Reply To: हेमाडपंतांची व यवनाची भेट (Hemadpant’s tryst with Mohammedan gentleman)

Forums Sai – The Guiding Spirit हेमाडपंतांची व यवनाची भेट (Hemadpant’s tryst with Mohammedan gentleman) Reply To: हेमाडपंतांची व यवनाची भेट (Hemadpant’s tryst with Mohammedan gentleman)

#3293

Suneeta Karande
Participant

Hemadpant’s tryst with Mohammedan gentleman

हरि ओम. श्रद्धावान हाचि माझा मित्र सखा तयासी मी रक्षीन देवयान पंथी || २ || ह्या बापूंच्या वचनाची आठवण होते , ही हेमाडपंत व यवनाची गोष्ट वाचतांना. हेमाड्पंतानी तर साईनाथांना प्रत्यक्ष पाहिलेले नाही , सदगुरु मानणे तर खूपच दूर होते. गुरुची आवश्यकता काय हा मनी विकल्प होता, तरी साईनाथ माउली धाव घेते अकारण कारुण्यापोटी कारण हेमाड्पंत हे श्रद्धावान होते. आपल्या चुकतमाकत धड्पडत का होईना देवयान पंथावर चालण्याचा प्रयत्न करणार्‍या ह्या बाळासाठी गुरु माय होऊन धाव घेते, त्याचे देवयान पंथावर रक्षण करण्यासाठी. येथे हा यवन येतो तो एक म्हातारा वणजारी , वाटाद्या बनुनच , उचित वाट दावण्यासाठीच जणू. न जाणो गाडी चुकली असती तर हेमाडपंताच्या मनात आणखी विकल्प दाट्ला असता, त्यांचे मन अजून शंका -कुशंकानी ग्रासले गेले असते. हेमाडपंत जातात ते नानांच्या, स्व:तच्या मित्राच्या शब्दांवर विश्वास ठेवून , म्हणूनच बाबा नानांचा शब्द राखण्यासाठी स्व:त धाव घेतात,हेमाडपंतांची शिर्डीला जाणारी गाडी सुटू शकते हे जाणून. माझ्या साईंचे सर्वव्यापकत्व, आपल्या भक्तावरचे लाभेवीण प्रेम येथे दिसते की माझ्या नानांचा शब्द खाली पडता कामा नये. नानांनी स्वत: आटापिटा करुन हेमाडपंताना शिरडीला येण्याचे कबूल करवून घेतले आहे तर सद्‍गुरुभक्ति मार्गावर येऊ इच्छिणार्‍या हेमाडपंतासाठी साईनाथ स्वत: यवनही बनतात. माझा साई फक्त स्वत: दिलेला शब्द्च पाळतो असे नाही तर आपल्या भक्ताने दिलेला शब्द ही तोच पूर्ण करवून घेतो आणि आपले शरणागत वत्सल हे ब्रीद पाळतो, श्रद्धावान त्याला संपूर्ण शरण जाण्याआधीच.
हेमाडपंत लिहितात “ तंव “तो” सुचवी वेळेवर |उतरू नका हो दादरावर | मेल न तेथे थांबवणार | बोरी बंदर गांठावे ||१२८ || होती न वेळेवर ही सूचना | मेल दादर वर मिळते ना | नकळे मग या चंचल मना | काय कल्पना उठत्या ते ||१२९||…… चंचल मनाला आवर घालणारा हाच तो माझा कनवाळू सखा, जो कधीही मला दगा तर देतच नाही , पण चुकीच्या वाटेवर भरकटूही देत नाही.
माझ्या ह्या अनिरुद्ध-साईने असेच राणा ह्या कलकत्याच्या भक्ताला आत्मघाताच्या अविचारापासून परावृत्त केले होते, जेव्हा त्याने बापूंचे दर्शन ही घेतले नव्हते , फक्त बापू भक्ताच्या सांगण्यावरून त्याने आन्हिक करायला, रामरक्षा म्हणायला व श्रीसाईसच्चरिताचे वाचन चालू केले होते. म्हणजेच त्याचा शब्द तर तो पाळतोच पाळतो कोणत्याही युगात, पण त्याच्या भक्ताचाही शब्द तोच पाळतो. खरेच श्रध्दावान होऊ इच्छीणार्‍यांसाठी ही कथा अत्यंत प्रभावीपणे मार्गदर्शक ठरु शकते की खरा सदगुरु कसा असतो, कोण असतो हे जाणण्यासाठी….
अंबज्ञ….