Hanuman chalisa to chant

#89961

Suneeta Karande
Participant

हरि ॐ दादा.
आजच्या दिनांक १३-०१-२०१५ च्या अग्रलेखातून बापूंनी शनी ग्रहाची(Saturn) उत्त्पत्ती, साडेसातीचा मूळ उगम आणि त्यावरील रामबाण उपाय म्हणजे महाप्राण हनुमंताची(Hanuman) उपासना ह्याविषयी अद्भुत माहिती देऊन अज्ञानापोटी उद्भवणारे खूप मोठे गैरसमज दूर केले आहेत. बापूंनी अगदी सुरुवातीपासूनच आम्हा सर्व श्रध्दावानांना महाप्राण हनुमंताची उपासना करायची गोडी विवीध प्रकारे लावली होती. “ॐ श्री रामदूताय हनुमंताय महाप्राणाय महाबलाय नमो नम:” ह्या मंत्राचे दर गुरुवारी उपासने दरम्यान होणारे पठण, अंजनामातावहीतील ह्या मंत्राचे लेखन आणि पठण , दररोज रात्री ३ वेळा “हनुमान चलिसा” (Hanuman chalisa)पठण, वर्षातून एकदा श्रीगुरुचरणमास मध्ये कमीत कमी एक दिवस १०८ वेळा हनुमान चलिसाचे पठण, सर्व तीर्थक्षेत्रांमध्ये अत्यंत पुण्यप्रद आणि पावन अशा “अनिरुध्द गुरुक्षेत्र” मध्ये दररोज १०८ वेळा होणारे संपूर्ण आठवडाभराचे पठण आणि श्रीगुरुकुल जुईनगर येथील अश्वत्थ मारुती पूजन अशा वेगवेगळ्या प्रकारे सतत महाप्राणाच्या उपासनेद्वारे पवित्र स्पंदनाचा अव्याहत पुरवठा अबाधित राखण्याचे किती कौशल्यपूर्ण आयोजन केले आहे ह्याची जाणीव होते. बापूंनी “ॐ मत्राय नम:” ह्या विष्णूसहस्त्रनामावरील प्रवचनांतूनही “श्री अनिरुध्द गुरुक्षेत्रम मंत्र” शिकविताना सर्वबाधाप्रशमनं ह्या पदातील ग्रहबाधा समजावून देताना शनी ह्या ग्रहाविषयीचे गैरसमज ह्यावर खूप मोठे स्पष्टीकरण दिले होते.
आता आजच्या ह्या अग्रलेखामुळे तर शनी ग्रह हा मूळ सूर्यमालेचा ग्रह नसून तो कृत्रिम ग्रह असल्याचे रहस्यही बापूंनी उलगडून दाविले आहे.
सत्य, प्रेम , पावित्र्य ह्या त्रिसुत्रींनी कायमच असत्य, अपावित्र्य ह्या अनुचित गोष्टींवर त्या कितीही प्रबळ दिसत असल्या तरी अंतिम विजय मिळविता येतो हे निर्विवाद सत्य पुनश्च: पटले. भगवान त्रिविक्रमाने श्रध्दावानास कसे ह्या ड्रेकोसॅटर्नच्या विळख्यातून वाचविले हे वाचून थक्क व्हायला होते. तसेच त्रिविक्रमाने ह्या ग्रहास पूर्णपणे नष्ट न करता श्रध्दावान आणि श्रध्दाहीनांसाठी कसे एकाच वेळी दोन टोकाच्या योजना रचून ड्रेकोंचेच कारस्थान त्यांच्यावरच उलटविण्याचे द्विविध कार्य केले हे वाचून अवाक् व्ह्यायला होते.
आदिमाता चण्डिका अर्थात महादुर्गा -मोनोडोरगी हिच्या वरील “मातृवात्सल्यविन्दानम् “आणि “मातृवात्सल्य्-उपनिषद्” ह्या ग्रंथामध्ये बापूंनी एक वाक्य उच्चारले होते की अशुभाला कधीही शुभाच्या मनातले कळूच शकत नाही त्याचे हे अत्यंत बोलके , समर्पक उदाहरण आहे असे मला वाटते. तसेच साक्षात भगवान परशुरामांनी आदिमातेची महती सांगताना कथिले होते की जो कोणी “माझ्या बालका मी तुझ्यावर निरंतर प्रेम करीत राहते” ह्या मातृवाक्याचे स्मरण ठेवतो, मनन आणि चिंतन करतो त्या श्रध्दावानाला आश्वस्त आणि निर्भय केले होते की तुमच्या आयुष्यावर नियती व सैतान राज्य करणार नाहीत, तुमच्या जीवनाचा राजा सदगुरुरुपाने हा त्रिविक्रम असेल आणि त्यामुळे तुमचे अख्खे जीवन बदलून जाईल. किती मोठे हे अभय वरदानच आम्हांला आमच्या सदगुरु बापूंनी त्रिविक्रम बनून जन्माच्या आधीपासूनच दिले होते.
हे माझ्या सदगुरु बापूराया त्रिविक्रमा तू खूपच प्रेमळ आहेस आणि तुझ्याच कृपादृष्टीने मी तुझ्या चरणांशी अंबज्ञ आहे आणि सदैव अंबज्ञ राहो.
ह्या आधीच्या अग्रलेखात ही सम्राज्ञी बिजॉयमलानाच्या अफाट शोर्याने दिङंमूढ व्हायला होते की दानव महामाता म्हणून जिला सारे घाबरतात त्या कद्रूच्या विळख्यात सापडूनही कशा अपार धैर्याने ती त्या संकटावर मात कळते आणि कद्रूलाच आंधळी बनविते. त्यावेळेस ती स्वस्तिकसदृश्य चिन्हाच्या शस्त्रानेच प्रहार करते त्यावेळी “स्वस्तिक गीता”ची आठवण झाली आणि स्वस्तिकाचे माहात्म्यही स्मरले.
त्रिविक्रमाने “मातृवात्सल्य-उपनिषदा”त उच्चारले होते की ह्यामागे खूप मोठा इतिहास आहे. हा वैश्विक इतिहास आहे : प्रत्येक कल्पामध्ये घडत राहिलेला .
ते उपनिषदात वाचून “वैश्विक इतिहास” जाणून घेण्याची अनावर इच्छा मनात दाटली होती आणि आज आमचे सदगुरु बापू -साक्षात त्रिविक्रम बनून ती आमची जिज्ञासा पुरवित आहे आणि ह्याचि देही ह्याची डोळा ते आम्ही अनुभवत आहोत ह्या परते अहोभाग्य आणिक दुजे काय असावे.
खरच बापूंना खूप खूप मन:पूर्वक अंबज्ञ!!! हा माणसांचा खरा युगानुयुगे चालत आलेला वैश्विक इतिहासाचा खजिना आम्हांला सोप्या,सहज रीत्या उपलब्ध विनामूल्य करून देण्याबद्दल. आता पुढील अग्रलेख कधी हातामध्ये येतो आहे ह्याचीच वाट पाहते आहे अधिव्रताने कथिलेले “त्रिविक्रमरहस्य” जाणून घेण्यासाठी….

श्रीराम. अंबज्ञ
सुनीतावीरा करंडे