Hercules is favourite of Mahadurga and Trivikram

#177150

Sangita Vartak
Participant

Hercules is favourite of Mahadurga and Trivikram

हरि ॐ,

परम पूज्य अनिरुद्ध बापूंनी आपल्यासाठी दिलेल्या तुलसीपत्र – १०९४ अग्रलेख वाचल्यावर मन सुन्न झाले. यात वेगाने घडणार्‍या घटना अनुभवल्या. मौशमीवीरा तूम्ही छान लिहीले आहे तुमच्या commentशी मी सहमत आहे.

पवित्र गोष्टींसाठी स्वत:ला पूर्णपणे झोकून देणारा असा हा हर्क्युलिस (Hercules) जो महादुर्गेचा(Mahadurga) आणि तिचा पुत्र त्रिविक्रम (Trivikram) यांचा लाडका व्रती होय. आपण सुरुवातीपासूनच पाहत आलो आणि २६ मार्च २०१५ च्या अग्रलेखात आणखी एक प्रसंग अनुभवला…

सम्राट युरेनसनी हर्क्युलिसशी बोलताना सांगितले की ‘Solomon ची तुम्हाला एक चावी मिळाली आहे अशा अजून दोन चाव्या मिळाविण्याची गरज आहे’ आणि ह्या मार्गाने जाताना अतिशय सावध रहा’ तेव्हाच वाटले की हर्क्युलिस आणखी काहीतरी मोठे दिव्य करणार आहे.

खरचं तो भयानक प्रसंग अनुभवल्यानंतर तर हे आवर्जून जाणवले की महामाता सोटेरियाने (Matriarch Soteria) ‘हे धाडस केवळ हर्क्युलिसच करू शकतो’ असे उद्‌गार का काढले होते. मानवी पातळीवर हर्क्युलिसने पूर्ण तयारी करूनच गेलाच एवढेच नाही तर त्या विषारी अजगराशी लढतानादेखील त्याचे मनोधैर्य कुठे कमी झाले नाही किंवा कुठेच त्याला अपयशी झाल्याची जाणिवही शिवली नाही. मुख्य म्हणजे इतक्या बिकट प्रसंगीही कुठेही नामस्मरण कमी झाले नव्हते की भक्ती आणि विश्वास कमी झाला नाही.

प्रत्येक कठिण प्रसंगी हर्क्युलिसचे गुण पाहून योगिंद्रसिंह तुम्ही या शिर्षक दिले आहे ‘हर्क्युलिस: भक्ती – शक्ती – युक्तीचा त्रिवेणी संगम’ हे किती समर्पक आहे याची प्रकर्षाने जाणिव होत रहाते. त्या शिर्षकाप्रमाणेच आहे हा हर्क्युलिस (Hercules) प्रत्येक वेळी आणि प्रत्येक कामगिरीसाठी अक्षरश: झोकून देऊन यशासाठी झटणारा असा योद्धाच आहे.

आणि उचित वेळी येउन त्या चण्डिकापुत्र त्रिविक्रमाने (Trivikram) त्याला या संकटातून सहीसलामत बाहेर काढले. चण्डिकाकुलाची (Chandika Kul) सच्ची भक्ती करणारे असेच कीतीही प्रसंग आले तरी न डगमगता पवित्रमार्गांसाठी झटत राहतात. आणि ती कनवाळू मोठी आई चंण्डिका आणि तिचा पुत्र नेहमी त्यांची रक्षा करतच असतात. ह्याची प्रचिती आपण सर्व श्रद्धावानसुद्धा (Shraddhavan) नित्य घेतच असतो…

जय जगदंब जय दुर्गे।…

अंबज्ञ…