Reply To: साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२(Hemadpant – Sai the guiding spirit

Forums Sai – The Guiding Spirit साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२ Reply To: साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२(Hemadpant – Sai the guiding spirit

#8307

Aniketsinh Gupte
Participant

Hemadpant – Sai the guiding spirit

हरी ॐ,

सर्वप्रथम माझ्या सर्व मित्रांना नविन वर्षाच्या अनिरुद्ध शुभेच्छा !
‘संजीवनी’ हे आजपर्यंत फ़क्त ऐकून होतो, रामायण (Ramayan)मधल्या कथेमधून. पण आता साक्षात अनुभवतोय. दादांची एक ‘संजीवनी’ रूपी पोस्ट आणि हा संपूर्ण फोरम पुन्हा एकदा जागृत झाला. आणि त्यानंतर एका नंतर एक असे बहारदार पोस्ट्स वाचायला मिळाल्या. त्यासाठी त्रिवार अंबज्ञ !!
सप्तनेकर ह्यांच्या कथेतुन पुन्हा एकदा गुणसंकीर्तनचे(Gunasankirtan) महत्व आपल्या समोर येत. साईंचे गुणसंकीर्तन ऐकून सप्तनेकर(Sapatnekar) साईंच्या चरणी जातात. पुढील कथा सर्वांना माहितीच आहे आणि त्याचे खुप सुंदर विवेचन आपण वरती वाचलेच आहे. हर्षसिंह, संदीपसिंह, सचिनसिंह, प्रनिलसिंह, केतकीवीरा, अंजनावीरा ह्या सर्व दिग्गज़ानी खुप सुरेख मुद्दे मांडले आहेत. म्हणून एका वेगळ्या मुद्द्यावर लिहिण्याच्या थोडासा प्रयास करत आहे. अर्थातच विषय एकच – गुणसंकीर्तन.
गुणसंकीर्तन म्हणजे नक्की काय? माझ्या देवाच्या गुणांचे कीर्तन, मनन. त्याच्या बद्दलची, कार्याची माहिती देने म्हणजे गुणसंकीर्तन. पण हे झाले एका वक्त्याचे गुणसंकीर्तन बद्दलची प्राथमिक परिभाषा. पण श्रोत्याचे काय? त्याचे फायदे काय? आता तुम्ही म्हणाल की गुणसंकिर्तानाचे फायदे? होय. म्हणजे एक वक्ता म्हणून गुणसंकीर्तन केले तर त्याचे फायदे त्याला त्याच्या आयुष्यात मिळणारच आहेत. पण हाच भाग आपण एका श्रोत्याच्या नजरेतून बघुयात. ‘Looking from a third eye’. एका श्रोत्यासाठी गुणसंकीर्तन म्हणजे मनाचा आधार, रणरणत्या उन्हात मिळालेली एका वटवृक्षाची सावली. माणूस हा तरेतरेच्या संकटानी ग्रासलेला असतो. त्यात त्याच्या कानावर पडणारे गुणसंकिर्तानाचे बोल हे त्याच्या मनाला दिलासा देणारेच ठरतात. बघा ना, आपण बहुतांश वेळी बापूंबद्दल गुणसंकीर्तन एका नविन व्यक्ति समोर कधी करतो? त्याला बापूंबद्दल काहीच माहीत नाही तरी त्याला हे सर्व सांगण्यास प्रवृत होतो. कारण त्या वेळी त्याची सर्वात जास्त गरज त्या व्यक्तीला असते. ते गुणसंकीर्तन ऐकून त्याच्यातले सर्व negative विचारांचे रूपांतर positive विचारांमधे होतात. हा प्राथमिक किवा बेसिक बदल तो जाणवू लागतो आणि मग पुढच सर्व मार्गक्रमण तो ‘त्याच्या’ इच्छे नुसार चालू लागतो.
पण ह्या कथेतुन आपल्याला अजुन एक बोध मिळतो आणि जो खुप महत्वाचा ठरतो एका श्रद्धावानाच्या आयुष्यात. सप्तनेकर ह्यांच्या समोर साईंचे गुणसंकीर्तन आधी ही झालेले असते पण ते त्यावर काहीच करत नाहीत. म्हणजे बीज पेरणी चे कार्य गुणसंकीर्तनकार करतो, तेही त्याच्या इच्छेनेच. पण नुसते बी पेरल्याने रोप जन्माला येत का? नक्कीच नाही. त्याला ख़त पाणी घातले, चांगली मशागत केली की एक सुंदर रोप त्या जमिनीतुन जन्माला येणारच ! गरज असते ती ख़त-पाणी घालण्याची, जे आपण बघतो की सप्तनेकर दुसरया संधीमधे करतात. जमीन किती सुपिक की नापिक ह्याचा विचार आपण नाही करायचा कारण ती साईं माऊली अगदी कुठेही लेंड़ी बाग़ फुलवू शकते, हां फ़क्त तुमची इच्छा असेल तरच ! आणि म्हणुनच आपण जमेल तितक आपल्या गुरुचे, आपल्या देवाचे गुण संकीर्तन करत रहायच, काय माहीत कधी कोणाच्या मनातल्या बिजाला अंकुर फुटेल आणि त्याचे रूपांतर एका सुंदर बागेत होईल !!
गुण संकीर्तन ह्या विषयावर बापूंनी सुचवलेली आणि लिहून घेतलेली कविता तुम्हा सर्वांसमोर सादर करतो…

जसे शरीरास लागे सकस आहार
मनाला हवे शुद्ध विचार

शुद्ध विचारांचा जन्म….
शुद्ध विचारांचा जन्म देवाच्या गुणसंकिर्तनात होतो,
आयुष्याचा आलेख मग वरच चढत राहतो..

गुणसंकिर्तनाची महती नसे थोड़ी
माझ्या देवाच्या हास्या सारखे अवचित गोडी..

काय श्रोता काय वक्ता….
काय श्रोता काय वक्ता बेधुंद होई सारे वर्णिता गुरुची महती,
हा माझा बापूच लावे मज सवय ह्या कार्याची….

मार्ग हा अनोखा – सत्य प्रेम आनंदाचा,
अंधार सारुनी उजळे दीप प्रकाशाचा…

ह्रदय घाली साद, मनी उमटे सुर हर्षाचा,
अंबज्ञ होउनी राहू चरणी अनिरुद्धाच्या……

अंबज्ञ
अनिकेतसिंह गुप्ते