Human Pets Human dolls

#102511

Suneeta Karande
Participant

हरि ॐ दादा.
आजचा दिनांक २५ जानेवारीचा बापूंचा अग्रलेख श्रध्दावानांना पवित्र उपासना ,पवित्र मंत्र आणि पवित्र अग्नी ह्यांचे सामर्थ्य , ह्यांचा प्रभाव किती मोठे सुरक्षाकवच प्रदान करत असतो ह्याची जाणीव सातत्याने करून देत आहे.
बापूंनी ह्या आधीही प्रवचनात सांगितलेच होते की दुराचारी , श्रध्दाहीन, अनीतीमान लोक त्यांच्या मंत्रात कधीही ॐ वापरीत नाही, कारण पवित्र स्पंदने ते सहनच करू शकत नाही. ॐ सारखा भासणारा पण वेगळ्या प्रकारे उच्चारला जाणारा शब्द ते वापरतात. तसेच ते पवित्र अग्नीचा वापरही करीत नाही ह्याचाही स्प्ष्ट उल्लेख संत तुलसीदास विरचिते सुंदरकांडातील अग्रलेखांच्या मालिकेतून ह्या आधीच बापूंनी आपल्याला करवून दिला होता.
श्रीरामांचा विरह असह्य झाल्याने आणि भरीस भर म्हणून रावणाच्या शूलाप्रमाणे त्रासदायक वागण्याने अत्यंत व्यथित होऊन जेव्हा सीतामाई देहत्याग करण्याच्या विचाराने त्रिजटेला तू लाकडाची चिता रच व मी चितेवर बसल्यावर अग्नी (विस्तव) प्रज्वलित करून दे अशी विनवणी करते तेव्हा त्रिजटा सांगते हे सुकुमारी आता विस्तव मिळणार नाही. ह्याचा अर्थ समजावताना बापूंनीच सांगितले होते की विस्तव म्हणजे पवित्र अग्नी आणि हे राक्षस, जातुधान पवित्र अग्नी वापरत नाही.
आताही शुक्राचार्य मकरमानव बनलेल्या राजा मिनोस – अर्हितितानला (Titan)”व्रती” पंथाचे मंत्र आणि त्यांचा पवित्र अग्नी ह्यांच्यापासून एक वर्षभर दूर राहणे अत्यंत आवश्यक आहे व त्यानंतर ते मंत्र तुझ्या शरीरावर व मनावर कुठलेही उलटे परिणाम करू शकणार नाही अशी स्पष्ट बजावणी करताना दिसते. मकरमानव झाल्यामुळे त्याला ते पवित्र मंत्र आणि पवित्र मंत्रोच्चार सहनही झाले नसते असा स्पष्ट उल्लेख वाचायला मिळतो. ह्यावरून आपले पवित्र मंत्र, पवित्र मंत्रोच्चार , पवित्र अग्नी ह्यांचे अफाट सामर्थ्य जाणवते.
“मातृवात्सल्यविंदानम” ह्या ग्रंथात आपल्याला बापूंनी सांगितले होते की मातेसमान प्रतिपाळ केलेल्या अनसूयेच्या विरहाने कपील ऋषी जेव्हा व्यथित होतात तेव्हा माता अनसूया(Anasuya) आपल्या पुत्रासमान लाडक्या कपिलास वचन देते की अत्री ऋषींनी उत्पन्न केलेल्या य शास्त्रातील प्रत्येक यज्ञात तू आहुती अर्पण करीत असताना “स्वाहा” असा उच्चार करताना मी स्वत:च “स्वाहा” रुपाने प्रत्येक क्षणी तुझ्याबरोबरच असेन व अशाच पध्दतीने यज्ञ करणार्‍या प्रत्येक श्रध्दावानासमोर असेन. मला असे वाटते की पवित्र अग्नी म्हणजे हा यज्ञातील अग्नीच असावा बहुधा.
अग्रलेखात पुढेही बापू सांगतात की आशिया(Asia) व अ‍ॅटलास (Atlas)ह्यांना अतिशय कठीण कार्य करायचे असते ते म्हणजे स्वत: अ‍ॅफ्रोडाईटने स्थापन करवून घेतलेल्या महादुर्गेच्या एकमेव मंदिरामधील मूर्ती, प्रतिमा आणि स्वत: अ‍ॅफ्रोडाईटने (Aphrodite) स्थापन केलेला पवित्र अग्नी असणरे हवनकुंड सुरक्षितपणे तेथून घेऊन जायचे होते. श्रध्दावान असणारे आशिया व अ‍ॅटलास त्या पवित्र अग्नी असणार्‍या अग्नीकुंडाला लपवून नेण्यासाठी अनेक प्राण्यांची व पक्ष्यांची हाडे चिकटवतानाही किती कचरत होते ह्यावरून श्रध्दावानांना त्यांचे श्रध्दास्थान किती पूज्यनीय आणि आदरणीय असते हे ही जाणवते. “पावित्र्य हेच प्रमाण” हा नियम आम्हां श्रध्दावानांकडून आपल्या परीने अंशत: पाळला जरी जात असेल तर ही महादुर्गा आपल्या भक्तांचे कसे अंतिम क्षणातही संरक्षण करते हे वाचताना जागच्या जागी खिळून बसायला होते. सेमिरामीसने आशिया व अ‍ॅटलास ह्यांना जागचा जागी ठार मारण्यासाठी तिच्या हातातेल शस्त्र उचलले आणि आता कुठल्याही क्षणी घात होणार हे वाचताना अचानक ह्या थरार नाट्याला वेगळीच कलाटणी मिळाली. कारण आशियाने आता सर्व संपले हे जाणून मनापासून मेग्ना थेमिस म्हणजेच महादुर्गेची क्षमा मागितली तर अ‍ॅटलास अ‍ॅफ्रोडाईटने त्याला सांगितलेली दुर्गाकाव्य मोठया आवाजात म्हणू लागला होता आणि ’क्षमा’ हेच नाव धारण करणारी आमची आदिमाता – आमची मोठी आई – आमची आजी न धावली मदतीला तरच नवल – ती दुर्गती पासून वाचविणारी, भक्तांना तारणारी महादुर्गा स्वत:च जणू त्या काव्यातील शब्दांच्या रुपातून पुलिकासाठी धावली होती.
येथे आठवली बापूंनी ” मातृवात्सल्य उपनिषदात ” २७व्या अध्यायातील स्वत:च्या प्राणांची ही पर्वा न करता पिप्रूच्या आव्हानाला स्विकारून अव्रत देशात आदिमातेच्या भक्तीचा लोकशिक्षणाद्वारे प्रसार व प्रचार करणार्‍या कर्णश्रुताची कथा. आदिमातेने त्याला दिलेले आश्वासन येथे पुलिकेच्या कथेतही अनुभवायला मिळते. आदिमातेचे आश्वासन होते की पवित्र शब्दच मंत्र बनतात हे कधीही विसरू नका आणि पवित्र मंत्रच विचार उत्पन्न करतात व पवित्र ताकद पुरवितात. ह्यापुढे माझ्यावरील व माझ्या श्रीकुलावरील अशा गाण्यांना ’ भजन ’ असे म्हटले जाईल व मंत्र आणि स्तोत्रा एवढेच भजनरुपी प्रार्थनागीतही मला प्रिय असेल.
ह्या २७ व्या अध्यायातील कथा ही तर आपल्या भारतवर्षातील वसुंधरेवर घडली होती पण अखिल ब्रम्हांडाची एकमेव स्वामिनी असणार्‍या माझ्या आदिमातेचा शब्द हा निंबुरा सारख्या दूरवरच्या उपग्रहावरही श्रध्दावानांसाठी तेवढाच संरक्षक बनून कार्य करतो. “महादुर्गा विजयते” ह्या त्यांच्या मंत्राचीही तीच ताकद आहे जी आपल्या आदिमातेच्या मंत्राची….
एवढी वर्षे सेमिरामीसची मानसिक गुलाम असणारी पुलिका तिच्या कन्येच्या आणि नातवाच्या मुखातून बाहेर आलेले थियाचे शब्द व अ‍ॅफ्रोडाईटचे काव्य कानावर पडताच पूर्ण जागृतीत आली होती…काय जबरदस्त सामर्थ्य , ताकद आहे आमच्या आदिमातेची चण्डिकेची अर्थात मेग्ना थेमिस म्हणजेच महादुर्गेची नाही…. आदिमातेला स्वत:ला काही करावे पण लागत नाही , ही तर फक्त तिच्या नामाची ताकद आहे.
सदगुरुतत्त्व भक्तांवर संकट येण्या आधीच संकटाच्या निवारणाची सोय करते हे बापूंनीच लिहिलेल्या राम-रसायन मधील उवाच येथे प्रकर्षाने बापूंनीच आठवून दिले. कारण माता थियाकडून हे सारे त्यांच्या विद्या शिकत होते आणि ती त्यांना गुरुस्थानीच होती असे वाटते.
सेमिरामीसला(Semiramis) कुणीही तुल्यबळ नाही हे विधान त्या परिस्थितीत वास्तव असले तरी देखिल सत्य मात्र हेच आहे की आदिमातेला व तिच्या पुत्राला त्रिविक्रमाला तुल्यबळ कधीच व कोणीच असूच शकत नाही.
ड्रेको(Draco) समाजाची हीन मनोवृती पाहताना अंगावर शहारे येतात की सुसंकृत ’व्रती’ समाजाला पूर्ण नष्ट करायचे नव्हते तर कंगाल करून, क्षुद्र करून प्राण्यांप्रमाणे वापरायचे होते ….ही गोष्ट बापूंनी आपल्याला सांगितलेल्या आणि सद्य परिस्थितीत बोकाळलेल्या ” Human Pets” “Human dolls ” ह्याच विक्षीप्त गोष्टींची आठवण करून देते आणि मग वाटते ” History repeats” हे किती भयावह घृणास्पद आहे सारे ना, पण आमची आदिमाता चण्डिका आणि तिचा पुत्र परमात्मा आमचा बापू आमच्या साठी तत्पर उभे असताना आम्हाला कसली भीती .परंतु हे मात्र तेवढेच सत्य आहे की बापू शिकवीत असलेला हा “वैश्विक इतिहास” मला नीट जाणून घेतलाच पाहिजे , अभ्यासलाच पाहिजे आणि काळाच्या बरोबरीने राहण्यासाठी आमचा सदगुरु बापू , आमचा त्रिविक्रम आमची माय चण्डिका दाखवीत असलेल्या देवयान पंथावर त्यांचेच बोट धरून चालायलाच हवे तरच आमचा टिकाव लागू शकतो.
’वितोशा सोफिया’ हा प्रथमदर्शनी जागृत वाटणारा ज्वालामुखी हा कृत्रिम ज्वालामुखी इतर लोकांना भय निर्माण करण्यासाठी केला असावा हे वाचून तर संभ्रमातच पडायला होते की किती हा नीचपणा . दुरुपयोग विज्ञानाचा कोणत्या थराला जाऊन हे लोक करीत होते…तेही निसर्गाला झुकवून….
तेच दुसरीकडे लेटो(Leto)स्त्रीला पुरुषाचा आवाज मिळावा आणि पुरुषाला स्त्रीचा ह्या करिता केवळ एक गोळी वापरते हे वाचूनही तितकेच थक्क व्हायला होते.
अत्यंत पराक्रमी, शूर, असामान्य धाडसी अशा लेटोच्या ही मनात भय निर्माण झाले हे वाचून तर आता असे काय दृश्य तिने आणि राफेलने नेफिलीम शिरलेल्या विवरात पाहिले असावे ह्याबद्दल उत्कंठा अजूनच शिगेला पोहचली आहे.
खरेच बापूराया तू जर आम्हाला तुझ्या कृपेच्या छायेत घेतले म्ह्णूनच आज अगदी नि:शंक मनाने आम्ही जगू शकतो आमचा सम्स्त भार तुझ्या चरणी वाहून , हे सदगुरुराया तुझ्या चरणींचा दास , तुझ्या दारीचा श्वान बनणे हीच आमच्या नरजन्माची इतिकर्तव्यता आजन्म राहो… हीच आदिमातेच्या आणि तुझ्या चरणीची अंबज्ञताच एकमेव आम्हाला तारू शकते.
श्रीराम. अंबज्ञ
सुनीतावीरा करंडे