Kadru skilled in Black magic

#79539

Sailee Paralkar
Participant

दिनांक १ जानेवारी, २०१५ चा अग्रलेख हा जबरदस्त होता. सम्राज्ञी बिजॉयमलानाने(Bijoymalana) कद्रूला (Kadru)आंधळे केले ती संपूर्ण घटना आपल्याला बरेच काही दाखवून गेली. आता उघड उघड युद्धाला सुरुवात झाली असे वाटते. कद्रूकडे एवढ्या कुविद्या(Black magic) असतात, ती एवढी पारंगत असते, पण ती त्या हव्यासापोटी ओळखू पण शकली नाही की ते प्रेत नसून तो जिवंत देह आहे. परमपूज्य बापू नेहमी आपल्याला सांगतात की वाईट शक्ती कितीही ताकदवान असली, प्रबळ असली तरी तिचे महादुर्गेच्या भक्तांपुढे काहीच चालू शकत नाही, आपल्या मोठी आई पुढे हे सगळेच अतिशय क्षुद्र आहेत याचे हे अतिशय उत्तम उदाहरण आहे असे मला वाटते.
सगळ्यात शेवटी सम्राज्ञी बिजॉयमलाना क्रॉनसच्या उजव्या खांद्यावर हात ठेवते ते म्हणजे तिने ते शुभ कार्य पार पाडल्याचे त्याला सुचित करते असे वाटते, कारण श्रद्धावान नेहमी कोणतेही शुभ कार्य उजव्या हाताने पार पाडतात.