Lilith and Aphrodite

#129978

Sangita Vartak
Participant

हरि ॐ,
अंबज्ञ साईलीवीरा….
काल १०७८ वे तुलशीपत्राचा अग्रलेख वाचला आणि कळले की शुक्राचार्याला (Shukracharya)समजून चूकले की, महादुर्गाचे मनोगत तिच्या पुत्राशिवाय कोणालाही कळू शकत नाही…. त्रिविक्रम(Trivikram) भारतवर्षावर कैलासावर(Kailash) उतरला आणि तप:श्चर्यस बसला आहे….
निक्सने लिलिथच्या(Lilith) सहाय्याने घोरातिघोर तप:श्चार्या करून अ‍ॅफ्रोडाईट्च्या(Aphrodite) मनाचा ताबा मिळविला असे शुक्राचार्याला आणि बाकीच्यांनाही वाटते…. पण या श्रद्धाहीनांना त्या मोठी आई आणि त्रिविक्रमाच्या योजनांची काही कल्पना असण्याची शक्यताही नाही… आणि त्यांच्या त्या मनाचा ताबा मिळविलेली अ‍ॅफ्रोडाईटच त्यांच्या कट कारस्थानावर पाणी कसे पाणी फेरते ते बघत रहायचे….
गुरुवार दि. १२ फेब्रुवारीच्या १०७७ च्या अग्रलेखात शेवटच्या पॅरिच्छेदात गोरिलॉनचा उल्लेख होता… कुठेतरी विश्वास होता की हा कोणीतरी व्रती असणार आणि तो बहुदा त्यांच्यात शिरून त्यांचे काहीतरी नुकसान किंवा हानी करणार…. पण तरी पुढे त्याचे काय होईल याची खूप उत्सुकता लागली होती…. त्यामुळे आजचा अग्रलेख आला आणि वाचायला गेले तर…. सुरवातीला गोरिलॉनचा काही उल्लेखच नव्हता…. प्रत्येक अग्रलेख हे पहिल्या वेळेस वाचताना अक्षरश: अधाश्यासारखे वाचायची सवयच झाली आहे….. कारण पुढे काय होते याची लवकर माहीत करून घ्यायची घाई असते ना!…. त्याचप्रमाणे कालचा अग्रलेख वाचतानाही केले… अर्ध्याहून जास्त अग्रलेख वाचून झाल्यानंतर त्या गोरिलॉनचा उल्लेख आला… आणि बरे वाटले त्याने हर्मिसला लेटोला तुरुंगातून सोडविण्यासाठी मदत केली… व्रतीच्याच विश्वासातील माणूसच होता…. काय जबरदस्त प्लॅनिंग ना…. लेटोची त्या तुरुंगातून सुट्का झालीच… बरोबरच आहे ती महादुर्गा आपल्या लाडक्या लेटोला तुरूंगात कसे बरे राहू देईल… अग्रलेखात शेवटी तो गोरिलॉन थाडाकडे जाणार कळले…. ते कसे ते कळण्यासाठी पुढच्या अग्रलेखाची वाट पहावी लागणार….
अंबज्ञ…. हरि ॐ…..