Hercules is always focused

#76117

Vaibhavsinh Karnik
Participant

हरिॐ. हर्क्युलिसचे(Hercules) रसायन काही वेगळेच आहे. हा अत्यंत शांत डोक्याने काम करणारा व आपल्या CAUSE शी एकनिष्ट व कायम FOCUSED असणारा योद्धा आहे. हयाचे आपल्या भावंडांवर प्रचण्ड प्रेम आहे. खरतर सम्राट झीयस(Zeus) त्याचा सावत्र भाऊ आहे तरी देखील त्याचे झीयसवर सख्या भावापेक्षाही अधिक प्रेम आहे. ह्याचे आपल्या ज्येष्ट भगिनी डेमेटर वर पण प्रचण्ड प्रेम आहे. तो तीच्याशी आपल्या आयुष्यातील काही रहस्य देखील share करतो. ह्या वरुन एकाबाजूला कर्तव्यकठोर असणारा हर्क्युलिस दुसयबाजूने अत्यंत प्रेमळ व हळवा देखील आहे. त्याचे आपल्या प्रेयसीवर देखील खूप प्रेम असल्याचे जाणवते. तीला केसांमध्ये गुलाबाची फुले माळायला आवडतात म्हणून त्याने आपल्या ग्रुहात जागोजागी गुलाबाची रोपे लावली आहेत. ह्या वरून हर्क्युलिस ROMANTIC देखील आहे हे समजते.
दिनांक २८ डिसेंबर २०१४ रोजीच्या अग्रलेखात हर्क्युलिसची अजून दोन qualities आपल्या समोर येतात आणि त्या म्हणजे
१. त्याने लेटोच्या घोड्याला दिलेली दोंगर दया चढण्या उतरण्याची TRAINING
२. लेटोच्या महत्वाच्या मोहिमेसाठी लागणारे नकाशे काढून देणे.

डॉ योगींद्रसिंह, साइलीवीरा व अमितसिंह ह्यांनी मांडलेल्या हर्क्युलिसचे गुण एकत्र विचार केल्यास हर्क्युलिसचे व्यक्तिमत्व खरच असामान्य, अद्वितीय, अदभूत विलक्षणच आहेत आणी म्हणूनच हर्क्युलिसचे व्यक्तिमत्व एका खया श्रद्धावानासाठी आदर्श आहे.