Reply To: साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२ (Hemadpant-Sai the guiding spirit)

Forums Sai – The Guiding Spirit साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२ Reply To: साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२ (Hemadpant-Sai the guiding spirit)

#8403

Sachinsinh Varade
Participant

हरी ओम दादा
खूप सुंदर पोस्ट अनिकेतसिंह,केताकीवीरा,संदीपसिंह,अंजनावीरा,श्रद्धावीरा (Hemadpant-Sai the guiding spirit)

श्रद्धावीरांनी अगदी बरोबर मुद्दा सांगितलं कि गुणसंकीर्तन हे भगवंताकडे जाणार्या पुलाच काम करत .
मुळात गुणसंकीर्तन म्हणजे काय तर अगदी साध्या सोप्या भाषेत सांगायचं झाल तर भगवंताच्या गुणांचं कीर्तन.
आपल्या बापुभक्तांसाठी सद्गुरु अनिरुद्ध हा देवच आहे, पण गुणसंकीर्तन करताना आपल्याला हा सद्गुरु देव म्हणून कसा आहे यापेक्षा माणूस म्हणून कसा आहे हे आधी बघायला हव .
कारण हा आपला बापू माणूस म्हणून आई चण्डीकेचा बेस्ट पुत्र आहे,बेस्ट शिष्य आहे ,बेस्ट पिता आहे , बेस्ट श्रद्धावान आहे , बेस्ट योद्धाही आहे . आणि आपल ध्येय हि हे एकच असल पाहिजे कि आपल्याला हि ह्या अनिरुद्धाचा बेस्ट सिंह/बेस्ट वीरा बनायचं.
आणि हे शक्य होत ते या गुणसंकीर्तन रुपी पुलावर यशस्वी रित्या वाटचाल केल्याने.
बापूनी आपल्याला ग्रंथाराजात एक सुंदर गोष्ट सांगितली आहे

मोठे विश्वविद्यालय मला बघायचे असेल,तर त्या विद्यालयातील मित्रावर मला विश्वास ठेवावा लागतो.तरच मी प्रवासाला आरंभ करीन आणि शेवटी तिथे जाऊन पोहाचीन.
परंतु ज्याप्रमाणे मित्राच्या सांगण्यावरून परदेशातील मोठ्या विश्वविद्यालयात मी जाऊन पोहचलो,तरी पदवी माझी मलाच मिळवायची असते .

काकासाहेब दीक्षित आणि नानासाहेब चांदोलकारांनी सांगितलेल्या माहितीनुसार हेमाडपंत साईनाथांकडे आले पण पुढचा उत्तम शिष्य होण्याच्या पदवीच्या मार्गावर हेमाडपंत स्वतः समर्थ पणे चालले . निश्चितच ह्या मार्गावर आपण हि आपापल्या परीने चालण्याचा प्रयत्न करत असतो आणि या मार्गात सहाय्यकारी ठरतो तो सद्गुरुवरचा विश्वास,प्रेम,श्रद्धा ,सबुरी.

ज्याप्रमाणे पाण्याने तहान भागते असा बोलून आपली तहान भागत नाही तर तहान भागवायला पाणी पिणेच गरजेच आहे . त्याचप्रमाणे गुणसंकीर्तन करणे हे अतिशय महत्वाचेच आहे पण त्या भगवंताच्या गुणांनुसार स्वताचे चागंले गुण वाढवत रहाणे हे देखील आपल्यासाठी महत्वाचे आहे. आपली बापुमाउली म्हणजे सत्वगुणांची खाण आहे,म्हणजेच या विश्वात जे जे काही चांगले गुण आहेत,जे जे काही सुंदर आहे ते सगळ आपल्याला बापू कडूनच मिळणार आहे . कारण ज्या प्रमाणात त्या भगवंताचे गुण आपण आपल्या अंगी उतरवू त्या प्रमाणात आपण त्याचे लाडके बाळ,शिष्य बनू . याविषयीच सुंदर प्रमाण बापूनी ग्रंथराजात आपल्याला दिलेलं आहे .

प्रमाण-१
१)परमेश्वर आनंदस्वरूप आहे,
म्हणून त्याला इतरांना आनंद देणारे मानव आवडतात .
त्यांना तो आनंद प्रदान करतो.

२)निस्वार्थ प्रेम हि परमेश्वराची शक्ती आहे,
म्हणून त्याला निस्वार्थ प्रेम करणारे मानव आवडतात.
त्यांना तो शक्ती प्रदान करतो .

३)परमेश्वर विश्वाच्या आधीही होता,आताही आहे व विश्प्रलायानंतरही असतोच .तो सदैव तसाच आहे,जसाच्या तसा ,आनंदस्वरूप व प्रेममय ,म्हणजेच सत्य ,म्हणून त्याला सत्याने आचरण करण्याचा प्रयत्न करणारे मानव आवडतात.
त्यांना तो खरेखोटे जाणण्याची बुद्धी देतो .

४)परमेश्वर भक्तांना संकटात सहाय्य करतो ,
म्हणून त्याला संकटग्रस्तांना सहाय्य करणारे मानव आवडतात .
त्यांच्या संकटांची तीव्रता तो कमी करतो.

५)परमेश्वर सदैव प्रत्येकाचे स्मरण व चिंतन न चुकता करतो .
म्हणून त्याला भगवंताचे स्मरण व चिंतन करणारे मानव आवडतात.
त्यांच्या चुकांना तो क्षमा करतो .

६)परमेश्वरानेच निसर्गाची रचना केली आहे ,
म्हणून त्याला निसर्गाची काळजी घेणारे मानव आवडतात .
त्यांना तो आरोग्य प्रदान करतो.

७)परमेश्वर सर्वोकृष्ट रचनाकार असूनही त्याला सामान्य मानवाच्या अतिसामान्य निर्मितीचे कौतुक असते ,
म्हणून त्याला इतरांचा मत्सर न करणारे मानव आवडतात.
त्यांना तो अधिक अधिक सुंदर गोष्टी बहाल करतो .
त्यांना तो खरी तृप्ती देतो.

८)परमेश्वर कुणालाही तुच्छ लेखत नाही,
म्हणून त्याला गर्विष्ठपणा न करणारे मानव आवडतात .
जे परमेश्वराच्या चरणी विलीन आहेत ,त्यांना अहंकार बाधत नाही.
त्यांना तो अधिकाधिक यश देतो .

९)परमेश्वर स्वताचे नियंम स्वताही पाळतो .
ह्याच मर्यादा गुणांच्या सहाय्याने तो विश्वचक्र चालवितो,
म्हणून त्याला मर्यादशील मानव आवडतात ,
त्यांच्या जीवनातील कुठलीही अपूर्णता तो नष्ट करतो.
त्यांच्या जीवनातील प्रत्येक ध्येय तो पूर्ण करतो .

हरी ओम
मी अंबज्ञ आहे.

सचिनसिंह वराडे
कल्याण(पूर्व) उपासना केंद्र