GOD HELPS THOSE WHO HELPS THEMSELVES

#94626

ketaki. Kulkarni
Participant

किती सूंदरपणे सर्व गोष्टी बापू समजावून देत आहेत.. आजचा अग्रलेख… काय बोलावे हेच कळत नाही.. शब्दच नाही आहेत!
अथेना चे कौतुक करावे का हरक्युलिसचे (Hercules)की अफ्रोडाइटचे(Aphrodite)!!
तिघेही अप्रतिम..
पण एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे, ह्या वाईट लोकांना कायम त्यांची वाईट कृत्ये साधण्यासाठी कृत्रिम गोष्टींची गरज भासत राहते आणि त्यात त्यांना असे वाटत राहते की आपण जे काही करत आहोत हे फक्त आपल्यालाच माहीत असते.. आणि ह्यामधे ते श्रद्धावान लोकांना गाफिल ठेवता ठेवता स्वतःच गाफिल होऊन बसतात. आणि तेच श्रद्धावान मात्र प्रत्येक पाऊल टाकताना चौफेर राहून टाकत राहतात.
हीच गोष्ट इथे ही घडली.. ८ प्रकारची कृत्रिम धूमकेतु इष्टार(Ishtar Lucifer) व नादन ह्यांनी मिळून केले पण इथे अथेनाला चाहुल लागलीच व त्यामुळे ती सावध झाली.
दूसरी गोष्ट इथे प्रामुख्याने बघायला मिळते ते म्हणजे.. alertness of अथेना and her patience.. त्याचबरोबर तिचे updated राहणे.. प्रत्येक यंत्रणेचि माहिती तिच्याकडे होती.. कधी व कशी वापरायची हे अगदी चोख माहीत होते तिला..
alertness हिच्याकडून शिकण खरच गरजेचे आहे.. आपल्याला आपल्या बापूंनि alert राहण्यासाठीच एक खास गोष्ट शिकवली आहे ती म्हणजे DISASTER MANAGEMENT COURSE.. कुठले संकट कधी येऊन कोसळेल ह्याचा नेम नाही.. आपत्ती, मग ती नैसर्गिक असो की आपण आजच्या अग्रलेखामधे पाहिलेले युद्ध म्हणजेच मानवनिर्मित असो… कधी येऊन आपल्यावर आदळेल हे सांगता येत नाही.. आणि अशा वेळेस शांत राहून उचित पाउले कशी उचलावी हेच अपल्याला अथेनाच्या वाग्णुकीतून दिसून येते.. कुठेही जरा ही न घाबरता ती तिच्या इतर अधिकाऱ्यांना सूचना देत गेली.. and at the same time तिने त्यांच्यातच असलेल्या त्या धूर्त प्रमुख शास्त्रज्ञाला ही ओळखून त्याचा ही घात अगदी सहज केला..
एवढे मोठे संकट आले आता मी काय आणि कसे करू असे विचार करून ती बावरली नाही.. जेव्हा एकाएकी काळोखाने धुर पसरु लागतो आणि त्यामुळे अथेनाचे बोट ही काम करेनासे होते तेव्हा सुद्धा ती तिचे प्रयास सोडत नाही.. तिच्या मुद्रिकेतील कळ ७ वेळा दाब्ण्याचा ती पूर्ण प्रयास करते आणि जिथे प्रयास मनापासून केलेले असतात तिथे ती आई कशी बरे नाही येणार?
तिच्या लेकीच्या सहय्यासाठी आपली आई अफ्रोडाइट तिथे येतेच!
जशी मोठी आई आणि देवीसिंह तसेच अफ्रोडाइट तिच्यासोबत हरक्युलिसला घेऊन तिथे अथेना व इतर श्रद्धावानांच्या सहाय्यासाठी येते.
GOD HELPS THOSE WHO HELPS THEMSELVES… हे किती नीट ह्यातून दिसून येत आहे..
आणि खरेच ह्याचा खुलासा ही अफ्रोडाइट अथेना(Athena) ला करतेच.. ” ‘सात वेळा’ कळ दाबणे ह्याचा खरा अर्थ मानवाने त्याच्या शरीरातील सप्तधातूंचा व सप्तचक्रांचा पुरेपूर वापर करून सर्वतोपरी प्रयास करणे हाच आहे व म्हणून तू फक्त तीन वेळा कळ दाबूनसुद्धा मी आलेच.”
संकटकाळी किंवा रोजच्या जीवनातही प्रयासाचे, कष्टाचे एक पाऊल आपण उचलले की तो ९९ पाउले आपल्या दिशेने येतोच येतो.. हे परत एकदा आज बापूंनि दाखवून दिले आहे..
त्याचबरोबर आवश्यक आहे ते त्याची व त्याच्या आईची मनोभावे प्रेमाने प्रार्थना करणे..
अथेना जेव्हा हतबल होते तेव्हा ती तिने एकदाच पाहिलेली महादुर्गेचि प्रतिमा तिच्या डोळ्यासमोर आणते व एका क्षणात तिथे अफ्रोडाइट येऊन पोचते..
भक्ति, चौफेर राहणे, प्रेमाने तिचे व तिच्या पुत्राचे स्मरण करणे, संकटकाळी ही डोक शांत ठेऊन उपाय करणे… ह्या अशा अनेक गोष्टी आजच्या अग्रलेखातून शिकायला मिळालेल्या आहेत..
बापू फक्त आणि फक्त अंबज्ञ.. इतकेच काय ते आम्ही तुम्हाला म्हणू शकतो..

अंबज्ञ
केतकीवीरा कुलकर्णी