Hercules is favourite of Mahadurga and Trivikram

Forums वैश्विक वास्तव (The Universal Truth) प्रारंभ Hercules is favourite of Mahadurga and Trivikram

#173189

Sangita Vartak
Participant

Hercules is favourite of Mahadurga and Trivikram

हरि ॐ,

कालचा अग्रलेख वाचून शॉकच बसला. या आधीचा म्हणजे १०९३च्या अग्रलेखात युरेनसचा (Uranus) उल्लेख होता. ते वाचल्यानंतर राहून राहून जाणवत होते की हे काय असेल? युरेनस तर व्रती होते व ते शत्रूंना सामिल होणार्‍यातले तर नक्कीच नाही. पण मनात आले त्यांनी वेषांतर नव्हते केले ते स्वत:च्या ओरिजनल वेषातच होते हे सर्व कसे आणि काय आहे? पुढच्या अग्रलेखात कळेल असे वाटत होते तरी हा प्रश्न मनाला भेडसावित होता…. आणि पुढच्या अग्रलेखाची वाट पाहत होते….

कालच्या अग्रलेखात वरच्या प्रश्नाचे नुसते उत्तरच मिळाले तर या सम्राट युरेनसची कल्पनेच्या पलिकडील अशी ओळख झाली… हर्क्युलिसने (Hercules) दुरूनच पित्याच्या चरणांकडे पाहून प्रणाम केला तेव्हा खात्रीच झाली की आपल्याला पुढे काही वेगळॆच परंतु व्रतींच्या बाजूने असलेले वाचायला मिळणार आहे आणि अधाश्यासारखे वाचायला लागले….

लोपामुद्राचे पट्ट्शिष्य असणारे सम्राट युरेनस ही व्यक्ति म्हणून काय आहे हे समजले… Hats off to Smrat Uranus, Hats off Trivikram & Hats off to Mahadurga!!! काय जबरजस्त planing! आणि तेही किती आधीपासूनच…

सिध्दांत पण काय – ‘व्याधीची उपाययोजना करायची, तर ती व्याधी आणणार्‍या रोगजंतूचा अभ्यास करणे अत्यावश्यकच असते. कारण अशा अभ्यासानंतरच त्या रोगजंतूना मारणारी औषधे तयार करता येतात.’ ब्रम्हर्षि अगस्त आणि ब्रम्हर्षि वषिष्ठांनाही मानले बाबा… आणि यांच्याच सुचनेप्रमाणे सम्राट युरेनसनी तामाचार पंथाचा अभ्यास करून त्यात प्रविण झाले, ६६ कुविद्यांचासुद्धा अभ्यास केला. त्यांनी हरेन्नाखम्‌ आणि सॉलोमन झेलहुआचा बुद्धीभेद करून त्यांना दोन खास विद्याही शिकविल्या. इतकेच नाही तर सॉलोमन झेलहुआला आपल्या गटात सामिल व्हायला लावले आणि सम्राट युरेनसच्या सुचनेप्रमाणे आता तो वागत होता….

आणि हे सर्व कशासाठी तर – ‘जाहबुलॉनचा (Devil – Jahbulon) मानवी जन्म होऊ नये’ वाह रे व्रती आणि वाह रे सम्राट युरेनस.

शेवटी ही सर्व योजना त्रिविक्रमानेच (Trivikram) आखली होती… ती तशीच अफलातूनच असणारच…

सर्वात महत्वाचे म्हणजे सम्राट युरेनसचे वाक्य – “मी युरेनस आता ‘चण्डिकादास सुमेधस’ आहे व मला दिलेले एकमेव कार्य ‘जाहबुलॉनचा मानवी जन्म होऊ नये’ हेच आहे” किती दृढता या भक्तित कि त्या सर्व वाईट गोष्टी – तामाचार पंथाचा अभ्यास, ६६ कुविद्या आदि सर्व गोष्टी शिकूनही सम्राट युरेनसला कधीच अस्वस्थता किंवा या सर्व कुविद्यांचा वाईट वापर करण्याची बुद्धी झाली नाही कारण चंण्डिकाकुलाने आपल्या या लाडक्या भक्ताची काळजी घेण्यासाठी एक उपायही केला होता तो म्हणजे – महादुर्गेने त्यांच्याजवळील कुविद्यांच्या ज्ञानास माता शिवगंगागौरीचे बंधन आणि कवच घालून घेतले….

जय जगदंब जय दुर्गे।… अंबज्ञ…