King of Greece and Varanasi, Hercules

#75092

Amit Prasade
Participant

हरि ॐ
हर्क्युलिसचे(Hercules) व्यक्तिमत्व अजब आहे. तो ग्रीसचा(Greece) सम्राट आहे त्याचबरोबर वाराणसीचा राजा बलदेव(Baldev) म्हणूनही राज्य करीत आहे. तसेच सर्व महत्वाच्या ठिकाणी हजर असलेलाही दिसून येतो. अपोलोला(Apollo) सहाय्य करणारा, त्याचे रक्षण करणारा हर्क्युलिसच आहे. नेफिलचे रक्षणसुध्दा हाच करतो, त्याला मानसिक आधारही देतो. बिजॉयमलानाचे साम्राज्ञी पद धोक्यात आल्याची जाणीव होताच हर्क्युलिस प्रसंगावधान राखून आयरिसच्या मदतीने पुढील धोका टाळतो. अफ्रोडॉईटच्या मदतीला पण डेमेटर (Demeter)हर्क्युलिसलाच पाठवते. ते पण cosmic doorway जो चतुर्मितीत आहे, तिथेही हर्क्युलिस पोहोचू शकतो, हेच ह्यातून दिसते. या आणि अशा अनेक घटनांमधून हर्क्युलिस perfectionist असल्याचे दिसून येते. यामुळेच हर्क्युलिसच्या व्यक्तिमत्वाने भारावून जायला होते.