Reply To: साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२ (Hemadpant-sai the guiding spirit

Forums Sai – The Guiding Spirit साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२ Reply To: साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२ (Hemadpant-sai the guiding spirit

#8522

Pranilsinh
Member

हरि ॐ दादा…
खरचं, बापूंचा अकारण कारूण्य म्हणजे नक्की काय, तर हा साईसच्चिरितासारखा(Saisatcharitra) discussion platform आम्हाला उपलब्ध करून दिलात…

सपटणेकरांच्या (Sapatnekar) आणि रतनजींच्या (Ratanji) कथेमध्ये साम्यता आहेच. दोन वेगवेगळ्या साईभक्ताच्या ( Sai devotee) कथांचं पण असं relation जुळू शकतं,हे समजता आलं…

दासगणूंवर मोठी भक्ति।
जीवींचे हार्द तया निवेदती।
ते म्हणती जा शिरडीप्रती ।
मनेप्सित पावसी ।।८०।।

ह्या ओवीमध्ये २ गोष्टी आपण पाहू शकतो.
१. दासगणुंच्या गुणसंकिर्तनाची ताकद..(Das ganu)
२. दासगणुंनी सुचवलेल्या मार्गाचा अवलंब(साईदर्शन)
दासगणुंच्या गुणसंकिर्तनात एवढी ताकद आणि सच्चेपणा होता की खरा श्रद्धावान ते आचरणात आणणारचं. आणि मग रतनजी शिरडीला (Shirdi) जाऊन नवस बोलून आले.

साईंचे शब्द म्हणजे संपूर्ण आश्वासन.. ज्यामुळे भक्ताचा उद्धार निश्चितच…
“मनाची मुराद पुरवील अल्ला “…

आज आपण दादांकडे आपल्या आजारपणाच्या किंवा वयक्तिक गोष्टी घेऊन जातो, पण दादा आपल्याला यॊग्य सल्ला देतात. “काही काळजी करु नका. बापू आहेतच.” असा विश्वास मजबूत करतात..

बाबांच्या उदी (Saibaba) प्रसादामुळे रतनजींना पुत्रप्राप्ती होते. पण काही काळाने ४ मुले हयात राहतात.. मात्र सच्चा श्रद्धावान ह्यामुळे सद्गुरूला दोष न देता त्याच्या मार्गावरून चालतचं राहतो. हे आपल्याला रतनजींच्या कथेवरुन समजते.

उपनिषद मध्ये आपण “क्षमा सुगंध प्रार्थना “वाचतो, त्यात सांगितल्याप्रमाणे आपली इच्छा असली पाहिजे की,
“हे क्षमाशील आदिमाते, माझ्या जीवनातील प्रत्येक गोष्ट तुम्ही आणि तुम्हीच निवडा. निवड तुमच्या हातात आणि त्याचा प्रेमपूर्वक स्वीकार माझ्या हातात असू दे.”…

माय= आदिमाता चण्डिका,
बाप= दत्तात्रेय,
गुरू= परमात्मा(बापू).

हे मायबापगुरू सर्वकाही(आयुष्यात जे काही ) फक्त तुझ्याचं इच्छेने होवो..

अंबज्ञ

प्रणिलसिंह टाकळे.
तेलगु उपासना केंद्र, दादर…