Freemasons, Illuminati and New World Order

Forums वैश्विक वास्तव (The Universal Truth) प्रारंभ Freemasons, Illuminati and New World Order

#93150

Aniketsinh Gupte
Participant

हरी ॐ,

अनुनाकी (Annunaki) आणि आपण :

काही वर्षांपूर्वी एक हिंदी मालिका खुप गाजली. घरातील प्रत्येक ‘सांस आणि बहू’ ने ही मालिका उचलून धरली, इतकी की त्यातील नायकाचा मृत्यु झाल्यावर त्याला परत जिवंत दाखवणे त्यांना भाग पाडले आणि संपूर्ण देशात जल्लोष झाला. तसेच काहीसे अनुनाकी अग्रलेख मालिकेबद्दल आपल्याबरोबर घडत आहे. सर्वांची लाडकी ठरलेली sathadorinaचा मृत्यु त्यावर सर्व श्रद्धावान मंडळीने व्यक्त केलेली हळहळ आणि नंतर खरे नाट्य समोर आल्यास बिजोयमलानाने रचलेला हा डाव पाहून सर्वत्र आनंद साजरा झाला. अनेक whatsapp पोस्ट्स, फोरमवर ह्याबद्दल आपला आनंद अनेकांनी व्यक्त केला. हर्कुलसचे(Hercules) शौर्य पाहून समाधान व्यक्त केला तर त्याच्या हळूवार प्रेमाला आपल्या मनात वेगळं स्थान दिलं. जणू काही हे सर्व आपले आप्तच आहेत आणि त्यांच्या बरोबरच आपण जगतोय.
खरच, माणसाची कल्पनाशक्ति खुप अफाट आहे. आपण एखादी कथा वाचत असतो तेहवा हे सर्व रंग आपल्या मनाच्या पलाटावर कोरले जात असतात आणि जसे कथेत घडत आहे तसेच चित्र रेखाटले जात असते. दि. १४.०२.१४ ला दैनिक प्रत्यक्ष मधे योगिन्द्रसिंह जोशी ह्यांचा श्रीसाईसच्चरित्र वरील लेख थोडाफार ह्या दिशेने जातो.
“श्रीसाईसच्चारित्रातील कथा वारंवार आठवत राहिल्याने मनाला आपोआप वळण लागते. त्या कथेतील पूर्ण भावार्थ मला कळो अथवा न कळो पण ती कथा माझ्या मनात प्रत्येक वेळी श्रीसाईसच्चरित्र वाचताना घडत असते. श्रीसाईसच्चरितातील सर्व भक्त म्हणजे सर्व पात्रे माझ्या मनात आहेत.” मात्रूवात्सल्यविंदनाम तसेच उपनिषद् मधील इतिहास वाचतानाही आपण अनेकांनी हा अनुभव घेतलाच आहे. उपनिषद मधे प्रदेशांचा प्रवास, तेथील मंदिरे आपण सर्वांनीच आपापल्या परीने रंगवली आहेत. तसेच ही अग्रलेख मालिका वाचताना होते. झियस, बीजोयमलाना, हर्कुलस, अफ्रोदोईट, ह्यांच्या बरोबर श्रद्धावान आनंदाने प्रवास करीत राहतो. त्यांच्या दुखत सळमिसळ होतो, त्यांच्या विजयाने, पराक्रमाने आपलीही छाती फुलून निघते. तितकेच श्रद्धाहीनांचा द्वेष करतो, त्यांच्या अघोरी उपासना वाचून मनात कीळस येते. अजुनच चिड येते.
पण इथे एक विचार आपल्याला करायला हवा. की हा सर्व इतिहास सांगण्याचा डैडचा अट्टहास का? आणि तेही आता ह्याचे प्रयोजन काय, आधी का नाही? अर्थात त्याचे कार्य त्यालाच ठावूक, आपण फ़क्त अंदाज़ बांधू शकतो. तसेच जर आपण पाहिले तर सर्व अग्रलेख मधे होणारे प्रत्येक कार्य ह्याची छोट्यातील छोटी गोष्ट आपल्यासमोर ठेवण्यात आली आहे. मग ती श्रद्धावान मंडळी असो किंवा श्रद्धाहीनची असो. मग त्यांची ती उपासना कितीही अघोरी किंवा कीळसवाणी असो.
ह्याचे कुठेतरी आजच्या वेळेशी काही संबंध असावा असे विचार मग मनात डोकावू लागतात. आज हे जग कलियुगाच्या अश्या वळणावर आले आहे की ह्यापुढे विध्वंश जास्त प्रमाणात होणार आहे. किंबहुना अनेक ठिकाणी त्याची सुरवातही झाली आहे. Freemasons, Illuminati, New World Order ह्यासारखे शब्द आणि त्यांचे हेतु डैडने आपल्याला सांगितले. त्यांचा अभ्यास करायला सांगितला, अर्थात स्वतःला सावध करण्यासाठी. अनेक ठिकाणी अभ्यास करताना आपण वाचतो की हे सर्व श्रद्धाहीन मंडळी बळ, पैसा, ताकत मिळावी म्हणून शैतानची अघोरी उपासना करतात. पण एका सच्चा भोळ्या भाविक श्रद्धावान व्यक्तीला हे सर्व कसे काय समजणार? उलट हे असे काही जगात चालू आहे ह्याची पुसटशी कल्पना देखिल अनेकांना नाहीय. अनेक विविध मार्गाने (मालिका, चित्रपट, गाणी, सेलिब्रिटी) ह्या शैतानची वाईट चिन्हे आपल्या मनात बिमबवली जातात, तेही आपल्या नकळत. ह्या कलियुगात माणूस त्रस्त झालय तोह पैसा, अशांति, ह्या मुळे. मग ह्याचे लालुच दाखवून ह्या लोकांना ह्या मार्गावर चालण्याचे प्रयोजन आणि मनसूबे ह्या श्रद्धाहीन व्यक्तींचे असणारच ! ह्यात श्रद्धावान भक्त मंडळीना आपल्याकडे खेचण्याचा कौल जास्त असणार. पण प्रत्येक श्रद्धावान सिंह आणि वीरा पुढे खंबीरपणे उभा तोह चंडिकापुत्र अनिरुद्ध आहे !! वेगवेगळी उपासना, मंत्रपठन, सेवा ह्यातून प्रत्येकाचे मन सबळ करण्याचे काम बापूंनी आधीच केले आहे. प्रत्येकाचे आयुष्य दिवसागणिक अधिक भक्तिमय आणि प्रेममय व्हावे हीच ह्या परमत्मात्रयीचा अट्टहास ! समोर येवून ठेपलेला कोणतेही संकट समर्थपणे तोंड देण्याची क्षमता प्रत्येक श्रद्धावान मधे असावी म्हणुनच ह्या सर्व कथेचे प्रयोजन असावे तसेच प्रत्येक श्रद्धावान व्यक्तिस हे कळावे की जरी चुकून एखादा श्रद्धावान त्याची वाट चुकलाच तरीही हे असे अघोरी उपासना पाहून हा शैतानाचा मार्ग आहे ह्याची जाणीव होईल.
देवाचा मार्ग कसा आहे आणि खरा इतिहास काय आहे ह्याची जाणीव होण्यासाठी आज डैड वेळात वेळ काढून (श्रीश्वास्म सारख्या महत्वाच्या कार्यातुन) हा अग्रलेख आपल्यासमोर मांडत आहे. ह्याचे वाचन आणि अभ्यास प्रत्येक श्रद्धावान ने करायलाच हवा.

अंबज
अनिकेतसिंह गुप्ते