Herculian Task

#442562

Sailee Paralkar
Keymaster

॥ हरि ॐ ॥

शंतनुसिंहने upload केलेली image हर्क्युलिसवरील भीषण प्रसंग डोळ्यांसमोर उभा करते. खरोखर Herculian Task म्हणजे काय हे कळून आले. दिनांक ४ ऑक्टोबर रोजी प्रत्यक्षमध्ये डॉ. अनिरुद्ध जोशी यांनी लिहिलेल्या तुलसीपत्र क्रमांक ११५७ मध्ये वाईट लोकांचे एकमेकांशी असणारे नाते आणि त्याचवेळेस श्रद्धावानांची त्यांच्या चण्डिकाकुलाशी असलेली निष्ठा ठळकपणे दिसून येते. बापूंनी कालच्या अग्रलेखामध्ये सेमिरामिस (Semiramis), केरीडवेन (Kerridwen) व मेड्युसामधील (Medusa) घनघोर युद्ध दाखवून दिले. वाईट शक्तींमधील हे युद्ध केवळ स्वत:च्या स्वार्थासाठी असते. त्यांचे एकमेकांशी असलेले वैर, मित्रत्व इतकेच नाही तर प्रेम भावनाही केवळ स्वार्थ साधून घेण्यासाठीच असते. स्वत:चे वर्चस्व सिद्ध करण्यासाठी सेमिरामिस आणि केरीडवेनने सर्वशक्तीनिशी प्रयत्न केले. मेड्युसाने केरीडवेनला केलेली मदत ही देखील केवळ स्वत:च्या फायद्यासाठीच आहे. ज्या टेरीला (हर्मिस) बरोबर घेऊन मेड्युसा आली होती, तिला तिथेच सोडून ती पळून गेली. मेड्युसा किंवा सेमिरामिसला टेरीची आठवणसुद्धा झाली नाही.

टायफॉनला घेण्यासाठी आलेल्या सेमिरामिस, मेड्युसाला टायफॉन मिळणे सोडाच पण स्वत:चा जीव वाचविण्यासाठी पळावे लागले. सेमिरामिस, मेड्युसा, केरीडवेन व बफोमेट (Baphomet) यांच्या आपसातील वैरामुळे कोणाचाच फायदा झाला नाही. तर त्याच प्रसंगात हर्मिस (Hermis) आणि हर्क्युलिसने (Herculis) एकमेकांना सहाय्य करून स्वत:ची सुटका तर करून घेतलीच पण त्याचबरोबर टायफॉनला घेऊन जाण्यातही हर्क्युलिसला यश मिळाले. अर्थात यामागे हर्क्युलिसचे अफाट सामर्थ्यही आहेच. पण यावेळेस श्रद्धावानांची चण्डिकाकुलाशी असलेली निष्ठा दिसून येते. यामुळेच श्रद्धावानांना कायम यश मिळत राहते. माय चण्डिका तिच्या पुत्रावर प्रेम करणार्‍या बाळांना कोणत्याही भोवर्‍यातून सहीसलामत सोडवू शकते, हे पुन्हा एकदा जाणवले.