Reply To: साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२ (Hemadpant-Sai the guiding spirit)

Forums Sai – The Guiding Spirit साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२ Reply To: साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२ (Hemadpant-Sai the guiding spirit)

#8330

हरी ओम दादा,

खूप छान पोस्ट अनिकेतसिंह, संदिपसिंह, केताकिवीरा, अंजनावीरा . Hemadpant-Sai the guiding spirit

भक्ती मार्गातील आपला प्रवास हा आपल्याला पायऱ्या पायऱ्यांनी पूर्ण करावा लागतो. तर या पायऱ्या कोणत्या?
१) श्रवण
२) मनन
३) चिंतन
४) कीर्तन.

हा प्रवास प्रत्येकजण आपापल्या परीने पूर्ण करत असतो. ह्या प्रवासात त्याला सहयाकारी ठरतो तो म्हणजे त्याचा गुरु चरणी असलेला भाव, विश्वास, प्रेम. जसे आपण पहिलेच आहे कि हेमाडपंतांना गुरुचरणी म्हणजे बाबांच्या चरणी जाण्यासाठी दोन लोकांनी प्रवृत केले. म्हणजेच काकासाहेब दिक्षित आणि नानासाहेब यांनी बाबांचरणी जाण्यासाठी पुलाचे काम केले . असे अनेक पुल गुरु भक्तांसाठी तयार करत असतो. सपटणेकारांच्या कथेत ह्या पुलाचे कार्य शेवडे यांनी केले. काकासाहेब दिक्षित, नानासाहेब आणि शेवडे यांनी पुलचे कार्य केले म्हणजेच त्यांनी गुणसंकीर्तनरुपी पुलाचे कार्य केले. योग्यवेळी ह्या पुलाचा वापर करून बाबांनी हेमाडपंतांना आणि सपटनेकारांना स्वतः जवळ बोलून घेतले. यावरून फक्त एक महत्वाची गोष्ट समजते ती म्हणजे आपण आपले गुणसंकीर्तनाचे काम करत रहायचं.

आपल्या गुरुचे गुणसंकीर्तन कसे करावे. ज्याप्रमाणे आपण आपल्या गुरूच्या देवत्वाच्या अनेक छटा पाहिलेल्या, अनुभवलेल्या असतात. आपण त्याचे ते देवत्व मनात असतो त्याचप्रमाणे आपण गुरुचे मानवत्व पण मानले पाहिजे. गुरूला देखील मानवी मर्यादांचे पालन करावे लागते हे आपण विसरून जातो. ज्याप्रमाणे आपण रामायणात वाचतो कि प्रभू श्रीरामचंद्रांनी देखील मानवत्वाच्या मार्यादापाळूनच कार्य केले.

एकदा का गुरुचे मानवत्वा आपण स्वीकारले कि गुरु जवळ जाने अधिकाधिक सोपे होते आणि त्याच्या गुणांचे कीर्तन करणे हे अजूनच सुंदर होत जाते.

बापूंनी सांगितल्याप्रमाणे “तो” त्याच्या भक्ताला योग्य वेळेच्या आधी काहीच देत नाही आणि घेतही नाही. यामध्ये भक्ताला कितीही तरी देखील नाही. प्रत्येकाला आपले प्रारब्धाचे भोग हे भोगावेच लागत असतात पण हे भोगत असताना गुरु भक्ताच्या मार्गातील अडचणी कमी करतोच. आपल्या अडचणीप्रसंगी आपण गुरुवार कितपत विश्वास ठेवतो हे महत्वाचे असते.

सपटणेकारांनी ज्याप्रमाणे बाबांचे “चल हट ” असे बोल ऐकूनहि बाबांच्ये चरण सोडले नाहीत. तसे आपल्यला करता आले पाहिजे. गुरुचरणी पूर्ण भाव, विश्वास असला पाहिजे.

गुरु चरणी कसे लीन व्हावे याचे सुंदर वर्णन साईसच्चारीतातील अध्याय क्रमांक १९ मधील औरंगाबादकर यांच्या मुखातून आलेले आहे.

गुरुकृपांजन पायो मेरे भाई । रामबिना कछु मनात नाही ।।धृ।।
अंदर रामा बहर रामा । सपने मैं देखत सितारामा ।। १। ।
जगात रामा सोवत रामा । जहां देखे वहां पुरनकामा ।। २ ।।
एका जनार्दनी अनुभव नीका । जहां देखे वहां राम सारिखा ।। ३।।

अम्बज्ञ

श्रध्दावीरा दळवी
लोणावळा उपासना केंद्र