Hercules knows the language Habesha

#203528

Sangita Vartak
Participant

हरि ॐ

रविवार दिनांक ५ एप्रिल २०१५ रोजीच्या १०९८च्या अग्रलेखात हर्क्युलिसचा (Hercules) आणखी एक गुण – हबेशा भाषा (language Habesha) अवगत असणे. या भाषेचा उपयोग करून घेऊन तेथील हबेशा लोकांशी जवळीक साधतो. त्यांना ‘निमरॉड तळ्याची’ माहीती घेऊन त्यांच्या बरोबर जाऊन खास यानाने निमरॉड तळ्यावरील जागेत जाऊन तळ्यातील एका भागात खडकांनी तयार केलेला नकाशा, डोळ्याची खोबणी असलेली कवटीसारखी रचना या सर्वांचे ताबडतोब फोटो व त्याला कळालेली माहीतीही माता सोटेरिया आणि झियसला (Zeus) पाठविली. एवढेच नव्हे तर स्वत: तेथील पवित्र चषक काढून घेऊन त्या जागेवर चपलख बसेल असा दुसरा पाषाण लावून ठेवला त्या पाषाणावर तसेच परंतु पुर्णपणे वेगळे असे चित्र रंगविले….

मंगळवार दि ७ एप्रिल २०१५ चा १०९९व्या तुलसीपत्रातील अग्रलेखात आणखी एक चित्तथरारक प्रसंग अनुभवला तो म्हणजे हर्क्युलिसची पिशाच्च सम्राज्ञी ‘स्थेवो अनुबीस’ (Sthevo Anubis)शी तुंबळ युद्ध.

हर्क्युलिसला स्थेवो अनुबीसशी लढताना खूप दुखापती झाल्या. दोन्ही हातातून रक्त वाहत होते. अवघे ५ दळे राहिले असताना त्याला अ‍ॅफ्रोडाईटचे (Aphrodite) शब्द आठविले – ‘तुझे मस्तक पर्वतालाही फोडू शकते.’ आणि लगेच त्याने कुठलाही विचार न करता स्वत:च्या मस्तकाने स्थेवो अनुबीसच्या सुळ्यांवर जोरदार आघात केला. एकामागोमाग एक अशी दोन्ही सुळे मोडताच ती पिशाच्च सम्राज्ञी निर्जीव होऊन खाली कोसळते… स्वत:च्या मस्तकाने जोरात वार करताना हर्क्युलिसने स्वत:चा जराही विचार केला नाही… आपल्या मस्तकालाही इजा होईल याची जराही भिती वाटली नाही. त्यावेळी फक्त त्या पिशाच्च सम्राज्ञीस मारायचे एवढेच ध्येय्य त्याच्या समोर होते मग त्यासाठी स्वत:ला इजा झाली तरी त्याला त्याचे काही पडले नव्हते… काय भक्ती आहे आणि काय समर्पण आहे!!!….

गुरुवार दि ९ एप्रिल २०१५ चा ११००व्या तुलसीपत्रातील अग्रलेखात – हर्क्युलिस बेशुद्ध होतोय हे पाहिल्यावर लगेचच नेहमीप्रमाणे अ‍ॅफ्रोडाईट (Aphrodite) आली आणि त्याला तिकडून बाहेर काढले. इतकेच नाही तर तिने महादुर्गेचे स्मरण करून त्याच्या सर्व जखमा भरून आणल्या… काय तो हर्क्युलिस आणि काय ती अ‍ॅफ्रोडाईट

अंबज्ञ… हरि ॐ