King Sisyphus was arrested by Demeter because of Circe

Forums वैश्विक वास्तव (The Universal Truth) प्रारंभ King Sisyphus was arrested by Demeter because of Circe

#97474

रविवारच्या अग्रलेखात राजा सिसिफसला (King Sisyphus)सॅथाडॉरिनाच्या(Circe) कृत्यामुळे डेमेटरने(Demeter) अटक केली. आजच्या २०/१/१५ अग्रलेखात हिच सॅथाडोरिना त्या सिसिफसच्या दालनातून बाहेर पडून राजरोसपणे राजघरण्यातील उपवनात शिरली. एवढ्या सगळ्या उचापत्या करुनही तिच्या मनातील विचार मात्र तिला आत्मविश्वास देऊ शकत नव्हते. तिची ही गत पाहून एक गोष्ट माझ्या पक्की लक्षात आली की ती म्हणजे या दुष्ट, कारस्थानी दुराचार्‍यांना आत्मविश्वास कधीच प्राप्त होऊ शकत नाही. आत्म विश्वास म्हणजेच आत्म्यावरील…जो माझ्यात परमेश्वराचा अंश म्हणूनच आहे…त्याच्यावरील विश्वास…श्रद्धाहीन परमेश्वरालाच मानत नसतात.त्याच्यवरच विश्वास नसतो त्यामुळे त्यांच्याकडे आत्मविश्वास कधीच असू शकत नाही आणि म्हणूनच ते सर्व कायम सॅथाडोरिनासारख्या संभ्रमित अवस्थेत असतात. असे मला वाटते….मग या संभ्रमित अवस्थेतच स्वतःचे अस्तित्व टीकविण्यासाठी तसेच ते सिद्ध करण्यासाठी नानाविध कारवाया, उचापती, कट कारस्थाने करीत असतात….यास एकही श्रद्धाहीन मला अपवाद वाटत नाही.

तर या उलट ऍथेना (Athena)सारखे श्रद्धावान अत्यंत आत्मविश्वासी असतात व कोणत्यावेळी कोणते पाऊल उचलावे हे त्यांना पक्के ठाऊक असते…मृत्यूलाही सामोरे जाताना ते जराही कचरत नाही आणि शेवटच्या श्वासापर्यंत प्रयास सोडत नाही. हेच ऍथेनाकडून शिकावयास मिळते. महादुर्गेचे तिने केलेले स्मरण हा तिचा आत्मविश्वासच होता अस मला वाटते. कारण ती महादुर्गेचे स्मरण करुन पुढचे कार्य करते.
या दोघींच्या उदाहरणावरुन आपण श्रद्धावान किती आत्मविश्वासी असतो याची माहीती मिळते फक्त आपल्यात ती जाणिव जागृत होणे आवश्यक आहे. Yes I Can... ह्याची जाणिव केवळ परमेश्वरी प्रेरणेनेच होऊ शकते..

त्यामुळेच कदाचित सद्गुरु अनिरुद्धांचे ब्रीद वाक्यच आहे...”तू आणि मी मिळून शक्य नाही, अस या जगात काहीच नाही.” अतिशय Confidence देणारे आणि अर्थात Over Confidence टाळणारे ब्रीद वाक्य. इथे ओव्हर कॉन्फीडन्स “त्याच्या” अस्तित्वानेच टाळला जातो….आणि श्रद्धाहीनांकडे केवळ “मी” असतो त्यामुळे त्यांच्याकडे कायम Over Confidence असतो. जो त्यांचाच घात करतो. अशाच ओव्हर कॉन्फीडन्समुळे सॅथाडॉरिना मुर्ख ठरते…अगदी प्रत्येक वेळी… तिची झालेली फसगत तिच्या लक्षात आलेली आहे. त्यामुळे तिने सावधगिरि देखील बाळगण्यास सुरुवात करुन काहीतरी “खास” प्रयोगास सुरुवात केली आहे…And I m Sure यापुढेही ती फसणारच आहे…..कारण झिएसने तितानला सिसिफसच्या जागी नेमले आहे…त्यात फार मोठी गोम असल्याचे जाणवत आहे.

तसेच या अग्रलेखात विविध ठीकाणी सुरु असलेल्या घटना बापूंनी पुढे नेल्या आहेत. हे अग्रलेख वाचताना आपण सर्वश्रेष्ठ चित्तथरारक सत्य इतिहासाची कांदबरी वाचतोय अस वाटत आहे. या अग्रलेखातील सगळ्यात आवडता आणि अक्षरशः अंगावर रोमांच उभे करणारी घटना म्हणजे अफ्रोडाईट आणि हर्क्युलस यांच्यामधील संवाद. मागे वैभवसिंह हर्क्युलसचे प्रेम हे ऍफ्रोडाईड असल्याचा अंदाज वर्तविला होता….मात्र आजच्या अग्रलेखाने माझी तर खात्रीच पटली. रविवारच्या अग्रलेखात तिच्या शेल्याकडे पाहत स्मितहास्य करणार्‍या हर्क्युलिसच काय होत असेल….हे आजच्या अग्रलेखातून जाणविले.
अग्रलेखात दिलेला संवाद पुढील प्रमाणे –
————–

“मला जे माहीत आहे ते मलाच माहित आहे, तुला ते माहीत असावे की नसावे हा विचारसुद्धा माझ्यामनात येत नाही. परंतु मला एक माहित आहे की तुझ्या हातातील फुले ही अप्रवित्र व निष्प्रेम मानवांच्या फक्त कबरीवरच वाहिली जातात. आत्तापर्यंत अशा किती कबरी खणल्या आहेस?”
हर्क्युलिसच्या ह्या शब्दांवर ऍफ्रोडाईट मनमोकळेपणे हसली, “अनेक! पण एक कबर मात्र मी स्वप्नातही खणणार नाही,”
हर्क्युलिसने तोंडाने अस्पष्ट शीळ वाजवत डोळे बंद करुन घेतले, त्याच्य मनात विचार होता,” तुला बांधायची गरज नाही. मी स्वतःच थडग्यामध्ये चित रचून तिच्यावर उभाच आहे. मात्र त्या चितेला ज्योत तुलाच लावावी लागेल.”
डोळे मिटून घेतलेल्या हर्क्युलिसला कधीच कळणार नव्हते की त्याच्या चेहर्‍याकडे पाहणार्‍या ऍफ्रोडाईट्च्या डोळ्यांमध्ये काय होते?

—————-

अरे यात केवळ प्रेम, प्रेम आणि प्रेमच आहे….आणि एक गोष्ट मनोमन पटली ती म्हणजे “प्रेम म्हणजे, प्रेम म्हणजे प्रेम असत..हर्क्युलिस-ऍफ्रोडाईट असो की बापू-नंदाई असो…किंवा आपल्या सामान्य जनांचे असो…. ते सेमच असतं”

येस मी प्रेम पाहिले ते केवळ बापू आणि नंदाईमधील. माझ्या समोर माझा डॅड व माझी नंदाई हाच पती-पत्नी नात्याचा आदर्श आहे. त्यांच्यामधील प्रेम हे कधी कुणाला वर्णन करता येईल की नाही मला माहीत नाही. पण एक मात्र नक्की की त्यांच्यातील प्रेम अनुभवताना जी प्रेमस्पंदने मला जाणवायची; तीच प्रेमस्पंदने मला आजच्या अग्रलेखातील या संवादात जाणवली. अनेक प्रेम कविता किंवा प्रेमावरील कादंबर्‍या यांचा फडशा पाडला आहे. पण नजरेतील प्रेम आणि प्रेमाची नजर याची अनुभती केवळ बापूंच्या वरील शब्दातूनच आली. अफ्रोडाईट कशी दिसते माहीत नाही. हर्क्युलस कसा दिसत होता ते ही माहित नाही. पण तरीही दोन आकृती नजरे समोर बापूंनी उभ्या केल्या आणि त्या दोघांचे प्रेमळ संवाद केवळ वाचत नाही तर पाहतोय ही अनुभूती आली. खरच ही अशी शैली बापूंचीच असू शकते.

आणि हे मूळात असं कोण लिहू शकतो? याचा विचार करताना एकच उत्तर माझ्या मनात येते की असं पवित्र्, शुद्ध आणि संयमी प्रेम करण्याची ज्याची ताकद असते तोच हे लिहू शकतो आणि ही ताकद केवळ बापूंचीच आहे.
कारण ज्याचे मूळ स्वरुपच प्रेम आहे..
ज्याचा उर्जा स्त्रोत हा अत्यंत पवित्र अश्या मोठ्या आईकडून प्रवाहित होतो…
ज्याचा हेतू शुद्ध शब्दाला ही लाजवेल इतका शुद्ध आहे….
आणि जो त्याचे कार्य अत्यंत सयंमाने पुढे नेत आहे….
तो एकमेव अनिरुद्धच हे लिहू शकतो…
कारण त्याला कुणीही अडवू शकत नाही….
ही बाकी कुणाचीही ताकद नाही.

अर्थात हा माझा विचार आहे आणि मी माझ्या विचारावर ठाम आहे.

मला खरा पडलेला एक प्रश्न असा की येवढ्या युद्ध जन्य परिस्थितीत देखील या दोघांमधील अव्यक्त प्रेम सांगण्याची काय आवश्यकता? कृष्णाच्या चरित्रातही महाभारत घडत असताना रुक्मीणी आणि कृष्ण यांच्यासह अर्जूनाचीही प्रेमकथा येते. रामायणातही राम सीतेचे प्रेम आहेच. असं का?
कदाचीत हे प्रेमच इतिहास घडविते अस वाटतेय…
कदाचित हे प्रेमच आयुष्य बदलते….
कदाचित युद्धात हे प्रेमच निर्णयाक ठरते..

कदाचित आम्हा सामान्य जनांच्या अत्यंत जवळची हितकारक गोष्ट प्रेमच आहे….जी माझ्या आयुष्यात छोट्या मोठ्या युद्ध जन्य परिस्थितही मला शांती, तृप्ती, समाधान व अंतिम विजय मिळवून देऊ शकते अस मला वाटते….मग हे प्रेम कुठल्याही नात्यात असो….ते प्रेम सेमच असत…कारण प्रेम हे पाण्यासारखे आहे…ज्या आकाराच्या पात्रात (नातं) ठेवाल तस आकार ते घेते…म्हणूनच त्या परमेश्वराला प्रेमसागर म्हटले आहे…कारण त्याला कुणीही आकारबद्ध करु शकत नाही….तो अफाट, अथांग….आणि गहिरा आहे…..अगदी सागरासारखा….आणि या सागराचा एक थेंबच पुरेसा आहे….

तू प्यार का सागर है
तेरी इक बूँद के प्यासे हम
लौटा जो दिया तुमने, चले जायेंगे जहाँ से हम
तू प्यार का सागर है …

घायल मन का, पागल पंछी उड़ने को बेक़रार
पंख हैं कोमल, आँख है धुँधली, जाना है सागर पार
जाना है सागर पार
अब तू हि इसे समझा, राह भूले थे कहा से हम
तू प्यार का सागर है …

इधर झूमती गाये ज़िंदगी, उधर है मौत खड़ी
कोई क्या जाने कहाँ है सीमा, उलझन आन पड़ी
उलझन आन पड़ी
कानों में ज़रा कह दे, कि आये कौन दिशा से हम
तू प्यार का सागर है …

किति पर्फेक्टली सूट होतेय हे गाणं हर्क्युलस व अफ्रोडाईट आणि आपल्या सगळ्यांसाठी….

– रेश्मा नारखेडे.