KIng Zeus started doing arrangements

#115922

Sailee Paralkar
Keymaster

हरि ॐ

आजचा अग्रलेख खरोखरच सुन्न करणारा आहे. एकेक प्रसंग वाचताना मेंदू गोठून जात असल्यासारखे वाटत होते. खरंच चांगल्या माणसांची अशी भयानक परिस्थिती होईल, असे वाटले नव्हते. मात्र या सगळ्या प्रसंगांचा विचार केल्यानंतर ही सर्व मंडळी सुरक्षित ठिकाणी गेले असण्याची शक्यताही वाटते.

कारण अग्रलेख क्रमांक १०७३ मध्ये बापूंनी सगळ्यात शेवटी एक ओळ लिहिलेली आहे. ती म्हणजे, ‘सम्राट झियस जराही न डगमगता अतिशय शांतपणे परंतु अतिजलद वेगाने सर्व व्यवस्था करू लागला.’ यामध्ये बापूंनी खूप महत्त्वाची खूण दिली असल्याचे वाटते. सम्राट झियस(Zeus) ‘सर्व व्यवस्था’ करू लागला असे बापूंनी म्हटले आहे. इथे कुठेही तो युद्धाची तयारी करू लागला किंवा प्रतिहल्ला करण्यासाठी तयार झाल्याचे म्हटलेले नाही. यामुळे सम्राट झियस दुसर्‍याच कुठल्यातरी योजनेची ‘व्यवस्था’ करीत असल्याची खूप शक्यता वाटते. म्हणजेच झियस व सर्व मंडळींची पूर्वतयारी झाल्याचे दिसून येते.

तसेच झियस अतिशय शांतपणे पण अतिजलद वेगाने या गोष्टी करीत होता. यावरून या सर्व मंडळींना येणार्‍या प्रसंगांची स्पष्ट जाणीव होती हेदेखील समजते. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे महादुर्गेचे(Mahadurga) भक्त कायम सावध alert असतात, ही गोष्ट बापूंनी स्पष्टपणे दाखवून दिली. आजच्या अग्रलेख क्रमांक १०७४ मधील थाडाच्या वेषातील डेमेटर हादेखील धक्का होता.