Hercules, one persona, many aspects

#91003

Sailee Paralkar
Keymaster

हरि ॐ

मिहिरसिंह आणि प्रणालीवीरा तुम्हां दोघांशीही मी पूर्ण सहमत आहे. हर्क्युलिसच्या(Hercules) व्यक्तिमत्वाचे विविध पैलू आपल्यासमोर येत आहेत. सम्राज्ञी अल्केमिनी व लेटोच्या प्रसंगामध्येही, अल्केमिनी हर्क्युलिसने बांधून घेतलेल्या उत्कृष्ट गुप्त मार्गाचे वर्णन करते आणि त्याचबरोबर त्याचा बांधकाम क्षेत्रातील प्रचंड अभ्यास व अनुभव या गोष्टी आपल्यासमोर येतात. एकूणच हर्क्युलिसचे हे सगळे गुण पाहता तो नक्कीच सामान्य माणूस असूच शकत नाही असे वाटते. प्रत्येक वेळेस तो वेळेवर उपस्थित राहून अनेकांना वाचवतो, सावध करताना दिसतो. यावरुन असेही वाटते की अ‍ॅफ्रोडॉईट प्रमाणेच त्यालादेखील क्षणात कुठेही जाण्याचे सामार्थ्य प्राप्त असावे. १३ जानेवारीच्या अग्रलेखात देखील झियसला Magnetogasillo बाबत हर्क्युलिसने आधीच सांगितल्याचे कळते. यावरून हर्क्युलिसला प्रत्येक गोष्टीबद्दलचे ज्ञान आहे आणि वेळ येण्याच्या आधीच तो झियस व अन्य महत्वाच्या व्यक्तिंना सूचित करीत असल्याचे दिसून येते. कद्रूच्या बाबतीतही हर्क्युलिसच पहिल्यांदा झियस आणि डेमेटरला सांगताना दिसतो.

तर डेमेटरच्या(Demeter) गुप्त कक्षात प्रकाशझोत येतो तेव्हा गुलाबपुष्पांचा सुगंध येतो आणि तिथे अ‍ॅफ्रोडॉईट(Aphrodite) प्रगट होते, त्यावरून हर्क्युलिस जिच्यावर मनापासून प्रेम करतो ती अ‍ॅफ्रोडॉईटच असावी अशी खात्री वाटत चालली आहे.