून सत्य समजावून घेतले की टायफॉनच्या रुपात वावरणारा झेलहुआ़च तिच्या मातेचा केरीडवेनचा प्रियकर आहे आणि त्यामुळेच तिचे शुक्राचार्यांशी वैर झाले आहे. आणि तिच्या मातेनेच तिचा बंधू असणार्‍या खर्‍या टायफॉनला बंदिस्त करून ठेवलेले आहे.
पुढे तर सेमिरामिसला जे सत्य कळते ते वाचताना आपलीही स्थिती तिच्य प्रमाणेच महाप्रलय झाल्यासरखीच होते की झेलहुआ हा देखिल खरा कद्रूपुत्र नसून , खर्‍या कद्रूपुत्रास ठार मारून त्याच्याच शरीरात घुसलेला हा अंकाराचा सर्वात लाडका पुत्र ’बफोमेट ’ ( महिषासुर) आहे व त्याच्याच ताब्यात हॉरेमाखेत आहे आणि हॉरेमाखेतच्या ताब्यात तो नाही.
काय भयंकर गोंधळ घालता आहेत हे असूर , वामाचारी पंथाचे लोक. कुणाचा कुणावर विश्वास तर नाहीच , ती खूपच दूरची गोष्ट आहे. पण पती-पत्नी, माता – पुत्र – पुत्री ही कोणतीच नाती ह्यातले प्रत्येक जण आपल्या स्वार्थासाठी जुमानत नाही.
आता तसे पाहायला गेले तर कद्रू ही केरीडवेनची सख्खी मुलगी नसली तरी ती शुक्राचार्यांची मुलगी आहे ( कद्रूच्या मातेचे नाव वाचल्याचे आठवत नाही ). आणि केरीडवेन ही सॉलोमन ह्या कद्रूच्या व हॉरेमाखेतच्या पुत्राची प्रेयसी बनली आहे शुक्राचार्यांना लाथाडून. म्हणजे तसे बघायला गेले तर सॉलोमन हा केरीडवेनच्या नातवाच्या जागी आहे . पण पुढे वाचून कळते की सॉलोमन हा सुध्दा खरा कद्रूपुत्रच नाही आहे आणि त्याला मारून त्याच्या शरीरात घुसलेला हा अंकारापुत्र बफोमेट महिषासुर आहे. आणि तरी देखिल हॉरेमाखत आपल्या पुत्राचा खर्‍या सॉलोमनला मारले गेले असतानाही काही न करू शकता उलट स्वत:च त्या बफोमेटच्या ताब्यात गेला आहे.
पुढे बापूंनी तुलसीपत्र ११४० मध्ये हर्क्युलिसला कळते की टायफॉनच्या रूपात सॉलोमन वावरत आहे तेव्हा त्याच्या प्राणांहूनही प्रिय असणार्‍या ऍफरोडाईटच्या काळजीने तो नेहमीच्या ठरलेल्या वेळेपेक्षा आधीच तिला भेटायला क्रेटे बेटावर जातो आणि जलाशयाच्या काठचे दृष्य बघून प्रचंद चिडतो. तेव्हा त्याच्याच मागे असलेली त्याची प्राणप्रिया ऍफरोडाईट त्याला एक सत्य दाखवते आणि सांगते की टायफॉनचे गुप्त रहसयरूप जे अवघ्या दहा दळांपुरते तो जलाशयातून बुडी मारून वर येत असताना प्रगटले होते ते सत्य दाखविणारे ते सरोवर ही तिची त्याला भेट आहे. तेव्हा वाटले होते की येथे काहीतरी नक्कीच पाणी मुरतेय. जत टायफॉन हा सॉलोमन आहे हे हर्क्युलिसला कळले होते तर ते त्याच्या ऍफराला नक्कीच माहीत असणार आणि ज्या अर्थी ती हर्क्युलिसला भेट म्हणून ते सरोवर देते तर त्यामागे काहीतरी खूप मोठे रहस्य नक्कीच दडलेले असेल. आज आता तुलसीपत्र मधील सेमिरामिसचे मत वाचून वाटले की कदाचित टायफॉन हा सॉलोमन नसून अंकारापुत्र बफोमेट किंवा महिषासुर आहे हेच सत्य तिने हर्क्युलिसला भेट म्हणून दिले असेल कारन हाच तर त्यांच्या युध्दाचा खूप मोठा डावपेच आहे असे मला तरी निदान आता पर्यंतच्या लेखमालेवरून वाटते. माझे मत चुकीचे असू पण शकते कारण येथील सर्वच गणिते ही खूप विचीत्र प्रकारे चालली आहेत. बापूच आता खरे सत्य सांगतील तेव्हा कळेल.
त्या वेळेस हा अंकारापुत्र बफोमेट हा नक्कीच मारला गेला असणार सावर्णि घराण्या कडून आदिमातेच्या आणि त्रिविक्रमाच्या कृपेने .
पण आज त्याच बफोमेटचे देऊळ अमेरीकेत बांधले गेले आहे आणि आता होईल ते अंतिम निर्णायक तिसरे महायुध्द ! अर्थात विजय आपल्या आदिमातेचा महिषासुरमर्दिनीचाच आणि पर्यायाने तिचा लाडका पुत्र त्रिविक्रम आपला लाडका सदगुरु बापूरायाचाच होणार हे त्रिकालाबाधित सत्य ! पण त्यासाठी आपणही सावर्णि घराण्याप्रमाणेच सातत्याने आदिमातेचे आणि त्रिविक्र्माचे स्मरण करायलाच हवे आणि त्यांच्याच चरणांशी आपली अंबज्ञता टिकून राखण्यासाठी अव्याहतपणे बापूंनी आपल्याला दिलेल्या उपासना, प्रार्थना न चुकता करायलाच हव्यात असे प्रामाणिकपणे वाटते.

अतिशय आतुरतेने पुढच्या अग्रलेखाच्या प्रतिक्षेत ….

महादुर्गा विजयते ! त्रिविक्रम विजयते !
जय जगदंब जय दुर्गे !!!
हरि ॐ . श्रीराम. अंबज्ञ

सुनीतावीरा करंडे.