Reply To: साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२(Sai the guding spirit-Hemadpant’s Bhakti and seva)

Forums Sai – The Guiding Spirit साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२ Reply To: साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२(Sai the guding spirit-Hemadpant’s Bhakti and seva)

#7476

Hemadpant’s Bhakti and seva

या फोरममध्ये हेमाडपंतांवर खुपच छान चर्चा सुरू आहे. इतर फुटकळ विषयांवर चर्चा करीत बसण्यापेक्षा हेमाडपंतांची भक्ती, सेवा, शारण्य कसे आहे याचा अभ्यास करणे जास्त श्रेयस्कर वाटते. इथे प्रत्येकाने हेमाडपंतांविषयी खुप छान लिहले आहे. आणि अर्थातच समिरदादांनी ही संधी दिल्याबद्दल खुप खुप अंबज्ञ….
मला ही थोडेसे बोलावेसे वाटते.

बापूंनी आपल्याला जागृकतेचे महत्त्व सांगितलेले आहे. हेमाडपंत हे जागृक होते. त्यांची भक्ती डोळस होती. म्हणून गहू दळण्याच्या प्रसंगाचे अनोखेपण त्यांना कळू शकले. तसेच हेमाडपंताचे निरिक्षण आणि ऍनालॅसिस उत्कृष्ट होते. हे आपल्याला प्रत्येक कथेतून कळत जातेच. हेमाडपंत हे श्रेष्ठ भक्त आहेतच…त्यांनी भक्ती कशी करावी हे देखील शिकविले आहे. परंतु एक श्रेष्ठ भक्त बनण्यासाठीचे मुलभूत गुणधर्म त्यांच्या व्यक्तिमत्वातून प्रतित होतात.
१. जागृकता : भक्ती करताना जागृक असलेच पाहीजे.
२. डोळसपणा : भक्ती डोळस असावी.
३. निरक्षण : सदगुरुचे निरिक्षण करता आले पाहीजे
४. आकलन : या निरिक्षणातून सदगुरुच्या अकारण कारुण्याचे, सदगुरु लिलेचे आकलन करुन घेतले पाहिजे.
५. अनु्भव : उचित निरिक्षण आणि आकलन केले की आपोआपच आपण सदगुरुंच्या अनुभवासाठी पात्र ठरतो.
६. विश्वास : ह्या सार्‍या गुणांचा वापर करण्यासाठी मुळ सदगुरु तत्त्वावर विश्वास असणे आवश्यक आहे.

आणि हेमाडपंतांचा सदगुरुतत्त्वावर विश्वास होता. ठाम विश्वास होता. कारण ते चाळीस वर्षे गुरुचरित्राचे पारायण नित्यनियमाने करित असत आणि हे सदगुरुतत्व मूर्तिमंत साई स्वरुपात त्यांच्या समोर उभे ठाकले ते्व्हा त्यांनी धूळभेट घेतली.
गुरुची उपयुक्तता काय? हा वाद जरी हेमाडपंत घालत असले तरी त्यामागचा हेतू, त्यामागचा विचार हा अत्यंत वेगळा असला पाहिजे. कारण ते अत्यंत विचारी होते.

गुरुचरित्र वाचणार्‍या हेमाडपंत सारख्या व्यक्तीला गुरुचे महत्त्व माहित नसावे हे विसंगत आहे. त्यामुळे गुरुची उपयुक्तता काय? ह्या वादामध्ये हेमाडपंत कुठेही मला अहंकारी वाटत नाही. उलट त्यांच्या मन बुद्धीतील विचारांचा प्रचंड मोठा गुंता आणि तो गुंता सोडवण्यासाठी चाललेली हेमाडपंतांची धडपड इतकेच मला दिसू येते. आणि हा गुंतला सुटला अगदी क्षणार्धात…..जेव्हा बाबा म्हणाले, “काय म्हणाले हे हेमाडपंत”?

हा गुंता सुटला म्हणून आपल्याला साई सच्चरित्र लाभले. या प्रसंगाबद्द्ल पुन्हा एकदा पोस्ट टाकीनच.

– रेश्मावीरा नारखेडे