Reply To: साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२(Hemadpant – Sai the guiding spirit)

Forums Sai – The Guiding Spirit साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२ Reply To: साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२(Hemadpant – Sai the guiding spirit)

#8461

ketaki. Kulkarni
Participant

हरी ॐ
।।संत आरंभि उग्र भासती तरी त्यापोटी लाभेवीण प्रीति। अल्प धीर पाहिजे चित्ती। करितील अंती कल्याण।।४५।।
सपटनेकरांची (Sapatnekar) गोष्ट सुरु करण्या अगोदर ही ओवी येते. इथे बघितल तर हयात स्पष्टपणे आपल्याला हेमाडपंत(Hemadpant) सांगतात की जेव्हा बाबा (Sai baba)रागावले असतात तेव्हा वरकरणी जरी ते रागावलेले दिसत असले तरी त्यांच्या अंतरंग मात्र पूर्णपणे प्रेमानेच भरलेले असते, त्यावेळी ते रूप बघून घाबरून न जाता त्या रूपा कड़े पण प्रेमाने बघून त्याही रूपावर आपल्याला प्रेम करता आले पाहिजे. हा धीर धरल्यावर शेवटी कल्याणच होणार हे निश्चित!
ह्याच एक उदाहरण म्हणजे प्रसन्नोत्सवाच्या वेळी रक्त्दंतिका आईचे रूप. मातृवात्सल्याविन्दान्म(Matruvatsalya) मधे ह्या आइचे स्वरुप आपल्याला बाप्पाने खुप सुंदर वर्णन करून दिले आहे.
आणि प्रसंनोत्सावाबद्दल सांगताना सुद्धा बाप्पने हे रूप कसे असेल हे डोळ्यासमोर आणून दिले. आणि अक्षरश: जेव्हा हे रूप बघितले तेव्हा जसे वर्णन केले होते अगदी तसच्या तस रूप होत ते!
पण ती आपली आईच असल्यामुळे तिची भीती न वाटता, ते उग्र पण त्याच वेळी प्रेमळ असलेले रूप बघताना जरा देखिल मन कचरल नाही., उलट प्रेम अधिक वाढलेल होत.
आईचा राग, सद्गुरुचा कोप हा तिच्या बाळांवर नसतो तर त्यांच्या आड येणार्या वाईट लोक आणि वाईट वृत्तिंसाठी असतो. आणि हे जो समजतो तोच सुखी होतो.
सपटनेकरांच्या गोष्टीमधे ही हेच बघतो की त्याना समजत की आधी आपण अविश्वास दाखवला, मानले नाही म्हणून बाबा सतत चल हट करत होते. हे चल हट त्याना नसून त्यांच्या त्या अविश्वासु वृत्तीला होते. आणि सपटनेकर जेव्हा सम्पूर्ण शरान्याने त्यांचे पाय धरतात तेव्हा बाबा सुद्धा प्रेमाने त्यांच्या डोक्यावरुन हात फिरावातात, एवढेच नाही तर पुढे बाबांच्या आशिर्वादाने , त्याना पुत्रप्राप्ति होते व त्याना त्यांचा पुत्र गेल्याचे दुःख झालेले ते बाबांच्या कृपेने नाहीसे होते.
असे हे सद्गुरुप्रेम व अकारण कारुण्य! काहीही होवो तो त्याच्या लेकराना कधीच त्याच्यापासून दूर होउ देत नाही.
इथे आपल्या बापाच्या पणजीने लिहिलेला एक अभंग व त्यातल्या ओळी आठवतात..
ज्याने धरिले हे पाय आणि ठेविला विश्वास..
त्यातील एक ओळ
।।हे पाय कैसे तुमचे
हे तर आमुच्या सत्तेचे
ह्यांना नाही सोडणार
तू मरे-मरे-तो मार।।

व त्याच बरोबर आठवतात त्या मीना वैनींच्या अभंगातिल काही ओळी व त्या अगदी मनोमन पटतात…
।। वैनी सांगते अनुभवे
बापू पुरता दयाळू
पापियासी नान म्हणे
शिक्षेलाही हा मवाळू।।
।।जे आले ते तरुनी गेले जे न आले ते तसेच राहिले।।

अम्बदज्ञ
Ketakiveera Kulkarni
Dombivli east upasna center