King Zeus started for all the arrangements

Forums वैश्विक वास्तव (The Universal Truth) प्रारंभ King Zeus started for all the arrangements

#115910

Suneeta Karande
Participant

हरि ॐ दादा. अजितसिंह तुमच्या मताशी मीही सहभागी आहे.आजचा दिनांक ०४ फेब्रुवारीचा बापूंचा अग्रलेख वाचून खरेच खूपच अस्वस्थ व्हायला झाले, मन खूप बेचैन झाले आणि मानसिक धक्का एवढा जबरदस्त होता की आजवर कोणा आप्ताच्या अशुभ, अमंगल दु:खद बातमीने ही मन हळवे झाले नव्हते एवढी खिन्नता मनात दाटली आणि खरोखरीचे अश्रूच दाटले. नाही बापूराया असे होऊच शकत नाही, बापू Please Please एकदा तरी सांगा ना , बापू म्हणा ना की अफाट पराक्रम गाजवणारी , अंगाप्रत्यंगात वीरश्री संचारलेली सम्राज्ञी बिजॉयमलाना, अत्यंत चाणाक्ष,चतुर,पराकोटीचे असामान्य धैर्य गाजवणारी गुप्तहेर प्रमुख लेटो , माता र्‍हिया, आर्टेमिस हे सारे सुखरूप आहेत. मन एकीकडे आक्रंदत होते नाही नाही असे आमची आजी , मोठी आई – महादुर्गा ,आमची लाडकी महिषासुरमर्दिनी – आदिमाता चण्डिका आणि तिचा पुत्र त्रिविक्रम हे घडूच देणार नाही. पटकन जाऊन “मातृवात्सल्य उपनिषद” हातात घेतले आणि म्हटले आजी तू सांग ना , ही थरार कथा , हे नाट्य आहे आणि खरे सत्य वेगळेच आहे. खरोखरीच जणू आपली मोठी आईच सांत्वन करून धीर देत होती आणि एक एक कथा स्मरू लागली आणि पहिल्यांदा आठवले ते सद्गुरु दत्तात्रेय व किरातरुद्र ह्यांच्या उपस्थितीत परमात्म्याने गायलेले चण्डिकाप्रसाद स्तोत्र…
चण्डिकाप्रसाद स्तोत्रातील काही ओळी अगदी रामबाण औषध असल्या प्रमाणे मनोधैर्य देणार्‍या ठरल्या –
ही माझी आदिमाता एवढी विलक्षण सुंदर आहे ,
आणि म्हणूनच माझे जीवनही खूप सुंदर आहे ।।३।।
ही माझी आदिमाता कधीच चुकत नाही,
आणि म्हणूनच माझे जीवनही कधीच व्यर्थ जाणार नाही ।।४।।
ही माझी आदिमाता कधीच विकृत होत नाही
आणि म्हणूनच माझे जीवनही कधीच विकृत होणार नाही ।।५।।
ही माझी आदिमाता सदैव एवढी लवचिक आहे,
आणि म्हणूनच मी कधीही मोडणार नाही ।।९।।
ह्या माझ्या आदिमातेला कुठलेही शस्त्र इजा करू शकत नाही,
आणि म्हणूनच माझी वेदना कधी टिकू शकत नाही ।।११।।
ही माझी आदिमाता कधीच कुणाचे वाईट करू इच्छित नाही ,
आणि म्हणूनच कुणीही माझे वाईट करू शकणार नाही ।।१२।।
ही माझी आदिमाता कधीच पराभूत होत नाही,
आणि म्हणूनच माझे अपयशही मला अधिक संपन्न करेल ।।१३।।

आता मनाला उभारी आली , परत एकदा अग्रलेख वाचला , अरे नाही डेमेटर ज्याप्रमाणे जिवंत आहे आणि बेमालूमपणे थाडाच्या रुपात वावरत आहे आणि तिच्याच सारखी दिसणारी तिची कनिष्ठ भगिनी ’हेस्टिया’ सुध्दा थाडा बनून आहेत, त्या अर्थी हा भीषण देखावा शत्रूपक्षाची फसगत करणारा नक्कीच असू शकतो.
होय, कारण हे “व्रती” पंथीय सतत महादुर्गेचे स्मरण करत राहतात आणि आपली अंबज्ञता ही व्यक्त करताना आढळतात.
आताच आपण वाचले की हर्मिसने अत्यंत कृतज्ञतेने त्या अज्ञात सहाय्यकर्त्याचे आभार मानून महदुर्गेचे स्मरण केले. राजकन्या क्वीओम मात्र अत्यंत शांतपणे महादुर्गेचे स्तवन जराही न थांबता जपत होती.
जेथे माझ्या आदिमातेचे स्मरण , मनन, चिंतन आहे, सततची पावला पावला वरची अंबज्ञता आहे तेथे विकृतता , अपयश असूच शकत नाही.
एवढ्या धीर-गंभीर परिस्थीतही आपल्याला हर्मिस कर्तव्यदक्ष कसे राहायचे , अतीव दु:खातही आपल्या सावर्णि घराण्याची परंपरा न विसरता कशी जपायची , आपले दु:ख कसे लपवायचे हे शिकवून एक अत्युच्च आदर्शच घालून देतो. माता र्‍हियाची दारूण परिस्थिती पाहून निराशेने खचून जाणार्‍या हर्मिसला पाहून खूपच मन कळवळले आणि त्या क्षणी त्याला आदिमातेने डेमेटरच्या रुपाने कसे सहाय्य पुरविले हे वाचून सदगदित व्हायला झाले . आपल्या बापूंनी ” श्रीमदपुरुषार्थ – सत्यप्रवेश: ” ह्या प्रथम खंडात शिकविलेली पहिली प्रार्थना आठवली –
प्रार्थना -१
ह्या अनसूयानंदन दत्तात्रेयाचे आपण स्मरण करू या.
त्याचे गुणगान करू या.
प्रभू सच्चिदानंदा ,
तुझ्या शंखाच्या ध्वनीने सर्व विश्व दोलायमान होते ,
परंतु तोच शंखध्वनी भक्तांना स्थिर करतो.
तुझा क्रोध अगदी दुष्टांवरही क्षणमात्र राहतो,
परंतु तुझा कृपाप्रसाद मात्र चिरकाल टिकतो.
तुझा मार्ग तूच मला दाखव.
माझ्या मनावरचे दडपण काढ.
माझे अज्ञान दूर कर.
माझा पुरुषार्थ सिध्द कर.
तू सर्वोत्तम व निष्कपट आहेस.
म्हणूनच तूच मला कपटापासून वाचवू शकतोस.
मलाही निष्कपट कर.
सदगुरुराया, माझ्या जीवाचे रक्षण कर.
माझ्या कुटूंबाचे रक्षण कर.
आम्हाला कधीही लज्जास्पद अवस्थेत फार काळ ठेवू नकोस.
आणि आठवले दुष्काळात गरीब , लाचार जनतेची हलाखीची परिस्थिती पाहून धान्याची कोठारे उघडी करून देणार्‍या संत दामाजीपंताचे रक्षण करण्यासाठी, त्यांची लज्जास्पद अवस्था दूर करण्यासाठी – हा माझा बापूरायाच – कसा झाला महार पंढरीनाथ — झाला होता, कशा राजाच्या दरबारात खळखळा सुवर्ण मुद्रा ओतल्या होत्या…. Yes “तो” येतोच. “तो” येणारच , “तो” माझाच आहे – बस “एक विश्वास असावा पुरता कर्ता हरता गुरु ऐसा” हा मनात भाव हवा.
मग नक्कीच हा सर्वांसाठी धावला असणारच.
हर्मिसच्या मनात सूडाचा प्रवासही सुरु होऊन घट्ट होऊ न देण्याची काळजीही “ती आदिमाता” आणि “तिचा पुत्र त्रिविक्रम” घेतात.
आता आठवले की बापू नेहमी सुशीलाताई इनामदारांच्या त्या ओळींचा का वारंवार प्रवचनांतून उल्लेख करतात –
जन्म माझा व्यर्थ ना हो मृत्यु लागो सार्थकी ।
होय, माझा सदगुरुराया , माझा बाप माझे मन:सामर्थ्य आधिक बळकट करतो आहे, जणू मनावर, बुध्दीवर कोरून ठेवतो की बाळांनो मी तुमचे जीवनच काय पण मृत्यु देखील व्यर्थ जाऊ देणार नाही – १०८%
मग आठवले ते आपल्या बाप्पाने ” राम-रसायन” मध्ये कथिलेली कथा-
साक्षात श्रीराम प्रभूंनी आपल्या लाडक्या लक्ष्मणाचे केलेले सांत्वन आणि जाणीव करून दिलेली धर्मपालनाची – “प्रिय लक्ष्मणा, केवळ माझ्यावरील नितांत प्रेमामुळे शोकसागरात तू बुडतो आहेस. खरं तर कुठल्याही शोकसागरातून कुणालाही तारून नेण्याचे सामर्थ्य तुझ्यात असताना तू स्वत:च असे विचार का करतो आहेस? स्वत:च्या सुखापेक्षा धर्मपालन हेच अधिक सुखावह असते, नाही का?
मला नेहमी वाटायचे की श्रीराम आणि लक्ष्मण हे दैवी अवतार आहेत … देवाला आपल्या भावनांवर आवर घालणे , दु:खाला गिळून ,अश्रूंना मुरड घालून सदैव धर्माचे आचरण करणे, कर्तव्यपालन करणे हे साध्य होऊ शकते पण सामान्य माणसाला हे जमणे खूप अवघड जात असावे.
पण आजच्या अग्रलेखातून बापूंनी तेही दाखविले. आपण वाचले की हर्मिस हा अ‍ॅपोलो व सोरेथसलाही शोकसागरातून बाहेर काढून कशी आपल्या कर्तव्याची, अधिकाराची जाणीव करून देतो. आणि म्हणूनच हर्मिसच्या शब्दांची ही ताकद आहे की तो अ‍ॅपोलो व सोरेथसलाही भानावर आणू शकतो.
हेच “चण्डिकाप्रसाद स्तोत्र” अजून एका प्रसंगातही काम करताना आढळले की दिनांक २५ जानेवारीच्या अग्रलेखात बापूंनी पुलिकाची गोष्ट सांगितली होती.
एवढी वर्षे सेमिरामीसची मानसिक गुलाम असणारी पुलिका तिच्या कन्येच्या आणि नातवाच्या मुखातून बाहेर आलेले थियाचे शब्द व अ‍ॅफ्रोडाईटचे काव्य कानावर पडताच पूर्ण जागृतीत आली होती…काय जबरदस्त सामर्थ्य , ताकद आहे आमच्या आदिमातेची चण्डिकेची अर्थात मेग्ना थेमिस म्हणजेच महादुर्गेची नाही…. आदिमातेला स्वत:ला काही करावे पण लागत नाही , ही तर फक्त तिच्या नामाची ताकद आहे.
चण्डिकाप्रसाद स्तोत्रात काही ओळी –
ही आदिमाताच माझ्या सप्तचक्रांची स्वामिनी
आणि दोन सुप्तचक्रांची प्रेरणास्तोत्र आहे ।।२।।
आणि म्हणूनच एवढी वर्षे सेमिरामीसची मानसिक गुलाम असणारी पुलिका तिच्या कन्येच्या आणि नातवाच्या मुखातून बाहेर आलेले थियाचे शब्द व अ‍ॅफ्रोडाईटचे काव्य कानावर पडताच पूर्ण जागृतीत आली होती…काय जबरदस्त सामर्थ्य , ताकद आहे आमच्या आदिमातेची चण्डिकेची अर्थात मेग्ना थेमिस म्हणजेच महादुर्गेची नाही…. आदिमातेला स्वत:ला काही करावे पण लागत नाही , ही तर फक्त तिच्या नामाची ताकद आहे. जिची मानवी देहातील सप्तचक्रांची स्वामिनी आहे आणि दोन सुप्तचक्रांची प्रेरणास्तोत्र आहे, तिच्या पुढे हे “Mind Control ” करणारे कुणाचेच काहीच चालूच शकत नाही.
ह्याचे अजून एक उदाहरण आपण ” मातृवात्सल्य विंदानम्” मध्ये ही वाचतो की शुक्राचार्यांच्या शापामुळे बिभीषणाला रावणाच्या देहातील
अमृतकलशाचे स्थान पूर्णपणे आठवत नसते, शापाच्या प्रभावाने बिभीषणाचे ह्या गोष्टीचे स्मरण नाहीसे केले होते. परंतु ज्या क्षणी श्रीराम, लक्ष्मण, हनुमंत आणि बिभीषण श्रीरामांच्या विजयप्राप्तीसाठी श्रीहनुमंताच्या सुचवण्यानुसार आपल्या मूळ मातेचे म्हणजेच आदिमातेचे “अशुभनाशिनी स्तवन” अत्यंत भक्तीभावाने सर्व मानव वंशाचे प्रतिनीधी बनून १०८ वेळा म्हणतात तेव्हा आदिमातेच्या श्रीरामांस दिलेल्या विजयाच्या वरामुळे शुक्राचार्यांच्या शापाचा प्रभाव आपोआप नाहीसा होतो व बिभीषणास हळू हळू सर्व आठवू लागते.
तसेच पुलिकाच्या बाबतीत ही घडताना आपण पाहतो.
म्हणजेच महाचेटकीण सेमिरामिस असो नाहीतर सर्व दानव, राक्षस दुराचार्‍यांचे गुरु शुक्राचार्य असो ते आदिमातेपुढे अगदी य:किंचीत असतात… किस झाड की पत्ती अशीच त्यांची गत होते.
पुलिकाच्या मनावरचे सेमिरामिसचे नियंत्रण कसे नाहीसे झाले ह्याबाबत ह्या ओळी आपले मार्गदर्शन करतात असे वाटते –
ही माझी आदिमाता ह्या विश्वातील प्रत्येक चूक दुरुस्त करीत असते,
आणि म्हणूनच माझ्या त्रिवीध देहातील विकृती तीच दुरुस्त करते,
आण्नि मी अविकृत राहतो ।।१४।।
ह्या माझ्या आदिमातेच्या प्रत्येक उच्छवासातून
असंख्य अद्भुत चमत्कार बाहेर पडत असतात,
आणि म्हणूनच तिचे नाम घेऊन जो श्वास मी आत घेतो,
त्या श्वासाबरोबर माझ्या त्रिवीध देहात अनेक चांगले चमत्कार
घडत राहतात ।।१५।।
पुलिकाच्या गोष्टीत आपण पाहतो की पुलिका तिच्या कन्येच्या आणि नातवाच्या मुखातून बाहेर आलेले थियाचे शब्द व अ‍ॅफ्रोडाईटचे काव्य कानावर पडताच पूर्ण जागृतीत आली होती. अ‍ॅफ्रोडाईटचे महादुर्गेवरील वरील प्रेम , तिने स्थापन केलेले एकमेव मंदिर आणि स्वत:च्या हाताने स्थापन केलेले पवित्र अग्निकुंड ह्याबाबत वाचल्यावर असे वाटते की त्या काव्यातही आदिमातेची स्तुतीच असावी आणि म्हणूनच
आणि म्हणूनच तिचे नाम घेऊन जो श्वास पुलिकेने आत घेतला ,
त्या श्वासाबरोबर तिच्या त्रिवीध देहात अनेक चांगले चमत्कार घडत राहिले.
ह्या सार्‍या दुराचार्‍यांना तिने मला तर वाटते स्पष्ट्पणे तिच्या “नंदिनी ” अवतारातच ग्वाही दिली आहे जी आपल्याला बापूंनी “मातृवात्सल्य विंदानम् ” च्या २९व्या अध्यायात सांगितली आहे-
“हे मूढांनो , आत्तापर्यंत कधीही परमात्म्याच्या शत्रुंचा विजय झालेला नाही व ह्यापुढेही होणार नाही. ”
म्हणजेच “वैश्विक इतिहास” असो , राम-रावण घनघोर युध्द असो कुरुक्षेत्रावरील महाभारत रणसंग्राम असो ज्यात तिच्या पुत्राने परमात्मा श्रीकृष्णाने हाती शस्त्रही धरले नव्हते वा तिसरे महायुध्द असो ज्यात हातातील शृंखला ही त्यागून “त्या” ने आधुनिक युगाचे “मोबाईल” हे साधन हाती धरलेले असो —- अंतिम विजय हा “त्या”चाच असतो आणि “तो” माझा , आपला परमात्मा देवीसिंह , त्रिविक्रम आणि बापू बनून कुरुक्षेत्र न होऊ देण्यासाठी काळाच्या छातडावर आपली पावले रोवून उभा असलेला “अनिरुध्द” परमात्मा आपला सदगुरु आहे , मग “विजय” हा “त्या”चाच आहे आणि आम्ही “त्या”चे वानरसैनिक आहोत…. जे अनिरुध्दांचे रामराज्य आणण्या कटीबध्द आहोत….

सचिनसिंहानी मांडलेले मुद्दे ही मनाला पटतात की आधीच्या अग्रलेखातील (हजारो सैनिक नेफिलिमांचा डेमेटरच्या गृहावर हल्ला झाल्यावर) ‘सम्राट झियस (Zeus)जराही न डगमगता अतिशय शांतपणे परंतु अतिजलद वेगाने सर्व व्यवस्था करू लागला’ – हे शेवटचं वाक्य खूपच गहन आशय व्यतीत करणारे असावे. ज्या अर्थी सर्कीची नेफिलीम बनवण्याचे कारस्थान कळलेले आहे त्या अर्थी काही तरी कटाला काट्शह देणारी योजना सम्राट झियसने अवलंबिली नक्कीच असणार.

आता वेध लागले आहेत ते कधी एकदा बापू पुढच्या भागांतून ह्याचे रहस्य उकलतात त्याबद्दल….

कोटी कोटी वार हे सदगुरुराया, बापूराया तुझ्या चरणी आमचे लोटांगण !!!!
खरेच बापू ज्या रहस्यमय पध्द्तीने हा समग्र “वैश्विक इतिहास” समजावून देत आहेत त्याबद्द्ल कोटी कोटी अंबज्ञ !!!

श्रीराम. अंबज्ञ
सुनीतावीरा करंडे