Lilith, Circe, Nemesis, Shukracharya all on one side

Forums वैश्विक वास्तव (The Universal Truth) प्रारंभ Lilith, Circe, Nemesis, Shukracharya all on one side

#86007

ketaki. Kulkarni
Participant

हरी ॐ दादा
खुप अंबज्ञ इथे अग्रलेख मालिकेवर डिस्कस करण्यासाठी एक प्लेटफार्म दिल्याबद्दल..
आतापर्यंतची ही मालिका वाचता वाचता एक गोष्ट अगदी प्रकर्षाने जाणवली.. ती म्हणजे बापू नेहमी आपल्या प्रवचनांमधून जी गोष्ट कायम सांगत आले आहेत व आज ही सांगत असतात..
भक्ति करणे हे भेकड लोकांचे काम नाही. ह्याची ह्या सर्व इतिहासातून पुन्हा एकदा खात्री पटते.
ज्याप्रमाणे बिजोयमलाना(Bijoymalana), लेटो(Leto), नेफिल(Nephil), अफ्रोडाइट(Aphrodite)(जी स्वतः एक देवी असते), ओहोमीना(Ahomina), झियस(Zeus), अपोलो(Apollo), हर्मिस(Hermes)…. हे सर्व मोनोडोरेगा म्हणजेच त्या महादुर्गेला मानणारे असतात. आणि त्यामुळे ते बिकट प्रसंगीसुद्धा खंबीरपणे राहु शकतात.
इकडे स्वतःसच विद्वान समजणारे शुक्राचार्य(Shukracharya), सर्की(Circe), ओपेरोजाट्स, लिलिथ( Lilith ),अवदसा(Nemesis), क्रोनोस(Kronos)… इत्यादि काळ्या कृत्यांमधेच व्यस्त असतात.. त्यांच्या मनात फक्त एकच गोष्ट घुमत असते.. ती म्हणजे सत्ता! प्रत्येक जण स्वतःला राज्य करायला मिळाव म्हणून ह्याला त्याला गरजेपुरता वापरत राहतो. व एकाचे काम संपले की मग त्याचा काटा काढून स्वतःची वाट मोकळी करायला बघत राहतो आणि ह्यामुळेच त्यांचा आपापसात ही विश्वास नावाची गोष्ट उरत नाही.. त्यांच्या so called गुरुंबद्दल ही नाही आणि त्यांच्या so called आप्तेष्टांबद्दल ही नाही.. कुठेही हे विश्वास ठेउच शकत नाही.. आणि म्हणूनच मग ह्यांचा घात हा निश्चितच असतो..
तेच बाकी सर्व श्रद्धावान ह्यांचा एकमेव त्यांच्या सदगुरुंवरच संपूर्ण विश्वास असल्यामुळे ते एकमेकांशी त्या विश्वासात बांधलेलेच राहतात.. आणि संकटकाळी वाईट प्रसंगी त्या एकावरच विश्वास ठेऊन, ‘त्याची’ मनोभावे भक्ति करून एकत्रितपणे लढा देतात.. आणि म्हणून मग श्रद्धावानांचा विजय ठरलेलाच असतो.

अंबज्ञ
केतकीवीरा कुलकर्णी