Haiyyavanas entering Earth’s periphery like a Satan

#97417

Sachin Rege
Participant

हरि ओम् राजेंद्रसिंह,

अगदी खरं आहे. वरील पोस्टमध्ये तुम्ही म्हटल्याप्रमाणे – हैय्यवॉनसचे वसुंधरेच्या (Earth)कक्षेत झालेले आगमन हे जणू सैतानाचेच(Satan) आगमनच होते. सुमारे दोन-अडीच लाख वर्षांपूर्वी घडलेल्या ह्या घटनाक्रमाची फळं आपण वसुंधरावासीय अजूनही भोगतो आहोत. ह्या अनुनाकीयांनी(Annunaki) वसुंधरावासीयांवर एकही सैतानी अत्याचार करण्याचे बाकी ठेवले नाही. ‘देव आकाशातील स्वर्गात असतात व अतिशय कोपिष्ट असतात’ हा वसुंधरावासीयांमध्ये रूढ झालेला गैरसमज, हा ह्या अनुनाकीयांमुळेच झाला. म्हणूनच ते इथे आल्यानंतरच सर्वसामान्यांमध्ये देवाबद्दलची भीती वाढीला लागली.

पण जसजसा हा इतिहास ह्या अग्रलेखमालिकेतून आपल्यासमोर उलगडला जात आहे, तसतशी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत आहे – ह्या सैतानी लोकांचे प्लॅन्स कितीही सैतानी असो व ते कितीही पाताळयंत्री व बलाढ्य असोत, अंतिम विजय महादुर्गेवर विश्वास असणाऱ्या श्रद्धावानांचाच होत असतो!

एकटी अफ्रोडाईट ह्या सैतानी लोकांच्या बहुस्तरीय व चहूबाजूंनी होणाऱ्या आक्रमणांना व पाताळयंत्री डावपेचांना लीलया पुरून उरताना दिसत आहे.